Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Saturday, 5 April 2025
webdunia

कर्जतचे ग्रामदैवत सद्गुरु गोदड महाराज

सद्गुरु गोदड महाराज मराठी माहिती
, रविवार, 16 फेब्रुवारी 2025 (06:52 IST)
गोदड महाराज हे एक थोर संत आणि समाजसुधारक होते. ते कर्जत येथे वास्तव्यास होते आणि त्यांनी अनेक सामाजिक कार्ये केली.
 
गोदड महाराजांचे जीवन
गोदड महाराजांचा जन्म शके १६ श्रावण शुध्द दशमी गुरुवार पुष्प नक्षत्रावर अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत तालुका येथे उदयपूरचे भोसल्यांच्या राजघराण्यात झाला. त्यांचे आजोळ हे कर्जत (तत्कालीन कर्णग्राम) येथे होते. अमृतसिंह किंवा अमृत असे त्यांचे जन्मनाव होते, परंतु पुढे ते गोदड महाराज याच नावाने ओळखले गेले. वडिल भिकाजी हे राजस्थानातील उदयपुर संस्थान येथील राजवंशातील होते तर आई चंद्रभागा या कर्जत येथील तोरडमल कुटुंबातील होत्या. राजघराण्यात जन्म झाला असला तरी लहानपणापासून कोणत्याही भौतिक गोष्टींची लालसा त्यांच्या मनात नव्हती.

वैराग्याचा विचार असलेले महाराज सतत पांडुरंगाचे नामस्मरण करत असे. सात वर्षांचे असतानाच त्यांच्या मनात वैराग्याची भावाना निर्माण झाली. ते विठ्ठ्ल नाम गाऊ लागले, त्यांचा ध्यास विठ्ठलाकडे लागला होता. त्यांचा स्वभाव निर्भय, शीघ्रकोपी पण क्षमाशील होता. पांडुरंगाच्या नामस्मरणात त्यांना आनंद मिळत असे. 

एकेदिवशी त्यांची भेट पैठणचे संत एकनाथ महाराज यांचे शिष्ट परंपरेतील शिष्ट नारायणनाथ यांच्याशी झाली. त्यांनी अमरसिंह यांना आनंद संप्रदायाची दीक्षा दिली आणि जवळची गोधडी त्यांच्या अंगावर टाकून म्हणाले की यापुढे तुझे नाव गोदडनाथ.

भक्तांना आध्यात्मिक मार्गदर्शन
गोदड महाराज यांनी अनेक भक्तांना आध्यात्मिक मार्गदर्शन केले आणि त्यांच्या उपदेशांमुळे अनेक लोकांचे जीवन बदलले. त्यांच्या शिकवणुकीत भक्ती, ज्ञान आणि वैराग्य या तत्वांचा समावेश होता. त्यांनी लोकांना साधे आणि नैतिक जीवन जगण्याचे संदेश दिले.
 
गोदड महाराजांची संजीवन समाधी
गोदड महाराजांनी सातपुडा पर्वतावर १७ वर्षे खडतर तपश्चर्या केली. त्यांच्या कठोर साधनेमुळे त्यांना विठ्ठल रुक्मिणीने दर्शन दिले तसेच सातपुडा पर्वतावरील वजेश्वरी देवीनेही दर्शन दिले. पांडुरंगाच्या भेटीसाठी महाराज पंढरपूर येथे गेल्यानंतर तिथे त्यांचा एका तत्कालीन उच्चकुलीन मानल्या जाणाऱ्या स्त्रीकडून अपमान झाला. स्त्री चंद्रभागा नदीवर पाणी भरण्यासाठी घागर घेऊन आली असता तिचा पाय महाराजांच्या तम्बुच्या दोरीला अडकून ती पडली त्यामुळे तिने महाराजांचा अपमान केला.
 
त्यामुळे संतप्त महाराजांनी देहत्यागाची तयारी केली, परंतु भगवंताच्या साक्षात्कारी उपदेशाने त्यांना कर्जत ग्रामी येऊन तेथे समाधीस्त व्हावे अशी भगवंताची आज्ञा मिळाली. स्वतः पांडुरंगाने नित्यनियमाने तुला भेटायला कर्जत ग्रामी येईल असे वचन दिले. आषाढ कृष्ण एकादशीस प्रतिवर्षी रथोत्सव साजरा करावा. त्याच दिवशी स्वत: पांडुरंग येऊन तुम्हाला भेट देईल अशी ब्राह्मणवेशात पांडुरंगांची आज्ञा झाली.
 
नंतर त्यांनी कर्जत येथेच महासाध्वी उमाबाई शिम्पिनिच्या हस्ते दूध प्राशन करुन शके १७५९ माघ कृष्ण चतुर्थी मंगळवार रोजी माधान्य समयी कर्जत येथे संजीवन समाधी घेतली. विशेष म्हणजे महाराजांनी स्वतः जीवंत असतांना ही समाधी बांधून घेतलेली होती. आजही कर्जत येथून पंढरपूरला पालखी न जाता पंढरपुराहून कर्जत येथे पालखी गोदड महाराजांच्या भेटीस येते. महाराजांनी आपल्या जीवित काळात अनेक महत्त्वाचे तत्त्वज्ञान, अध्यात्म, वैद्यकशास्त्र यांसारख्या विषयांवर विपुल लेखन केले. त्यांच्या कर्जत येथील वास्तव्यात त्यांनी अनेक रुग्णांवर यशस्वी औषधी उपचार केले.
गोदड महाराजांचे ग्रंथ
गोदड महाराजांनी अनेक ग्रंथ लिहिले आहेत, त्यापैकी काही प्रमुख ग्रंथ खालीलप्रमाणे आहेत: 
श्रीमत दासबोध
अध्यात्म रहस्य
वैद्यक संग्रह
 
गोदड महाराज यांचे समाधी स्थळ कर्जत जिल्ह्यातील गोदड गावात आहे. येथे दरवर्षी यात्रा भरते आणि हजारो भक्त त्यांच्या दर्शनासाठी येतात. गोदड महाराज यांच्या शिकवणुकीचा प्रभाव आजही लोकांच्या जीवनात दिसून येतो आणि त्यांचे अनुयायी त्यांच्या शिकवणुकीचे पालन करतात.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

संत निर्मळाबाई माहिती