आहार ग्रहण करण्यापूर्वी, दरम्यान आणि नंतर काय करावे जाणून घ्या

स्वयंपाक घरात भरभराटी राहावी, देवी अन्नपूर्णा प्रसन्न राहावी आणि घरात कधीही धन-धान्याची कमी नसावी अशी इच्छा प्रत्येकाची असते यासाठी आहार ग्रहण करताना आपली वागणूक महत्त्वाची ठरते. अर्थातच आहार ग्रहण करण्यापूर्वी, आहार ग्रहण करताना आणि आहार ग्रहण केल्यानंतर काय करावे हे जाणून घेणे आवश्यक आहे. तर शास्त्रात जेवणाचे काही नियम सांगण्यात आले आहे त्या नियमांचे पालन केल्याने घरात बरकत येते.
 
आहार घेण्यापूर्वी काय करावे?
* 5 अंग (2 हात, 2 पाय, मुख) व्यवस्थित धुऊन भोजन ग्रहण करण्यासाठी बसावे.
* भोजन सुरू करण्यापूर्वी देवतांचे आव्हान अवश्य करावे.
* भोजन नेहमी पूर्व किंवा उत्तर दिशेकडे मुख करून ग्रहण करावे.
* भोजनाची ताटली नेहमी पाट, चटई, चौक किंवा टेबलावर सन्मानाने ठेवावी.
* भोजनाचे मेल माहीत करूनच भोजन ग्रहण करावे.
 
भोजन करताना काय करावे?
* भोजन ग्रहण करताना वार्तालाप किंवा क्रोध करू नये.
* भोजन करताना विचित्र आवाज काढू नये.
* कुटुंबातील सदस्यांसोबत बसून भोजन करावे.
* पायात जोडे घालून भोजन करू नये.
* खरकटे हात किंवा पायाने अग्नीला स्पर्श करू नये.
* शक्य असल्यास स्वयंपाकघरात बसूनच जेवण ग्रहण करावे यानी राहू शांत होतो.
* जेवण्याचं ताट कधीही एकाने हाताने धरू नये. असे केल्याने भोजन प्रेत योनीत जातं.
 
भोजन केल्यानंतर काय करावे?
* भोजन केल्यानंतर ताटात हात धुऊ नये.
* ताटात खरकटं सोडू नये.
* रात्रीचं जेवण झाल्यावर खरकटी भांडी घरात ठेवू नये.
* जेवण झाल्यानंतर ताट कधीही किचन स्टँड, पलंग किंवा टेबलाखाली किंवा वर देखील ठेवू नये.
* रात्री तांदूळ, दही आणि सातूचे सेवन केल्याने लक्ष्मीचा अपमान होतो म्हणून या वस्तूंचे सेवन टाळावे.

वेबदुनिया वर वाचा

पुढील लेख वैवाहिक जीवनात गोडावा टिकावा म्हणून...