Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Shani Pradosh Vrat 2023 शनि प्रदोष व्रताचे महत्त्व

Webdunia
शुक्रवार, 3 मार्च 2023 (16:54 IST)
यावेळी शनि प्रदोष व्रत 04 मार्च 2023 रोजी आहे. हिंदू कॅलेंडरनुसार, फाल्गुन शुक्ल पक्षाची त्रयोदशी तिथी 04 मार्च रोजी सकाळी 11:43 वाजता सुरू होईल आणि 05 मार्च रोजी दुपारी 02:07 वाजता समाप्त होईल. प्रदोष कालात प्रदोष व्रताच्या दिवशी भगवान शिवाची आराधना केली जाते.
 
प्रदोष व्रत प्रत्येक महिन्याच्या त्रयोदशी तिथीला पाळले जाते. अशा प्रकारे एका महिन्यात दोन प्रदोष व्रत असतात, एक शुक्ल पक्षात आणि दुसरा कृष्ण पक्षात. धार्मिक मान्यतेनुसार संतान प्राप्तीसाठी शनि प्रदोष व्रत ठेवले जाते. या दिवशी भगवान शंकराकडून योग्य अपत्यप्राप्तीसाठी शुभेच्छा दिल्या जातात.
 
प्रदोष व्रताच्या दिवशी शिवाला बेलची पाने, भांग, शमीची पाने, धतुरा, गंगाजल, गाईचे दूध, पांढरे चंदन इत्यादी अर्पण करावे. त्यानंतर भोलेनाथांना प्रसन्न करण्यासाठी शिव चालीसा, शिवस्तोत्राचे पठण करावे. या दिवशी तुम्ही शिव मंत्रांचा जप देखील करू शकता. त्यानंतर भगवान शंकराची आरती करावी. मग शेवटी, उपासनेतील उणीव किंवा त्रुटीबद्दल क्षमा प्रार्थना करावी.
 
पूजा पद्धत
शनि प्रदोष व्रत पाण्याचे सेवन न करता केले जाते.
सकाळी स्नान केल्यानंतर भगवान शिव, पार्वती आणि नंदी यांना पंचामृत आणि पाण्याने स्नान घालावे.
त्यानंतर गंगाजलाने स्नान केल्यानंतर सुपारीची पाने, चंदन, अक्षत, तांदूळ, फुले, धूप, दिवा, नैवेद्य, भोग, फळ, पान, सुपारी, लवंग आणि वेलची अर्पण करावी.
संध्याकाळी सूर्यास्ताच्या वेळी पांढरे वस्त्र धारण करुन शिवाची पूजा केली पाहिजे.
विविध फुलांनी आणि बेलपत्र वाहून महादेवाला प्रसन्न केले पाहिजे.
शिव पूजा केल्यानंतर आरती, भजन, स्तुती करावी. याने सर्व मनोकामना पूर्ण होतात.
शनिवार असल्याने या व्रत करणार्‍याने शनि महाराजाच्या निमित्त पिंपळाच्या झाडाला पाणी द्यावे.
शनि स्तोत्र आणि चालीसा पाठ करणे देखील शुभ ठरतं.

संबंधित माहिती

या मंदिरात अर्जुनाला मिळाले विजयाचे वरदान, जाणून घ्या कोणते

आरती मंगळवारची

Morning Mantras सकाळी उठल्यावर या 4 मंत्रांचा उच्चार करा, सर्व अडचणी दूर होतील

तुम्हालाही मंगळवारचे व्रत करायचे असेल तर आधी या गोष्टी जाणून घ्या

दुपारी मंदिरात का जाऊ नये? माहित नसेल तर नक्की वाचा

CAA: CAA अंतर्गत 14 लोकांना दिले नागरिकत्व प्रमाणपत्र,गृह मंत्रालयाची माहिती

लोकसभा निवडणूक 2024:उद्धव ठाकरेंना मानसोपचारतज्ज्ञाची गरज असल्याचे म्हणत फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्ला

अफगाणिस्तानच्या पूरग्रस्तांसाठी कतारने मदत सामग्री पाठवली

दिंडोरी सभेत पंतप्रधान मोदींनी केला राष्ट्रवादी आणि शिवसेना काँग्रेसमध्ये विलीन होण्याचा दावा

15 वर्षांच्या मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, प्रेयसीसाठी पत्नीला सोडले होते

पुढील लेख
Show comments