Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

श्री परशुराम माहात्म्य अध्याय १

Webdunia
श्रीगणेशाय नमः ॥ श्रीरामचंद्राय नमः ॥
अथ परशुराम चरित्र कल्पतरु प्रारंभः ॥
ओं नमोजी लक्ष्मी केशवा कुळदेव माझे देवा घ्यावी आमुची सुसेवा सर्वाभिष्ट दातारा ॥१॥
तुझे नामस्मरणेंची विघ्नें नासती परीची जाणोन देवऋषि हेंची स्मरती आदि अंतीं ॥२॥
कृपानिधी विश्वनाथा सुरादिका विघ्नहर्ता नारायणा अभयदाता प्रकाश करी मज ॥३॥
अनंत ब्रह्मांडाचा नायक तूंचि विघ्नांचा अंतक तुज वंदिती जे लोक कार्यसाधे तयांचें ॥४॥
सर्व कार्याचा आधारु तूंचि रुपेचा सागरु करुणाब्धी लक्ष्मीवरु मति प्रकाशिजे ॥५॥
तूं होय द्विजदैवत तुझीं नामें ब्रह्मकर्मांत चतुर्विंशती मुख्य मत शुभाशुभींच्या प्तपैं ॥६॥
तूं सर्वज्ञ सर्वोत्तम परब्रह्म त्‍हृदयींधाम रुद्रेंद्रादिका सर्वकाम देशी पुरुषोत्तमा ॥७॥
तुझेचिया सुप्रसादें तुज वर्णावया बुद्धि दे देवा येवढा वर दे कैसे तरी करोनि ॥८॥
तुज आलों मी शरण पद्मनाभात्वच्चरण आश्रयी तो विश्‍वतारण जेणें मृत्यृही टळे ॥९॥
तूं परमात्मा देव देव ह्मणती तुज ब्रह्मनाव तंवब्रह्मीं बहू जीव देव मनुष्यादिक ॥१०॥
अभक्त आणि वैष्णव वरा वरत्यात जीव कलौ मर्त्यानसे आव विशेषीगात्वद्भक्ता ॥११॥
कृपासिंधू तूं भक्तासी ह्मणोन आलों पदासी तूं भक्तवत्सल जगतासी व्याप्त तुज नमोस्तुते ॥१२॥
प्रजेश पूर्ण प्रज्ञ नरोत्तम अनंतशेष संकर्षण आणि जे का ब्रह्मनंदन असोन मन तयासी ॥१३॥
आतां सरस्वती नमन ध्यानसहित करीन ब्रह्माणी वाणी प्रार्थुन ग्रंथोत्तम रचिजे ॥१४॥
करी भक्त नमस्कारु मूर्ती पाहे ध्यानी नरु चतुर्भुज वीणा थोरु सामवेदे नादित ॥१५॥
करि द्वये वेदभारु भये तर्क मुद्रा करु तुर्य हरुनी पद्मवरु मुखचंद्र केवळ ॥१६॥
उटी पुष्पें परिमळ अतर्क वस्त्र अमोळ सिंहासनीं सुसोज्वळ भाळी कुंकुम शोभतें ॥१७॥
ब्रह्म यशमाळा गळा विग्रह बहू कोवळा जैसा दिसे लोणी गोळा ज्ञान तेज भव्यचि ॥१८॥
त्‍हृदयीं ध्यान पाहोनी मागे इच्छा तो नमोनी देती जाली सत्कृपेनी विद्यामाता भारती ॥१९॥
श्रीवेद व्यास मुनीसी ध्यान साष्टांग मानसीं अत्यंत प्रेमें लक्षेंसी त्दृत्कमळीं ध्यातसे ॥२०॥
कृष्णाजिन वस्त्रेंसी वेष्टीलें वस्त्र कटीसी जटामुगुट शिरसी सूत्र आंगीं झळके ॥२१॥
पद्माक्ष तुलसी काष्ठ आवळा यांच्या माळा करी गळा कर्णीं शोभती कुंडला शिरीं धृत तुलसी ॥२२॥
वैकुंठी चर्चिली अंगा । द्वादश टिळे काढले चांगा बहुवेद तंत्रें वागां देहीं मुद्रा शोभती ॥२३॥
सहस्त्रादित्य संकश हास्यमुख अति सुरस आदि कारण ते वेदास प्रसाद सुचवी ॥२४॥
नाना शिष्य संभोवते विद्या पढती सर्वते विचारिती संशयातें त्यांसी सर्व विस्तारी ॥२५॥
