Festival Posters

एकादशीला विष्णुंना प्रसन्न करण्यासाठी काय करावे आणि काय नाही जाणून घ्या

Webdunia
एकादाशीला विधिपूर्वक भगवान श्री हरी विष्णूची पूजा आणि उपवास करतात. या व्रताने मनुष्याला भूत, प्रेत किंवा पिशाच योनीपासून मुक्ती मिळते, मृत्यूनंतर मोक्ष प्राप्त होतो आणि श्रीहरींच्या कृपेने सर्व पापेही नष्ट होतात. तुम्हालाही एकादशीचे व्रत करायचे असेल तर काय करावे आणि काय करू नये या गोष्टी जाणून घेणे आवश्यक आहे.
 
एकादशी काय करावे आणि करू नये
काय करू नये
 
1. एकादशीच्या दिवशी फुले, पाने इत्यादी तोडण्यास मनाई आहे. उपवासाच्या एक दिवस आधी पूजेसाठी फुले, तुळशीची पाने इतर तयार करुन ठेवावी.
 
2. एकादशीच्या दिवशी दान केलेले अन्न कधीही खाऊ नये.
 
3. एकादशीच्या व्रतामध्ये सलगम, पालक, तांदूळ, सुपारी, गाजर, वांगी, कोबी, जव इत्यादी खाऊ नयेत. यामुळे दोष निर्माण होतो.
 
4. एकादशीचे व्रत करणाऱ्यांनी उपवास करण्यापूर्वी तामसिक अन्न, लसूण, कांदा, मांस, मद्य इत्यादींचे सेवन करू नये.
 
5. एकादशीचे व्रत करणार्‍या व्यक्तीने कोणाचाही वाईट विचार करू नये आणि कोणाला कडू बोलू नये. रागावणे टाळावे.
 
6. एकादशीचे व्रत करणाऱ्यांना किंवा त्यांच्या कुटुंबियांना उपवासाच्या दिवशी मुंडण करणे, नखे कापणे, केस कापणे, झाडू मारणे निषिद्ध आहे.
 
काय करावे
1. एकादशी व्रताच्या दिवशी शक्य असल्यास पिवळे कपडे घाला.
 
2. विष्णुपूजेच्या वेळी एकादशी व्रताची कथा ऐकणे आवश्यक आहे.
 
3. एकादशी व्रतामध्ये भगवान विष्णूची पूजा करताना पंचामृत आणि तुळशीच्या पानांचा वापर करावा.
 
4. या दिवशी कोणी तुमच्या दारात भिक्षा मागण्यासाठी येत असेल तर त्याला रिकाम्या हाताने जाऊ देऊ नका. व्रताच्या दिवशी दान केल्याने पुण्य लाभते.
 
5. सूर्योदयानंतर एकादशीचे व्रत पारण करावे. मात्र द्वादशी तिथी संपण्यापूर्वी पारण करावे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नवीन

Christmas 2025 Essay in Marahti नाताळ निबंध मराठी

Saphala Ekadashi 2025 सफला एकादशी कधी? शुभ -मुहूर्त, नियम आणि महत्व जाणून घ्या

आरती मंगळवारची

मंगळवारी जेवणात हा पदार्थ नक्की बनवा, जीवनात सकारात्मकता येईल

मंगळवारी उपवास करताना टाळाव्यात अशा ५ चुका

सर्व पहा

नक्की वाचा

भिकाऱ्याने दान विकून दारू पिल्यास दात्याला दोष लागतो का?, प्रेमानंद महाराज काय म्हणाले जाणून घ्या

Christmas 2025 Essay in Marahti नाताळ निबंध मराठी

सुंदर त्वचेसाठी तांदळाचे पीठ अशा प्रकारे वापरा, पद्धत जाणून घ्या

हिवाळ्यात ब्रोकोली खाणे अत्यंत फायदेशीर आहे आरोग्य फायदे जाणून घ्या

जोडीदार भावनिक छळ तर नाही करत आहे, अशा प्रकारे ओळखा

पुढील लेख
Show comments