Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

श्री गोरक्ष किमयागिरी प्रवाह - भाग ८

Webdunia
२२ माया - योग
 
॥ सिंहलीसी जाई । मुक्ता मैनाकीनी । बंगाल्यासी चाले मच्छिंदरु ॥९०॥
॥ मार्गीच तयांसी । भेटे कानीफा तो । तपस्वी बैसला । केदारासी ॥९१॥
॥ ग्रामी जातां प्रेमी । गोरक्षु भेटत । जालंधरू वृत्त । कथी सारे ॥९२॥
॥ हेलापट्टणासी येतां मैना सती । भेटे स्वागतेंसी । जालंधरी ॥९३॥
॥ तेथोनीयां क्रमू । जगन्नाथ धाम । येथें घडे वामु । कार्य देखा ॥९४॥
॥ मीननाथें हात । पाय विष्ठावंत । गोरक्ष ते धूत । चर्म त्याचे ॥९५॥
॥ कृत्य घोर करी । जीवे घेई बाळ । मच्छिंद्र आकांत । आक्रंदिला ॥९६॥
॥ मीन-चर्म पाही । आवरेना ताता । गोरक्षाते दोषा । खूप वोपी ॥९७॥
॥ बाळासी उठावूं । संजीवनी जप । गोरक्षहि तप । तेंवी सेवी ॥९८॥
॥ मच्छिंदरू मीनू । मायावी जीवन । देखोनीयां लीनू । पायी होवूं ॥९९॥
॥ माया मोहा संगे । संचारू जीवासी । योगीयांते जडे । माया योग ॥१००॥
 
२३ गोरक्ष किमयागिरी
 
॥ तेलंगणी येती । गोदा संगमांती । वाल्मीकीचे प्रांती । त्रयोयती ॥३०१॥
॥ रानी, वनी, स्थानी । चोरां चिलटांनी । भये, मोहे, वनी । दीनें केली ॥३०२॥
॥ गुरु शिष्य सवें । परीस कसोटी । परस्परी पोटी । लाविताती ॥३०३॥
॥ मच्छिंद्राचे गांठी । छाटी मैनाकीने । सोनीची विटू । ठेवीयेली ॥३०४॥
॥ गोरक्षे लेईली । मच्छिंद्राची झोळी । गुरु-शिष्या झाली । परिक्षीती ॥३०५॥
॥ कांखे घेई झोळी स्कंधी । मीनु बाळ । वाटे चोर पोळी । पीकूं आली ॥३०६॥
॥ सोनीयाची वीटू । वाटेसी टाकावी । परीक्षा परीसू । होईल तो ॥३०७॥
॥ गुरुची करावी । पारख, मोहावा । वाण बाण व्हावा । सोनीयाचा ॥३०८॥
॥ टाकोनीयां वीट । भये घालवीलें । कांतारी लुटारू । तस्करांचे ॥३०९॥
॥ गोरक्षाची घाई । पुढें धांवायाची । गुरु मागें राही । गांठू पाहे ॥३१०॥
॥ म्हणे गुरु-राजा । ‘वीटु पाहू देई’ । ‘पीछे डर गई’ । शिष्यो बोले ॥३११॥
॥ फेकीली मी वीट । पत्थर की नेणें । सोनें, नाणें, मातें । सरी एकी ॥३१२॥
॥ ‘सोनीयाचे दु:ख । होई काई, गुरो ! गर्भाद्रि हा पावो । स्वर्णूरूपू ॥३१३॥
॥ वृक्ष, वल्लरी त्या । पर्णे, पुष्पें, खोडे । दगड, नी माती । स्वर्ण देखे ॥३१४॥
॥ गोरक्ष किमया- । गिरी गर्भाद्रीसी । भानू कवी पाही । वर्णायाते ॥३१५॥
॥ देवां, साधु, संतां । भंडारें भरवी । षड्रसी जेववी । पव्कान्नांनीं ॥३१६॥
॥ गहीनी, मीनांसी । पाचारीले तेथु । प्रसादें भरीतु । किमयागारी ॥३१७॥
 
२४ समाधी - कबरी
 
॥ उमानाथां हाती । गहीनीसी दीक्षा । देववी गोरक्षा । भद्रागीरी ॥३१८॥
॥ सुवर्णू पर्वतु । कुबेरासी देतु । इये पर्वतासी । आद्या नाथु ॥३१९॥
॥ आद्यानाथु राही तैसा मच्छिंदरू । मढीं-मठीं राही । पाही पुढें ॥३२०॥
॥ महि-मठी तैसा । जालंधरू नाथु । नागनाथु तेवी । वडिनानळी ॥२१॥
॥ गोरक्षु गर्भाद्री । रेवणु विटयांतु । येवोनी रहातु । मधूसह ॥२२॥
॥ सर्वानीं समाधी । येथें वरीयेली । शके दहाशती । भानू मती ॥२३॥
॥ यावनी संस्कृती । कबरी त्या मानी । पीरू-रूपें तदा । समधीसी ॥२४॥
॥ जानपीर झाले । जालंधर नाथु । गैबी पीर तेंवी गहीनी तो ॥२५॥
॥ मायाबा मच्छिंद्रा । कान्होबा कानीफा । समाधी कबरी । बनविल्या ॥२६॥
॥ सटवी अटवी - । माजी रक्षिताती । दर्शनाते येती । यती योगी ॥२७॥

संबंधित माहिती

सर्व पहा

नवीन

मार्गशीर्ष गुरुवारी महाविष्णूच्या पूजेचे महत्त्व आणि उपासनेची सोपी पद्धत जाणून घ्या

Avoid on Wednesday बुधवारी ही कामे करु नये

आरती बुधवारची

Margashirsha 2024 मार्गशीर्ष महिन्यात काय करावे?

हे 3 गुण असलेल्या महिला भाग्यवान असतात, नवरा आणि सासरचे लोक नेहमी आनंदी राहतात !

सर्व पहा

नक्की वाचा

मार्गशीर्ष गुरुवारी महाविष्णूच्या पूजेचे महत्त्व आणि उपासनेची सोपी पद्धत जाणून घ्या

हे 3 गुण असलेल्या महिला भाग्यवान असतात, नवरा आणि सासरचे लोक नेहमी आनंदी राहतात !

घरात या 5 पक्ष्यांचे फोटो लावा, ज्ञान- समृद्धी वाढते, तिजोरी धनाने भरलेली राहते

आपले नाते कसे मजबूत करावे, 5 गोष्टी लक्षात ठेवा

त्वचेच्या कर्करोगाच्या संरक्षणासाठी हे उपाय खूप प्रभावी आहेत

पुढील लेख
Show comments