पौर्णिमेच्या रात्री एक छोटा थाळा पाण्याने भरुन त्यात चंद्रबिंब पडेल असा तो ठेवावा. पाच सात मिनिटांनी ते पाणी एका फुलपात्रात भरावे. नंतर आपली सुवासिनी आई अगर सासूबाई यांच्या हातातील अंगठी अगर बिल्वर जोडी घेऊन ती ताम्हणात ठेवावी व तिला वरील पाण्याने स्नान घालावे.
नंतर वस्त्राने पुसून एक छोट्या ताटलीत पाट मांडून ठेवावी. तिला गंध, फुले, हळद, कुंकू, कडूलिंबाचा कोवळा पाला, कमळाचे अगर दुसरे एखादे सुवासिक फूल व मसुरीची डाळ वाहावी. करंजीचा नैवेद्य दाखवावा.
असे सात दिवस करावे. रात्रभर शक्य त्या ठिकाणी नंदादीप असावा. आठव्या दिवशी एखाद्या कुमारिकेला भोजनास बोलवावे. 52 दिवसात उत्तम अनुभव येईल.
अस्वीकरण (Disclaimer) : औषध, आरोग्य टिप्स, योग, धर्म, ज्योतिष इत्यादी विषयांवर वेब जगतात प्रकाशित/प्रसारण केलेले व्हिडिओ, लेख आणि बातम्या फक्त तुमच्या माहितीसाठी आहेत. वेबदुनिया याला दुजोरा देत नाही. या संबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्या.