Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Vishwakarma puja 2019: विश्वकर्मा पूजा विधी, शुभ मुहुर्त

Webdunia
विश्वकर्मा हे देवतांचे कारगीर असल्याचे समजले जातं. 17 सप्टेंबर विश्वकर्मा जयंती म्हणून साजरी केली जाते.
 
हिंदू धर्मानुसार जगाचे रचयिता किंवा आधुनिक शब्दात सांगायचे तर विश्व निर्माण करणारे पहिले इंजीनियर प्रभू विश्वकर्मा होय. देवतांचे शिल्पकार म्हणून यांची ओळख असून प्रभू विश्वकर्मा यांनीच देवतांचे अस्त्र-शस्त्र, महल, स्वर्ग, इंद्रपुरी, यमपुरी, महाभारत काळाची द्वारिका, त्रेतायुगाची हस्तिनापुर आणि रावणाच्या लंकेच निर्माण केलं होतं. प्रभू विश्वकर्माबाबत “ देवतांचा कारागीर’ असे संबोधले जात असले तरी वेद, पुराण, उपनिषदे, व इतर ग्रंथांप्रमाणे प्रभू विश्वकर्मा केवळ देवतांचे कारागीरच नसून सृष्टिनिर्मितीची बीजे निर्माण करणारे व जड चेतन सृष्टी निर्माण करणारे विश्वनिर्माता आहे.
 
प्रभू विश्वकर्मा यांचा जन्म 17 सप्टेंबर रोजी झाल्याचे मानले जात असून हा दिवस विश्वकर्मा जयंती म्हणून साजरा केला जातो. प्रभू विश्वकर्मा यांच्या जन्माबद्दल अनेक कहाण्या प्रचलित असून विश्वकर्मा यांचा जन्म ब्रह्मा यांच्या पुत्र धर्माच्या सातव्या संतान वास्तु देवाच्या 'अंगिरसी' नावाच्या पत्नीद्वारे झाल्याचे मानले गेले आहे.
 
या दिवशी ऑफिस, उद्योग, दुकानदार, फॅक्ट्रीज येथे लागलेल्या मशीन पुजल्या जातात. या दिवशी लोकं आपल्या घरातील वाहन, मोटर आणि इतर वस्तूंची पूजा देखील करतात.
 
या प्रकारे करा विश्वकर्मा पूजा
 
सर्वात आधी पूजा सामुग्री जसे अक्षत, फुलं, मिठाई, रोली, सुपारी, फळं, धूप, रक्षा सूत्र, दही याची व्यवस्था करुन घ्या.
सकाळी लवकर उठून स्नान करुन पांढरे वस्त्र नेसावे.
पूजा घरात प्रभू विश्वकर्मा यांची प्रतिमा किंवा फोटो स्थापित करावी.
त्यावर फुलं, माळ, अपिर्त करा. पिवळे किंवा पांढरे फुलं अर्पित करणे योग्य ठरेल.
तुपाचा दिवा लावावा, उदबत्ती लावावी.
नंतर सर्व शस्त्र, वाहन, मोटर इतर वस्तूंची पूजा करावी. सर्व शस्त्रांना तिलक करुन अक्षत लावून फुलं अर्पित करावे.
देवाला गोडाचा नैवेद्य दाखवावा.
हातात अक्षत, फुलं घेऊन देवाची आराधना करावी.
 
पूजा करताना या मंत्रांचा उच्चार करावा
।। ऊँ आधार शक्तपे नम: ।।
।। ऊँ कूमयि नम: ।।
।। ऊँ अनन्तम नम: ।।
।। ऊँ पृथिव्यै नम: ।।
 
शुभ मुहूर्त
 
सकाळी 07:02 मिनिटावर पूजा करण्यासाठी शुभ मुहूर्त आहे. तसेच सकाळी 9 ते 10: 30 पर्यंत यमगंड, 12 ते 1:30 पर्यंत गुलिक काळ आणि दुपारी 3 ते 4:30 वाजेपर्यंत राहूकाळ असेल. म्हणून ह्या वेळी सोडून दिवसात कधीही पूजा करणे योग्य ठरेल.

संबंधित माहिती

सर्व पहा

नवीन

Friday Remedies: शुक्रवारी या 4 गोष्टी करा, लक्ष्मीची विशेष कृपा मिळवा

Chaitra Navratri 2025: यावेळी चैत्र नवरात्र ९ ऐवजी ८ दिवसांची असेल, शुभ मुहूर्त आणि पूजेची पद्धत जाणून घ्या

Gudi Padwa Essay In Marathi गुढीपाडवा मराठी निबंध

Brihaspativar upay गुरुवारी काय करावे काय नाही जाणून घ्या

संत एकनाथ महाराजांची आरती

सर्व पहा

नक्की वाचा

Breast Size स्तनांचा आकार वाढवण्यासाठी दररोज करा हे योगासन, आकर्षण वाढेल

२९ मार्च रोजी शनि कुंभ राशीत अस्त करणार, ३ राशींना अडचणींना सामोरे जावे लागेल!

Surya Grahan 2025 वर्षातील पहिले सूर्यग्रहण भारतात दिसेल का? सुतक काळ आणि त्याचा परिणाम जाणून घ्या

उन्हाळ्यात भाजी खरेदी करताना या गोष्टी ठेवा लक्षात

घराच्या दिशेनुसार कोणती झाडे लावावीत

पुढील लेख
Show comments