कां गा रुसलासी कृपाळू बा हरी । तुजविण दुसरी भक्ति नेणें ॥ दीन, रंक, पापी, दीन माझी मती । सांभाळा श्रीपती, अनाथनाथा ॥ आशा, मोह, माया लागलीसे पाठीं । काळ क्रोध-दृष्टीं पाहतसे ॥ सांवता म्हणे देवा, म्हणे नका ठेवुं येथे । उचलोनी अनंते, नेई वेगीं ॥१॥ माझी हीन याति...