rashifal-2026

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

लग्नात नव्या नवरीच्या गळ्यात घातले जाणारे मंगळसूत्र उलटे का असतात जाणून घ्या

The importance of the mangalsutra
, सोमवार, 24 फेब्रुवारी 2025 (15:37 IST)
लग्न वेदीवर महत्त्वाची वेळ असते ती म्हणजे मंगळसूत्र घालण्याची.आपल्या हिन्दू धर्मात मंगळसूत्राचे खुप महत्त्व आहे. पण आजच्या काळात लग्नानंतर मुलींना मंगळसूत्र घालण्याची सवयच नसते. किवा त्यांना मंगळसूत्र घालणे आवडत नाही. 
लग्नाच्या वेदीवर नव्या नवरीला तिचा नवरा मंगळसूत्र घालतो. मंगळसूत्र हा हिंदू विवाह विधीचा प्रमुख भाग मानला जातो. लग्नाच्या वेळी वधूच्या गळ्यात मंगळसूत्र घातले जाते, या विधीशिवाय विवाह अपूर्ण राहतो. मुख्य म्हणजे नवरीला घातले जाणारे हे मंगळसूत्र उलटे घालतात.लग्नाच्या 16 दिवस हे मंगळसूत्र उलटे घातले जाते नंतर 16 दिवसांनी हे मंगळसूत्र सरळ करुन घातले जाते. प्रश्न आता असे पड़तो की हे मंगळसूत्र उलटे का घालतात.चला तर मग जाणून घेऊ या. 
 
मंगळसूत्रात नेहमी दोन वाट्या असतात. या वाट्या सोन्याच्या असतात. जेव्हा या वाट्या स्त्रीच्या हृदयाजवळ येतात ते आरोग्यासाठी चांगले असते. नेहमी सोन आणि चांदी हे आरोग्यासाठी चांगले असतात. मंगळसूत्र घातल्याने रक्तदाब नियंत्रित राहते. तसेच त्यातील काळे मणि  हे स्त्रियांना राहु अणि केतूच्या दुष्प्रभावापासून वाचवते. तसेच कोणाचीही वाइट दृष्ट लागू नये म्हणून मंगळसूत्रात काळे मणि असतात. अणि काळे मणी असलेले मंगलसूत्रच स्त्रियांनी  धारण करणे नेहमी चांगले आहे. 
 
मंगळसूत्र उलटे घालण्याचे कारण असे की मंगळसूत्र नेहमी दोन वाट्याचे असते एक वाटी माहेरची तर एक वाटी सासरची असते. दोन्ही घराची परम्परा जपण्याचा ही एक माध्यम असते. या दोन्ही वाटीत एकात हळद आणि एकात कुंकू भरून ठेवले जाते आणि नंतर या मंगळसूत्रावर नवी नवरी हळद कुंकू वाहते नंतर नवरा तिच्या गळ्यात हे मंगळसूत्र घालून तिला आपली बायको म्हणून स्वीकारतात. मंगळसूत्रात दोन पदरी दोऱ्यात काळे मणी गुंफलेले असतात. मध्यभागी 4 छोटे मणी आणि 2 लहान वाट्या असतात. दोन दोरे म्हणजे पती- पत्नीचे बंधन. 2 वाट्या म्हणजे पती-पत्नी, तसेच 4 काळे मणी म्हणजे धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष हे चार पुरुषार्थ आहे. काळ्या रंगाचे मोती वाईट नजरेपासून संरक्षण करतात.मंगळसूत्र उलट घातल्याने या स्त्रीचे लग्न नुकतेच झाले आहे असे समजते. हे सौभाग्यच लेण आहे. त्याच बरोबर हे स्त्रियांसाठी रक्षा कवच देखील आहे.    
Edited By - Priya Dixit 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

महाशिवरात्रीला १२ ज्योतिर्लिंगांचे १२ रहस्य जाणून घ्या