Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

होलिकापूजन असे करा!

वेबदुनिया
WD
फाल्गून शुक्ल अष्टमीपासून पौर्णिमेपर्यंत आठ दिवस होलाष्टक साजरे केले जाते. त्यासोबतच होळी उत्सव साजरा करण्याची सुरूवात होते. होळीची तयारी देखील तेव्हापासूनच सुरू होते. होळी दहन आणि पूजा यासाठी खालील बाबींकडे लक्ष द्या.

होळीला कोणत्याही झाडाची लाकडे (फांद्या) कापून त्यावर रंगबिरंगी कपड्याचे तुकडे बांधले जातात.
प्रत्येक जम झाडाच्या त्या फांदीला कापडाचा एक तुकडा बांधतो. ती फांदी कपड्यांच्या तुकड्यांनी पूर्णपणे झाकली जाते, तेव्हा तिला सार्वजनिक ठिकाणी गाडले जाते.
नंतर त्या फांदीच्या चहुबाजूने लोक उभे रहातात.
गवत, वाळलेली लाकडे, गवर्‍या होळीत रचल्या जातात. त्यालाच होळी म्हणतात.
त्यानंतर मुहूर्तानुसार होलिका पूजन केले जाते.
वेगवेगळ्या क्षेत्रात आणि समाजात वेगवेगळ्या पध्दतीने पूजा केली जाते. आपल्या पारंपारीक पूजा पध्दतीच्या आधारे पूजा करायला हवी. होळी पूजनावेळी खालील मंत्राचे उच्चारण करायला हवे...

अहकूटा भयत्रस्तैः कृता त्वं होलि बालिशैः ।
अतस्वां पूजयिष्यामि भूति-भूति प्रदायिनीम्‌ ॥

पूजनानंतर होळी दहन केले जाते.
दहनानंतर गव्हाच्या ओंब्या त्यात भाजल्या जातात. हा सण नवीन पिकाच्या आनंदातही साजरा केला जातो.
होळी दहनानंतर जी राख उरते. तिला भस्म म्हटले जाते. ते शरीरावर लावायला हवे.
राख लावताना खालील मंत्राचे उच्चारण करावे...

वंदितासि सुरेन्द्रेण ब्रम्हणा शंकरेण च ।
अतस्त्वं पाहि माँ देवी! भूति भूतिप्रदा भव ॥

होळीची गरम राख घरात समृध्दी आणते असे मानले जाते. असे केल्याने घरात शांती आणि प्रेमाचे वातावरण निर्माण होते.

महाराष्ट्र दर्शन : आदिशक्ती एकविरा आई

शुक्रवारी रात्री करा हा गुप्त उपाय, देवी लक्ष्मीच्या कृपेने पैशाची कमतरता भासणार नाही

शुक्रवारची आरती.... जयदेव जयदेव जय विघ्नाधीशा ॥

श्री तुलजा भवानी स्तोत्र

मोहिनी एकादशी 2024 रोजी हे उपाय केल्याने 3 राशींचे भाग्य बदलू शकते

आसाममधील सिलचर येथील एका संस्थेत भीषण आग,अनेक मुले अडकली

CSK vs RCB : सीएसके आणि आरसीबी प्लेऑफसाठी शेवटच्या प्रयत्नात,करो या मरोचा सामना

प्राचार्यांनी आयुषला गटारात फेकले, त्याला दुखापत झाली तर रक्त पाहून घाबरले; आई आणि मुलाला अटक

INDIA युतीने ठरवले आहे PM कँडिडेटचे नाव, उद्धव ठाकरे यांचा मोठा दावा

उत्तर प्रदेशमध्ये 5 वार्षांच्या चिमुकल्याची हत्या

Show comments