Festival Posters

महिमा वटवृक्षाचा

वेबदुनिया
वटपौर्णिमा आली की सुवासिनी बायकांची सकाळीच वडाची पूजा करण्याची तयारी सुरू होते. सजून सवरून तयार झालेल्या बायकांच्या हातात पूजेचे ताट त्यावर झाकलेले कशिदार रुमाल असतो. अशा रितीने बायका पूजेला जातात. वडाची पूजा करून त्याच्या बुंध्याला दोर्‍याने गुंडाळत प्रदक्षिणा झालतात आणि मला अखंड सौभाग्य लाभू दे, अशी प्रार्थना करतात.

भारतीय संस्कृती, शस्त्र, परंपरा, रुढी यांत वृक्षांना अनन्यसारधारण महत्त्व आहे. कारण झाडांचे मानवी जीवनाशी पूर्वापार नांत जुडलेलं आहे. माणसाला निर्भळ, निरामय जीवन जगण्यासाठी पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी झाडांची खूप मदत होते. याशिवाय झाडांची पाने, फुले फळे अगदी वाळलेले लाकडे मानवाला उपयोगीच असतात. या अनमोल देण्याचे जतन करावे, संवर्धन करावे हा संदेश पूर्वजांनी पूर्वापार काळापासून मानवजातीला दिला. म्हणूनच ‍विविध व्रते, उत्सव, सण तसेच विविध देवी देवतांच्या पूजेत झाडांना, त्यांच्या पाना-फुलांना फळांना मानाचे महत्त्वाचे स्थान आहे. वृक्षांचा महिमा वाढून वृक्ष जतन करण्यास माणूस प्रवृत्त व्हावा, म्हणूनच आपल्याकडे वटपौर्णिमेसारखी व्रतं, परंपरा पाळली जातात. गरज आहे ती अपाण ती व्रते पाळण्याचा. वटपौर्णिमेनिमित्त वडाच्या झाडाची महिमा आपण जर समजून घेतली तर खरे वृक्षपूजन करण्याचा प्रयत्न आपण केला असे आपण म्हणू शकतो.

वटवृक्ष सतीसावित्रीने याच वृक्षाखाली आपल्याप पतीचे प्राण यमराजकडून परत आणले. त्याला जिवंत केले. आपल्या सौभाग्याचे रक्षण याच वृक्षाच्या साक्षीने केले, ही अख्यायिका पुराणात आढळते. म्हणूनच सौभाग्यवती स्त्रिया वटपौर्णिमेला वडाचे पूजन करतात.

वटवृक्ष हा पवित्र महावृक्ष आहे. भगवान शिवाचे हे निवासस्थान मानले असून मानवी संसाराप्रमाणेच वटवृक्षाचा विस्तार सदोदित होत असतो. त्याचा पारंब्या पुन्हा पुन्हा मूळ धरताता आणि आपले अस्तित्व कायम ठेवतात म्हणून वटवृक्षाला संसारातील सौभाग्याचे पावित्र्याचे प्रतीक मानतात.

वड हा मंजिराच्या जातीचा वृक्ष. त्याचा भव्य विस्तार, डौलदारपणा, दाट पानांमुळे मिळणारी दाट सावली यामुळे पूर्वीच्या काळी हा वृक्ष वाटसरूचे आश्रयस्थान असे. म्हणूनच याला आधारवडही संबोधल्या जाते. याच्या लोंबणार्‍या पारंब्या वरून खाली येतात. आणि या पारंब्या पुन्हा जमिनीत मुळं धरतात आणि या प्रकारे या वृक्षाचा विस्तार कायम वाढत असतो.

