Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

ऑक्सिजन प्रदान करणार्‍या 20 झाडांचे आध्यात्मिक रहस्य

Webdunia
बुधवार, 19 मे 2021 (08:36 IST)
प्रत्येक धर्मात झाड, वृक्ष, रोपं याचं महत्त्व असतं. परंतु मनुष्य याकडे मुळीच लक्ष न देता दिवसेंदिवस वृक्षांची कापणी सुरुच आहे. या कृत्यामुळे पर्यावरणातील संतुलन बिघडत असून जीवनात संकट वाढत आहे. पृथ्वीवर ऑक्सिजनचं निर्माण करणार्‍या वृक्षांची भूमिका महत्त्वाची आहे. झाडं नसतील तर एक दिवस वायू नसणार मग निश्चितच मानव नसणार. चला झाडाचे 20 रहस्य जाणून घेऊया.
 
1. धर्मग्रंथानुसार जो मनुष्य एक पिंपळ, एक कडुलिंब, दहा चिंच, तीन कॅथ, तीन बेल, तीन आवळा आणि पाच आंब्याची झाडे लावतो तो संत आहे आणि त्याला नरक कधीही भोगावं लागणार नाही. त्याचप्रमाणे शास्त्रात वृक्षांसह निसर्गाच्या सर्व घटकांचे महत्त्व यावर चर्चा करण्यात आली आहे.
 
2. भारतीय धर्माप्रमाणे निसर्ग हा देवाचा पहिला प्रतिनिधी आहे. निसर्गाचे सर्व घटक देवाच्या अस्तित्वाचा अहवाल देतात. म्हणूनच निसर्गाला देवता, देव आणि पिता मानले जाते. येथे प्रत्येक देवी आणि देवता वृक्ष, प्राणी किंवा पक्षी यांच्याशी संबंधित आहेत. ग्रह आणि नक्षत्र देखील जोडलेले आहे. धर्माप्रमाणे दूरस्थ स्थिति ध्रुव तारा देखील आमचं जीवन संचालित करत आहे. मग हिमालयाच्या ग्लेशियर व चंद्राबद्दल काय म्हणावे. संपूर्ण ब्रह्मांड एकमेकाशी जुळलेलं आहे. एक तार जरी खंडित झाला तरं सर्व काही विस्कटून जाईल. हे विश्व एक उलट झाडासारखे आहे.
 
3. धर्मानुसार यज्ञाचे पाच प्रकार आहेत, त्यापैकी देवयज्ञ आणि विश्वदेवयज्ञ हे दोन यज्ञ निसर्गाला वाहिलेले आहेत. दोन्ही प्रकारच्या यज्ञांचे वैज्ञानिक आणि धार्मिक महत्त्व आहे. देवयज्ञाने हवामान आणि वातावरण सुधारते तर वैश्वदेवयज्ञ निसर्ग आणि प्राण्यांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा एक मार्ग आहे. सर्व प्राणी आणि झाडे यांच्याबद्दल करुणा आणि कर्तव्य समजणे, त्यांना अन्न-पाणी देणे यालाच भूतयज्ञ किंवा वैश्वदेव यज्ञ असे म्हणतात.
 
4. हिंदू धर्माच्या अनुसार, झाडाला देखील आत्मा असते. वृक्ष संवेदनशील असतात व त्यांच्या शक्तीशाली भाव या माध्यामातून आपलं जीवन बदलू शकतात. प्रत्येक झाडाचे सखोल विश्लेषण करून आमच्या ऋषींनी हे शोधले की पिंपळ आणि वडाची झाडे काहीतरी खास आणि वेगळी आहेत. ही पृथ्वीवर असल्यामुळे पर्यावरणाचे संरक्षण होतं. हे सर्व जाणून घेतल्यावर त्यांनी या वृक्षांच्या संरक्षणासाठी आणि मानवांच्या हितासाठी काही कायदे बनवले आहेत, त्यातील दोन म्हणजे पूजा आणि परिक्रमा आहेत.
 
5. स्कन्द पुराणात वर्णित पिंपळाच्या वृक्षात सर्व देवतांचा वास असतो. पिंपळाच्या सावलीत ऑक्सिजनने भरपूर आरोग्यवर्धक वातावरण निर्मित होतं. या वातावरणापासून वात, पित्त आणि कफाचे प्रमाण कमी केले जाते आणि तिन्ही स्थितींचे संतुलनही राखले जाते. याने मानसिक शांती प्राप्त होते. प्राचीन काळापासून पिंपळाच्या झाडाची पूजा करण्याचं विधान आहे.
 
