Marathi Biodata Maker

संत निवृत्तीनाथांचे अभंग 31 ते 40

Webdunia
सोमवार, 13 जून 2022 (12:43 IST)
आपुलेनि हातें कवळु समर्पी । ब्रह्मार्पण मुखीं ब्रह्मपणे ॥ १ ॥
सोपान सावंता निवृत्ति निधान । यासि जनार्दन कवळ देतु ॥ २ ॥
ब्रह्मपद हरि बाह्य अभ्यंतरीं । सर्वत्र श्रीहरि दिसे तया ॥ ३ ॥
देऊनि हस्तक पुशी पीतांबरें । पुसतसे आदरें काय आवडे ॥ ४ ॥
राहीरखुमाबाई कासवीतुसार । अमृत सार सर्वाघटी ॥ ५ ॥
निवृत्ति खेचर सोपान सांवता । हरि कवळु देतां तृप्त जाले ॥ ६ ॥
 
उपजे तें मरे मरे तें तें झुरे । जन्म येरझारे एकरूपें ॥ १ ॥
तें हें कृष्णनाम गोपीसंगें मेळे । नंदाघरी सोहळे बाळक्रीडा ॥ २ ॥
अमर अमरे अमर क्म्द खरे । होऊनि गोजिरें दूध मागे ॥ ३ ॥
निवृत्ति परिचार सर्व हा गोपाळ । पूजी दिनकाळ आत्माराम ॥ ४ ॥
 
धीराचे पैं धीर उदार ते पर । चोखाळ अमर अभेदपणें ॥ १ ॥
तें हें चतुर्भुज कृष्णरूपें खेळे । माजि त्या गोपाळें छंदलग ॥ २ ॥
किडाळ परतें चोखाळ अरुतें । मी माझें हे कर्ते तेथें नाहीं ॥ ३ ॥
निवृत्ति धर्मता विचारे चोखाळ । सर्वत्र गोपाळ सखा आम्हां ॥ ४ ॥
 
विश्रामधर्मता आश्रमपूर्णता । आपरूप कथा निमे जेथें ॥ १ ॥
तें हें कृष्णबाळ गोपिकांसि खेळे । नंदाघरीं सोहळें आनंदाचे ॥ २ ॥
कथा त्या कथितां पूर्ण त्या मथिता । अरूप अच्युता सर्व असे ॥ ३ ॥
निवृत्ति समाधान कृष्ण हें चोखडें । मनोनिग्रह खोड चरणीं गोवी ॥ ४ ॥
 
अकर्ता पैं कर्ता नाही यासी सत्ता । आपण तत्वता स्वयें असे ॥ १ ॥
तें रूप चोखाळ कृष्णनामें बिंबे । यशोदा सुलभें गीतीं गाय ॥ २ ॥
व्योमाकार ठसा नभीं दशदिशा । त्यामाजि आकाशा अवकाश होय ॥ ३ ॥
निवृत्ति म्हणे गुरु माझा पूर्ण ब्रह्म । उपदेश सुगम कृष्णनाम ॥ ४ ॥
 
सारासार धीर निर्गुण परतें । सादृश्य पुरतें हरिनाम ॥ १ ॥
तें हें कृष्णनाम यशोदेच्या घरीं । वनीं गायी चारी यमुने तटीं ॥ २ ॥
सुलभ आगमनिगम । तो हा आत्माराम गोपवेषें ॥ ३ ॥
निवृत्तीचे पार गयनीचें गुज । मज मंत्रबीज उपदेशिलें ॥ ४ ॥
 
स्थिर धीर निर सविचारसार । ब्रह्मांड आगर गोपवेषें ॥ १ ॥
तो हा कृष्ण सखा नंदाघरीं देखा । यशोदे सन्मुखा दूध मागे ॥ २ ॥
कळिकाळ कळिता काळ आकळिता । आपण स्वसत्ता विश्व हरी ॥ ३ ॥
निवृत्ति निकट ज्ञानदेव धीट । खेचरासि वाट गुरुनामें ॥ ४ ॥
 
नीट पाठ आम्हां धीट हा प्रबंध । जन वन बोध ब्रह्मरसें ॥ १ ॥
तें मेघःशाममूर्ति स्वरूप गोजिरी । गोकुळींची चोरी करि कृष्ण व २ ॥
मुद्दल शामळ नित्यता अढळ । अखंड अचळ स्वरूप ज्याचें ॥ ३ ॥
निवृत्ति पुरता गुरु विवरण गयनीची खूण आगमरूपें ॥ ४ ॥
 
पियूषी पुरतें कासवी ते विते । संपूर्ण दुभतें कामधेनु ॥१॥
तेंचि हें डोळस सांवळे सुंदर । यशोदे सकुमार बाळकृष्ण ॥२॥
मधुर क्षारता माधवीं अखंड । दिनकाळ प्रचंड आत्माराम ॥३॥
निवृत्तिचें ताट पियूष पुरतें । कांसवी दुभतें वाढियेसि ॥४॥
 
निर्दोषरहित सर्व गुणीं हेत । द्वैत विवर्जित अरूप सदां ॥१॥
तें रूप स्वरूप कृष्ण बाळलीला । माजि त्या गोपाळा सदा वसे ॥२॥
गुणागुणी धीट वासना अविट । तद्रूप प्रगट निरंजन ॥३॥
विकार विवर्जित विवरण सोपे । अकार पैं लोपे एका नामें ॥४॥
निःसंदेह छंद वासनेचा कंद । ब्रह्माकार भेद नाहीं सदा ॥५॥
निवृत्ति परिवार ब्रह्मरूप गोकुळीं । वृंदावन पाळी यमुनातटीं ॥६॥

संबंधित माहिती

सर्व पहा

नवीन

असितकृतं शिवस्तोत्रम् Asitakrutam Shivastotram

Somvar Mahadev Mantra Jap सोमवारी करा महादेवाच्या मंत्रांचा जप

महादेव आरती संग्रह

आरती सोमवारची

Shakambhari navratri 2025 शाकंभरी नवरात्र कधीपासून सुरू होते, या नवरात्रात आपण काय करावे?

सर्व पहा

नक्की वाचा

साप्ताहिक राशिफल 28 ते 3 जानेवारी 2025

घरात पैसा टिकत नाही? बाथरूमशी संबंधित या ४ चुका कारण असू शकतात, नक्की टाळा

जोडीदाराला भावनिकदृष्ट्या जोडण्यासाठी 6 ट्रिक्स, तुमचे नाते पूर्वीपेक्षा 10 पटीने खोल होईल

असितकृतं शिवस्तोत्रम् Asitakrutam Shivastotram

मारुती स्तोत्र : भीमरूपी महारुद्रा । वज्रहनुमान मारुती ।

पुढील लेख
Show comments