Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

मल्हारी मार्तंड विजय अध्याय एकोणिसावा

मल्हारी मार्तंड विजय अध्याय एकोणिसावा
, बुधवार, 4 डिसेंबर 2024 (12:36 IST)
॥ श्रीमार्तंड भैरवाय नम: ॥ मग सनत्कुमारा प्रति ॥ प्रश्न केले ऋषि मूर्ति ॥ प्रेमपूरीचे आम्हाप्रति ॥ तीर्थ महिमा सांगा जी ॥१॥
सनत्कुमार बोलता ॥ साडेतीन कोटि तीर्थ ॥ तेथील महिमा अद्भुत ॥ ब्रह्मादिकां न वर्णवे ॥२॥
त्यांतील मुख्य तीर्थ ॥ ती ती सांगेन यथार्थ ॥ तुम्हीं आतां श्रवणार्थ ॥ मन एकाग्र करावे ॥३॥
देवाचे उत्तरभागेस ॥ शक्तिकुंड नाम त्यास ॥ पर्वकाळी मौन्य स्नानें पातकनाश ॥ मूळ लिंग मारी दर्शनें ॥४॥
देवाचे अग्निकोनाला ॥ गयातीर्थ नाम त्याला ॥ एक पदीं तीळ दर्भ अर्पिला ॥ स्नाने पितृ संतोषतो ॥५॥
धनोत्सव नगरीचा ॥ पुत्र चंद्रानन नाम वैश्याचा ॥ उत्कट दुर्भति स्वभाव त्याचा ॥ विक्रय पातकें काक जाहला ॥६॥
अर्ध-जोंधळा चोचींत घेऊन ॥ जात होता उडोन ॥ गयातीर्थी पडतां जाण ॥ पित्रासह स्वर्गी गेला ॥७॥
उत्तरभागीं कपिल तीर्थात ॥ कपिलाषष्ठीस स्नान जे करीत ॥ प्रत्यक्ष मार्तंड दर्शन घेत ॥ देहासह स्वर्गी जाय ॥८॥
देवाचे ईशान्यकोन ॥ तीर्थ गुप्तलिंग म्हणोन ॥ स्नानेमात्रें पातक नाशन ॥ तात्काळचि होतसे ॥९॥
पूर्वी स्वारोचिष मनूंत ॥ नमो महा बाहू प्रयाग क्षेत्रांत ॥ दरिद्रें पीडिला बहुत ॥ म्हणोनि चोरी करुं लागला ॥१०॥
दहा ब्राह्मण वधुवरें सात ॥ आणि मारिलें कन्यासप्त ॥ वैश्य शूद्र पांथिक अगणित ॥ धनास्तव वध केले ॥११॥
त्यासी व्याघ्रानें भक्षिला ॥ पित्रासहित नरका गेला ॥ गर्दभ योनिप्रति आला ॥ नागचूल नगरामध्यें ॥१२॥
सोमदत्त नामाभिधान ॥ यात्रेस खर आणिला त्यानें ॥ दिधला खुंटेस बांधोन ॥ षष्ठी उत्साह पाहूं गेला ॥१३॥
गर्दभ जाहला तृषाक्रांत ॥ देखिला घट जळभरित ॥ पाय लागोनि घट फुटत ॥ तृषेनेंच प्राण गेला ॥१४॥
मल्ल तीर्थाचे जल स्पर्धा झाले ॥ पित्रासहित स्वर्गा गेले ॥ पुनरपि उर्वीस आले ॥ सार्वभौम राज्य करी ॥१५॥
पापनाशी दक्षिण भागांत ॥ स्नान करितां पातक जात ॥ त्या समीप नदी कुंडांत ॥ स्नानें लक्ष गोदान फळ ॥१६॥
ईशान्य कोणास रुद्रकुंड ॥ तेथे स्नान करितां अखंड ॥ घेतां दर्शन मार्तंड ॥ जन्ममरण तुटोनि जाय ॥१७॥
इंद्रस्थळी शंभुदत्त ब्राह्मण ॥ केले कर्मचि पुन्हां करणें ॥ त्याचे निघोनि जातांचि प्राण ॥ नरक तथासि प्राप्त झाला ॥१८॥
कीटकयोनीशत भोगिले ॥ पक्षीयोनींत जळ प्राशिलें ॥ ब्राह्मणयोनी प्राप्त जाहले ॥ उत्पन्न ज्ञानी जाहला ॥१९॥
देवाचे उत्तर भागेसी ॥ अंबुधारा नाम तीर्थासी ॥ स्नान करितां पातक नाश ॥ अनंत जन्मांतरीचे ॥२०॥
अवंती नगरीं कंदर्पनामा ॥ राजा स्त्रीरत बहुकामा ॥ मृत्यु पावतां नेऊन यमा ॥ नरक कुंडी घातलें ॥२१॥
मग भ्रमरयोनीस येऊन ॥ अंबुधारा बिंदु पडून ॥ पुष्पासवें दर्शन घडून ॥ मार्तंड भैरवाचे ॥२२॥
भ्रमरयोनि मुक्त जाहला ॥ स्वर्गलोकाप्रति गेला ॥ पुनरपि राज्य भोगिला ॥ सार्वभौमा अवनीवरी ॥२३॥
इति श्रीक्षेत्रखंड ब्रह्मांडपुराण ॥ मल्लारिमाहात्म्य व्यास कथन ॥ त्यातील सारांश प्राकृत भाषण ॥ माणिकदास बोलिला असे ॥२४॥
श्रीमाणिकप्रभुकृतटीकायां अष्टतीर्थवर्णनो नाम एकोनविंशोऽध्याय: ॥१९॥
ALSO READ: मल्हारी मार्तंड विजय अध्याय विसावा

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

मल्हारी मार्तंड विजय अध्याय अठरावा