मर्लिनची दुर्दैवी कहाणी अमेरिकी सौंदर्यवती अभिनेत्री मर्लिन मन्रो हिचा जन्म लॉसएंजल्स येथे १९२६ मध्ये झाला. हॉलिवूड अभिनेत्री म्हणून तिने त्यावेळी सेक्स सिंबॉलच्या रूपात ओळख निर्माण केली होती. तिचे गाजलेले चित्रपट म्हणजे नायगारा, जेंटलमन प्रेफर्स ब्लाँडेज, रिव्हर ऑफ नो रिटर्न, द सेव्हन इयर एच, सम लाइक इट हॉट.
तिचे तीन विवाह व तीन घटस्फोट झाले होते. वयाच्या छत्तीसाव्या वर्षी १९६२ मध्ये ती मृतावस्थेत सापडली. तिने काही औषधे सेवन केल्याने तिचा मृत्यू झाला व ती आत्महत्या होती असे सांगितले जाते. काहींच्या मते अमेरिकी अध्यक्ष जॉन एफ केनेडी व त्यांचे बंधू रॉबर्ट केनेडी यांच्याशी तिचे प्रेमसंबंध होते. अध्यक्षांशी तिला विवाहबद्ध व्हायचे होते पण ते शक्य न झाल्याने ती निराश होती. तिच्या मृत्यूमागे केनेडी बंधू असावेत, सीआयए किंवा माफियांचा हात असावा अशा अनेक कथा प्रचलित आहेत. ती मरण पावली तेव्हा तिची भेट घेणारी शेवटची व्यक्ती रॉबर्ट केनेडी हे होते असे सांगितले जाते.