6. अथर्ववेदाच्या उपवेद आयुर्वेदात पिंपळाच्या औषधी गुणधर्मांचा का उपयोग अनेक असाध्य आजरांवर उपचार म्हणून केल्याचे वर्णित आहे. औषधी गुणधर्मांमुळे, पिंपळाला 'कल्पवृक्ष' असे म्हटले गेले आहे. पिंपळाच्या मुळापासून ते पानांपर्यंत तेहतीस कोटि देवतांचा वास असल्यामुळे हे झाड पूजनीय आहे. या झाडाला जल ‍अर्पित केल्याने सर्व आजार व शोक नाहीसे होतात. गीता मध्ये भगवान कृष्ण म्हणतात की, 'हे पार्थ झाडांमध्ये मी पिंपळ आहे' अश्वत्थोपनयन व्रताच्या संदर्भात महर्षी शौनक म्हणतात की मंगळ मुहूर्तात ‍पिंपळाच्या झाडाच्या नियमित तीन प्रदक्षिणा घातल्याने व जल अर्पित केल्याने दारिद्रय, दु:ख व दुर्भाग्याचा नाश होतो. पिंपळाच्या दर्शन व पूजनाने दीर्घायु व समृद्धी प्राप्त होते. अश्वत्थ व्रत अनुष्ठान केल्याने कन्येला अखण्ड सौभाग्य प्राप्ती होते. रस्त्याच्या कडेला पिंपळाचं झाड लावल्याने व त्याचा सांभाळ केल्याने देवलोक प्राप्ती होते. पिंपळाच्या रोपण करणार्‍याला या लोकात किर्ती प्राप्त होते व मृत्यूनंतर मोक्षाची प्राप्ती होते. 
 
7. वटवृक्षाला वडाचं झाडं देखील म्हणतात. हिंदू धर्मात वट सावित्री सण हे पूणपणे वडाच्या झाडाला समर्पित आहे. हिंदू धर्मानुसार पाच वटवृक्षांचे अधिक महत्व आहे. अक्षयवट, पंचवट, वंशीवट, गयावट व सिद्धवट बद्दल सांगितले जातं की कोणालाही त्यांच्या पुरातनतेबद्दल माहिती नाही. जगात या पाच वटवृक्षांना पवित्र वटांच्या श्रेणीत ठेवले आहे. प्रयागमध्ये अक्षयवट, नाशिकमध्ये पंचवट, वृंदावनमध्ये वंशीवट, गयामध्ये गयावट व उज्जैनमध्ये पवित्र सिद्धवट आहे.
 
8. आंबा विशेष आहेः हिंदू धर्मात जेव्हा जेव्हा मांगलिक कार्य होतात तेव्हा घराच्या दारावर, भिंतींवर किंवा पूजास्थळावर आंब्याची पाने बांधली जातात. याने वातावरण धार्मिक आणि शुद्ध होतं. धार्मिक जागांवर किंवा मंडपा सजविण्यासाठी देखील आंब्याची पाने वापरली जातात. 5 किंवा याहून अधिक आंब्याची झाडे लावल्याने अनेक दुर्लक्ष यज्ञांचे फळ मिळतं.
 
9. भविष्यवक्ता शमी : विक्रमादित्यच्या काळापासून सुप्रसिद्ध ज्योतिषाचार्य वराहमिहिर यांनी आपल्या 'बृहतसंहिता' नावाच्या ग्रंथात 'कुसुमलता' नावाच्या अध्यायात वनस्पति शास्त्र व कृषी उपज या संदर्भात माहिती प्रदान केली आहे ज्यात शमीवृक्ष याचा उल्लेख आढळतो. वराहमिहिर यानुसार ज्या वर्षी शमीच्या झाडाला अधिक भरभराटी येत त्यावर्षी दुष्काळाची परिस्थिती निर्माण होते. विजयादशमीच्या दिवशी याची पूजा करण्यामागील एक कारण हे देखील आहे की हे वृक्ष येणार्‍या कृषी विपत्तीचे आधीच संकेत देतं. ज्याद्वारे शेतकरी येणार्‍या आपत्तीपासून मुक्त होण्यासाठी पूर्वीपेक्षा जास्त प्रयत्न करू शकतो.
 
10. जो माणूस आपल्या घरात फळझाडे, झाडे इत्यादींची लागवड करतो व त्याची चांगली काळजी घेतो, त्याला उत्तम आरोग्याची प्राप्ती होते.
 
