जो जो जो जो रे श्रीरामा। निजसुख गुण विश्रामा॥ ध्याती मुनी योगी तुजलागी। कौसल्या वोसंगी॥ वेदशास्त्रांची मती जाण। स्वरुपी झाली लीन॥ चारी मुक्तींचा विचार। चरणी पाहता थोर॥ भोळा शंकर निशिदिनी। तुजला जपतो ध्यानी॥ दास गातसे पाळणा। रामलक्षुमणा॥...