असा हा भव्य देकणा वृक्ष याचे वैशिष्टपूर्ण गुणधर्म म्हणजे झाडापासून सोडल्या जाणार्‍या कार्बन वायुबरोबच बाष्पाचे प्रमाण अधिक असल्याने तो इतर वृक्षांपेक्षा अधिक शीतलता थंडावा देतो. याशिवाय या झाडाच्या विविद भागांचे अनेक औषधी गुणधर्म माणसासाठी उपयोगी आहते. वडाच्या चिकाने पायाच्या भेगा भरतात. पारंब्याची टोके मळमळ, उलटीसाठी घासून थेंब देतात. उंदिर तसेच विंचवाच्या दंशावर वडाचा चिक लावावा असेही म्हणतात. जेव्हा तहान फार लागते, वडाची पाने सूज व ठणकेवर गरम करून तेल लावून बांधल्याने आराम पडतो. वडाच्या मुळीचा गर्भवर्ती स्त्रियांत पुसवन विधीत पूर्वी उपयोग केल्या जात असे.

याच्या पानांच्या पत्रावळी द्रोणासाठी उपयोग होतो. अशा प्रारे वडाच्या साल, पाने, पारंब्यामुळे यांच्या औषधी गुणधर्मामुळे हा वृक्ष मानवाचा मि‍त्रच आहे. प्रत्येक गावात जागोजागी हा धीर गंभीर वटवृक्ष उभा असतो. मायेची सावली देण्यात तो शालीन व तत्पर असतो. असा हा वटवृक्षाचा थोडक्यात महिमा आहे. हा समजल्यावर त्याची पूजा भगिनी पुन्हा मोठ्या श्रद्धेने करतील ही अपेक्षा. पण काही ठिकाणी विशेषत: शहरात जेथे अता वटवृक्ष दिसत नाहीत, तेथे आजकाल वडाच्या फांद्या विकत मिळतात व त्याची पूजा शहरातील आध‍ुनिक म्हणवणार्‍या भगिनी करतात. पर्यावरण रक्षणाच्या संवर्धानाच्या गप्पा मारणारे आम्ही लोक पूजेच्या नावाखाली झाडांना इजा करतो, तोडतो म्हणजे आपल्यात आपल्या शास्त्राची जाण नाही आणि पर्यावरणाची जाणीव नाही हेत सिद्ध करतो. तेव्हा हे कृत्य कोणीच करू नये. एखाद्या वृक्षाला संरक्षक लावता आले तर लावावे. हीसुद्धा वृक्षाची एकाप्रकारे पूजाच आहे. खरोखर फलदायी पूजा वटवृक्षाचा महिमा जाणून महिलांनीच नव्हे तर पुरुषांनीही या वृक्षाचा मान राखत याची सेवा करायलाच हवी.

संबंधित माहिती

सर्व पहा

नवीन

Christmas 2025 ख्रिसमस विशेष कुकीज रेसिपी

Putrada Ekadashi 2025: पुत्रदा एकादशीचे व्रत कधी पाळावे, त्याचे महत्त्व जाणून घ्या

Christmas Day : ख्रिसमस 25 डिसेंबरलाच का साजरा करतात, इतिहास जाणून घ्या

Christmas 2025 Wishes In Marathi नाताळच्या शुभेच्छा

Tallest Christmas Tree जगातील सर्वात उंच ख्रिसमस ट्री कुठे आहे? माहित आहे का तुम्हाला?

सर्व पहा

नक्की वाचा

Christmas 2025 Gift Ideas नाताळनिमित्त मित्रांसाठी काही खास गिफ्ट आयडियाज

शेंगदाणे खाल्ल्याने शरीराला हे 9 फायदे मिळतात

बोर्ड परीक्षेत हस्ताक्षर सुधारण्यासाठी आणि पूर्ण गुण मिळविण्यासाठी 5 सर्वोत्तम टिप्स जाणून घ्या

हिवाळ्यात तुमचा चेहरा काळवंडतोय का ? कारणे आणि उपाय जाणून घ्या

Health Benefits of Roasted Potatoes : भाजलेले बटाटे खाल्ल्याने आरोग्याला हे 6 आरोग्यदायी फायदे मिळतात

पुढील लेख
Show comments