Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

उद्या आहे अंगारक संकष्ट चतुर्थी; असे आहे महत्त्व आणि चंद्रोदय

उद्या आहे अंगारक संकष्ट चतुर्थी; असे आहे महत्त्व आणि चंद्रोदय
, सोमवार, 22 नोव्हेंबर 2021 (15:58 IST)
संकष्टी चतुर्थी मंगळवारी आली की तिला अंगारक संकष्टी चतुर्थी असे म्हणतात. 23 नोव्हेंबरला ही चतुर्थी आहे. अंगारक म्हणजे मंगळ. या दिवशीच्या चतुर्थीचे विशेष धार्मिक महात्म्य सांगितले आहे. अंगारक संकष्टीला श्री गणपती दर्शन व पूजा, अभिषेक, गणपती अथर्वशीर्ष पठण, सहस्त्रावर्तन पठण, संपूर्ण दिवस उपवास करण्यास विशेष महत्त्व सांगितले आहे.
चतुर्थीच्या सायंकाळी गणपती अभिषेक, पूजा, अथर्वशीर्ष पठण, मोदकांचा महानैवेद्य, महाप्रसाद, महाआरती झाल्यानंतर रात्री चंद्रोदया नंतर उपवास सोडतात. ज्या गणेश भक्तांना नियमित संकष्टी चतुर्थी करणे शक्य नसते, त्यांनी फक्त अंगारकी चतुर्थी केली तरी तेवढेच महात्म्य मिळते, असा शास्त्रार्थ आहे.
 काही कुटुंबांमध्ये अंगारकी संकष्टी महानैवेद्याच्या मोदकांमध्ये एक मोदक मिठाचा करण्याची पद्धत असते. प्रसाद घेताना हा मोदक आपल्या वाट्याला येणे, यास विशेष महत्त्व मानले गेले आहे
अंगारक संकष्टी चतुर्थी – 23 नोव्हेंबर – मंगळवार चंद्रोदय – रात्री 8. 59 मिनिटांनी आहे.
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

सोमवारी या 8 गोष्टी करू नका, नाहीतर तुम्हाला पश्चाताप होईल