Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

नवर्‍याचं प्रेम व सौभाग्यासाठी प्रभावी व्रत

Webdunia
कोणत्याही सोमवारी बाजारातून प्रत्येकी एक फूट लांबीचे लाल, काळे व पिवळे या रंगाचे खरे रेशीम आणावे. मंगळवारी सकाळी स्नान करुन वरील तीन रंगांपैकी निदान दोन रंगांची वस्त्रे परिधान करावीत. देवासमोर पाट मांडावा व त्यावर रेशामाचे ते तीन तुकडे ठेवावे.
 
कोल्हापूरची अंबाबाई, वणीच्या गडावरील सप्तश्रुंगी व तुळजाभवानी अशा त्या देवता आहेत अशी कल्पना करावी. एक एक दोरा ताम्हणात ठेवून त्यास पावसाच्या पाण्याने स्नान घालावे. स्नान घातल्यावर ते पुसून पाटावर ठेवावेत व त्यांना गंध, फूल, हळद, कुंकू वाहून धूपदीप ओवाळावा व देवीची आरती करावी. नंतर‍ तिन्ही दोरे हाताच्या मुठीत धरुन जगदंब या मंत्राचा 108 वेळा जप करावा. जप संपल्यानंतर ते तिन्ही दोरे एकत्र वळून डाव्या दंडात बांधावेत. देवीची पूर्ण कृपा होऊन संतती लाभ, पति प्रेम व उत्तम सौभाग्य लाभेल. ही साधना मोठ्या भक्तिभावाने केल्यास त्वरित फळ मिळेल. व्रताच्या मंगळवारी व पुढेही दर मंगळवारी उपवास करावा.
 
अस्वीकरण (Disclaimer) : औषध, आरोग्य टिप्स, योग, धर्म, ज्योतिष इत्यादी विषयांवर वेब जगतात प्रकाशित/प्रसारण केलेले व्हिडिओ, लेख आणि बातम्या फक्त तुमच्या माहितीसाठी आहेत. वेबदुनिया याला दुजोरा देत नाही. या संबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्या.

संबंधित माहिती

सर्व पहा

नवीन

मार्गशीर्ष गुरुवारी महाविष्णूच्या पूजेचे महत्त्व आणि उपासनेची सोपी पद्धत जाणून घ्या

21 नोव्हेंबर रोजी गुरूपुष्यामृतयोग

विवाह पंचमी या दिवशी लोक लग्न करण्यास का घाबरतात?

मार्गशीर्ष गुरुवारी महाविष्णूच्या पूजेचे महत्त्व आणि उपासनेची सोपी पद्धत जाणून घ्या

Avoid on Wednesday बुधवारी ही कामे करु नये

सर्व पहा

नक्की वाचा

मार्गशीर्ष गुरुवारी महाविष्णूच्या पूजेचे महत्त्व आणि उपासनेची सोपी पद्धत जाणून घ्या

हे 3 गुण असलेल्या महिला भाग्यवान असतात, नवरा आणि सासरचे लोक नेहमी आनंदी राहतात !

घरात या 5 पक्ष्यांचे फोटो लावा, ज्ञान- समृद्धी वाढते, तिजोरी धनाने भरलेली राहते

आपले नाते कसे मजबूत करावे, 5 गोष्टी लक्षात ठेवा

त्वचेच्या कर्करोगाच्या संरक्षणासाठी हे उपाय खूप प्रभावी आहेत

पुढील लेख
Show comments