तर्क मुद्रा वरदहस्त ब्रह्मादिक जेथें स्वस्त स्वानंद पतिध्यानस्थ एवं व्यासा नमोस्तुते ॥२६॥
ऐसे व्यास नारायण विश्‍वाचे गुरु निर्गुण त्यासी मी ध्यायिलें पूर्ण मागावया इच्छित ॥२७॥
श्रीगुरु तूं भक्तकाज मी मतिमंद नाहीं ओज काव्य करावया सहज तुमच्या कृपे इच्छितों ॥२८॥
तुमचें नाम नारायण नामा माजी श्रेष्ठ जाण सर्व पातकाचें हरण हेंचि नामें करुनी ॥२९॥
हेंचि मोक्षाचें साधन संन्यास्यासी मुख्य ध्यान सकळ ****चे निधान पुरुषार्थ येणेंचि ॥३०॥
जैसा वेदांत प्रणव जाण कीं अष्टादशा भागवत पुराण क्षेत्रीं जैसें आनंदवन देवांमाजी इंद्र जैसा ॥३१॥
वृक्षां मध्यें अश्‍वत्थ तुलसी व्रतामाजी एकादशी विष्णुपदी तीर्थांत जैसी तैसे अनुपम नारायण ॥३२॥
महीमा नारायण नामाचा सांगूं न शके ब्रह्मासाचा हे उच्चारिती जे वाचा आमुचा त्यांसी प्रणाम ॥३३॥
इह सद्गुरु पितृमातेसी साष्टांग करुनी त्यांसी वदतों परशुराम चरित्रासी भगवत्प्रसादें ॥३४॥
नाना पुराणाच्या कथेतें घेउनि करितों ईश **** भाविकांचीं आहेत मतें कथासुरस रचावया ॥३५॥
ईशभक्त कोणी एक श्रीकेशवात्मज शुक दांडेकरोप नामक दिव्यग्रंथ वदतसे ॥३६॥
शुक बैसला शाखेसी कवित्वाच्या अहिर्निशीं सकळ श्रोते संतासी नमोनी सर्वदा ॥३७॥
वेदाभ्यासी संन्यासी यती योगे‍श्‍वर ब्राह्मणासी सदा ध्याती श्रीहरीसी तया नमन करितों ॥३८॥
विनवीतसें समस्तांसी अल्पमती आपणासी माझे बोबडे बोलासी सकळ तुह्मी अंगीकारा ॥३९॥
कृपा करुनि पंडितांनीं मान्य करावें सुमनीं शुकाचे शब्द मानुनी ग्रंथ महिमा वाढवावा ॥४०॥
तावन्मात्र माझी मती नेणो काव्य व्युत्पत्ती जैसें गुरु निरोपिती तेणे परी सांगतों ॥४१॥
हें परशुराम चरित्र केलें अमृताचें सत्र तृप्त व्हा श्रोते पवित्र सावधान परिसिजे ॥४२॥
नमो नमो गुरुवर्या नमो नमो श्रीहरि पाया नमो नमोते कृपया मनोरथ पूरवी नमोस्तुते ॥४३॥
स्वस्ती श्री परशुरामविजय कल्पतरु वर्णितां महात्म्य अपारु ऐकतां निः पाप होती नरु प्रथम नमनाध्याय गोड हा ॥१॥श्रीकृष्णार्पणमस्तु ॥

संबंधित माहिती

सर्व पहा

नवीन

Thursday remedy गुरुवारी या प्रकारे करा दत्तात्रेयाची पूजा, परीक्षेत यश मिळेल

आरती बुधवारची

बुधवारचा दिवस गणेशाला का समर्पित केला जातो, जाणून घ्या

मंदिरात जाण्यापूर्वी केस का धुवावेत ?

मंगळवार : वारांचे उपवास आणि व्रत कैवल्य

सर्व पहा

नक्की वाचा

मंदिरात जाण्यापूर्वी केस का धुवावेत ?

अभ्यासाचे टेबल कसे असावे? वास्तु टिप्स जाणून घ्या

योनिमार्गाच्या खाज सुटण्याने त्रास होतो का या 3 उपायांनी काही मिनिटांत आराम मिळेल

पंचतंत्र कहाणी : विश्वासघाताचे फळ

आरोग्यवर्धक व्हेजिटेबल ज्यूस

पुढील लेख
Show comments