Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

।। श्री गजानन महाराज नमस्काराष्टक ||

Webdunia
योगी दिगंबर विरक्तविदेही संत ।
उद्यान भक्तितरुचे फुलवी वसंत ।।
शेगांव क्षेत्र बनले गुरुच्या प्रभावे ।
वंदू गजानन पदांबुज भक्तिभावे ।।१।।
ओहोळ घाण जल वाहत विषयांचे ।
भावार्थ तोय स्फटिकासम तेथ साचे ।।
तुंबी तुडुंब भरले किती स्तोत्र गावें ।
वंदू गजानन पदांबुज भक्तिभावे ।। २ ।।
संत्रस्त पंक्तिस करी बहु काकपंक्ती ।
गेली क्षणात उठुनी परसोत उक्ती ।।
आत्मैक्य हे गुरूवरा, प्रचितीस यावे ।
वंदू गजानन पदांबुज भक्तिभावे ।।३।।
पेटूनी मंचक धडाडत अग्निज्वाला ।
मध्ये सुशांत गुरुमूर्ति न स्पर्श झाला ।।
ते योग वैभव पुन्हा नयना दिसावे ।
वंदू गजानन पदांबुज भक्तिभावे ।।४।।
तारीयली सहजची तरि नर्मदेत ।
देवी सदिव्य प्रकटे नवलाव होत ।।
ज्याच्या कृपे भवजली तरुनीच जावे ।
वंदू गजानन पदांबुज भक्तिभावे ।।५।।
जे ब्रह्म ब्रह्मगिरीला कळले न साच ।
पांडित्य मात्र नुसते उरला तसाच ।।
त्या सांगती नित मुखे हरीनाम घ्यावे ।
वंदू गजानन पदांबुज भक्तिभावे ।।६।।
बाधे तृषा गुरुवरा जल ना मिळाले ।
खाचाड रूक्ष असतां झणि तोय आले ।।
प्रार्थू पदीं हृदय भक्ति जले वहावे ।
वंदू गजानन पदांबुज भक्तिभावे ।।७।।
स्वामी समर्थ जगती अवतार घेती ।
कष्टोनि धेनु व्दिज धर्मचि रक्षिताती ।।
घ्या धेनुदास पदरी जरी पापि ठावें ।
वंदू गजानन पदांबुज भक्तिभावे ।। ८ ।।

संबंधित माहिती

Ram Navami 2024: भारतातील प्रमुख राम मंदिर, दर्शन घेण्यासाठी जा अवश्य

भंडारा कोणी खाऊ नये? नियम जाणून घ्या

Ram Navmi 2024 रामनवमीला काय खावे आणि काय खाऊ नये?

Shri Ram 108 Names श्री रामाची 108 मुख्य नावे आणि त्यांचे अर्थ

Ramnavami recipe : रामनवमी स्पेशल रेसिपी श्रीखंड

तृणमूल काँग्रेसने निवडणूक जाहीरनामा प्रसिद्ध केला

शिंदे यांचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्यात ट्रान्सजेंडर मतदारांची संख्या सर्वाधिक

प्रसिद्ध यूट्यूबर अभ्रदीप साहा यांचे निधन

GT vs DC:दिल्ली कॅपिटल्सने गुजरातचा 6 गडी राखून पराभव केला

T20 World Cup 2024 : T20 विश्वचषक 2024 साठी टीम इंडियाची 20 नावे उघड, या खेळाडूंचा समावेश

पुढील लेख
Show comments