11. 5 वडाची झाडे लावून त्यांची काळजी घेणार्‍यांच्या सात पिढ्‍या पुण्याचा लाभ घेतात. जी व्यक्ती जितक्या कुडुलिंबाची झाडे लावतात त्यांच्या तेवढ्‍या पिढ्या पुण्याई कमावतात.
 
12. वृक्ष किंवा बाग लावणार्‍यांना कीर्ती प्राप्त होते.
 
13. महादेवाच्या मंदिरात बिल्व वृक्ष रोपण करणारा अकाला मृत्यूपासून मुक्त होतो.
 
14. घरात तुळस, आवळा, निर्गुण्डी, अशोक, इतर वृक्ष लावणे फलदायी असतात. रस्त्यावर रोझवुडचे 11 वृक्ष लावल्याने दोन्ही लोकात त्रास सहन करावा लागत नाही. 
 
15. कनक चंपा याचे 2 वृक्ष लावल्याने सर्वार्थ कल्याण होतं.
 
16. 5 किंवा अधिक महुआ वृक्ष लागवड व पालन करणार्‍याला धन प्राप्ती होते. आणि त्यानुसार त्याला यज्ञांचे फळ मिळू लागते.
 
16. रस्त्याच्या कडेला दोन किंवा अधिक मौलश्री झाडे रोपून त्यांची देखभाल करणार्‍याला एकशे यज्ञ केल्याचे पुण्य लाभतं.
 
17. 5 किंवा अधिक अशोक वृक्षारोपण व पालन करणार्‍यांच्या कुटुंबात कधीही अकाल मृत्यू होत नाही. किंवा अचानक कोणतीही मोठी समस्या उद्भवत नाही व पुढील जन्मात पुण्यात्मा होण्याचं सौभाग्य प्राप्त होतं.
 
18. 5 पलाशच्या झाडाचे रोपण व देखभाल करणार्‍याला 10 गाय दान केल्याच्या समतुल्य पुण्य लाभतं. पलाशचे झाड रस्‍याच्या कडेला किंवा एखाद्या मोठ्या भागात रोपले पाहिजे. घरात याची लागवड करु नये.
 
19. श्री हनुमानाच्या मंदिरात किंवा नदीकाठी किंवा एखाद्या सार्वजनिक स्थळावर 2 किंवा अधिक पारिजातकाचे झाडे लावल्याने एक लक्ष्य तोला स्वर्णदान समतुल्य पुण्य प्राप्ती होते व जीवनभर हनुमानाची कृपा राहते.
 
20. जी व्यक्ती सोमवारी, प्रदोष, शिवरात्री, श्रावणमासातील कोणत्याही दिवशी किंवा शिवयोग असणार्‍या दिवशी 5 किंवा अधिक बिल्व वृक्षांचे रोपण व त्यांचे नियमाने सांभाळ करणार्‍याला शिवलोकाची प्राप्ती होते. जर कोणी ही झाडे शिव मंदिरात किंवा मंदिराजवळ लावतात तर ‍निश्चितच तो कोटी कोटी पुण्याचा भागीदार तर असतोच तसंच त्याच्या कुटुंबावर देखील शिवाची असीम अनुकंपा असते.

संबंधित माहिती

सर्व पहा

नवीन

कालभैरवाष्टकम् Kalabhairava Ashtakam

Kotwal of Kashi काल भैरवाला काशीचा कोतवाल का म्हणतात?

Kaal Bhairav Ashtami 2024 भगवान कालभैरवाला प्रसन्न करण्याचे उपाय

आरती शुक्रवारची

Utpanna Ekadashi 2024: उत्पन्ना एकादशीला 3 प्रभावी उपाय करा, धन संकटपासून मुक्त व्हा !

सर्व पहा

नक्की वाचा

मार्गशीर्ष गुरुवारी महाविष्णूच्या पूजेचे महत्त्व आणि उपासनेची सोपी पद्धत जाणून घ्या

हे 3 गुण असलेल्या महिला भाग्यवान असतात, नवरा आणि सासरचे लोक नेहमी आनंदी राहतात !

घरात या 5 पक्ष्यांचे फोटो लावा, ज्ञान- समृद्धी वाढते, तिजोरी धनाने भरलेली राहते

आपले नाते कसे मजबूत करावे, 5 गोष्टी लक्षात ठेवा

त्वचेच्या कर्करोगाच्या संरक्षणासाठी हे उपाय खूप प्रभावी आहेत

पुढील लेख
Show comments