Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

रविवार: या गोष्टी लक्षात ठेवा, पूर्ण आठवडा आनंदी राहाल

sunday upay
Webdunia
आपल्या कुंडलीत सूर्य दुर्बळ पडू नये आणि आपल्याला अनिष्ट काळ पाहवा लागू नये यासाठी रविवारी अर्थातच सूर्य वारी काही काम असे आहेत हे करणे टाळावे. ज्यानेकरुन आपला पूर्ण आठवडा आनंदात पार पडू शकतो.
 
आपल्या शास्त्रात बर्‍याच अशा गोष्टी आहेत ज्या अशुभ मानल्या जातात. त्यामुळे तुम्हाला देखील हे माहीत असलं पाहिजे की रविवारी कोणते असे कामं आहे जे मुळीच करू नये.
 
* रविवारी सूर्यास्तापूर्वी मीठ वापरू नये. अर्थात मिठाचा उपयोग टाळावे. हे अशुभ मानलं जातं.
* रविवारी तामसिक खाद्य पदार्थ तसेच मास-मदिरा यापासून लांबच राहावे. हे सेवन केल्याने सूर्याच्या दुष्प्रभाव जागृत होत असतो.
* रविवारी गरज नसल्यास बूट घालू नयेत.
* रविवारी मोहरीच्या तेलाने डोक्याची मालीश करू नये. 
* या दिवशी दूध तापवताना ऊतु जाऊ नये किंवा जळू नये याची देखील काळजी घ्यावी.
* या दिवशी दुपारी शारीरिक संबंध देखील बनवू नये.
* रविवारी पिंपळाची पूजा करू नये तसेच पिंपळाच्या झाडाला जल अर्पित करू नये. या दिवशी त्यात दारिद्र्याचा वास असल्याचे मानले गेले आहे.
* रविवारी तुळस तोडू नये तसेच तुळशीच्या झाडाला पाणी घालू नये.
* या दिवशी तांब्याची कोणतीही वस्तू खरेदी करू नये तसेच विकू देखील नये. शक्योतर तांबा निर्मित वस्तू वापरू देखील नये.
* रविवारी निळा, काळा, ग्रे रंग परिधान करणे देखील टाळावे.
 
तर ही तर झाली माहिती काय करू नये आता हे जाणून घ्या की काय करावे

* रविवारी सूर्य आणि भैरव नाथ पूजनाचे विशेष महत्त्व आहे.
* या दिवशी सकाळी अंघोळ करून सूर्याला मंत्र उच्चारण करत अर्घ्य द्यावे.
* या दिवशी सूर्य मंत्र आणि भैरव मंत्र जपावे.
* या दिवशी तांबा खरेदी किंवा विक्री करू नये परंतू तांबा, गूळ, लाल चंदन, सूर्य महिमा दर्शवणार्‍यां पुस्तक दान कराव्या. याने सर्व अडचणी दूर होतात आणि यश प्राप्ती होते.

संबंधित माहिती

सर्व पहा

नवीन

शनिवारी हे 5 मंत्र जपा, शनीची कृपादृष्टी मिळवा

आरती शनिवारची

पापमोचनी एकादशी व्रत कथा Papmochani Ekadashi Vrat Katha

Holi Arti होळीला या आरत्या म्हणा, देवांची आराधना करा

पापमोचनी एकादशी २०२५: योग्य तारीख, शुभ वेळ आणि पूजेची पद्धत जाणून घ्या

सर्व पहा

नक्की वाचा

पापमोचनी एकादशी २०२५: योग्य तारीख, शुभ वेळ आणि पूजेची पद्धत जाणून घ्या

मंगळसूत्र आणि भांग भरणे विधी

शनी गोचरमुळे या ३ राशींचे भाग्य बदलेल, सूर्य आणि बुध ग्रहाच्या कृपेने ते होतील श्रीमंत

श्री अक्षरावरून मुलांची नावे अर्थासकट

तेनालीराम कहाणी : तेनाली राम आणि रसगुल्लाचे मूळ

पुढील लेख
Show comments