श्रीकृष्णाय नम: ॥ रिघोनि जंबुकांमाझारीं । आपुला भाग ने केसरी । तैसी वेढिली महावीरीं । नेली नोवरी श्रीकृष्णें ॥ १ ॥ सांगातिणी जिवेंभावें । जड्ल्या होत्या भीमकीसवें । त्या त्यजूनि कृष्णदेवें । नेली निजभावें भीमकी ॥ २ ॥ आंदण्या अविद्येच्या दासी । मोहममतेच्या सखियांसी । सांडूनि नेले भीमकीसी । उकसाबुकसीं...