ऑस्कर पुरस्कार सोहळ्याची जगभर चर्चा असते. परंतु, सध्या ऑस्करची चर्चा रंगलीय ती नकारात्क कारणामुंळे. 'दी अॅकेडमी ऑफ मोशन पिक्चर आर्टस अॅण्ड सायन्सेस'ने चार मोठ्या श्रेणीतील पुरस्कार यंदा ऑफ एअर देण्याचा निर्णय घेतला आहे.
ऑस्करमधून वगळण्यात आलेल्या चार विभागांमध्ये सिनेमॅटोग्राफी, फिल्म एडिटिंग, लाइव्ह अॅक्शन शॉर्ट, मेकअप-हेअर स्टाईलचा समावेश आहे. या चारही विभातील पुरस्कार ब्रेकमध्ये देण्यात येतील. त्यामुळे मुख्य सोहळ्यात टीव्हीवर ते दाखवण्यात येणार नाहीत.
ऑस्कर सोहळा दिलेल्या वेळेत पार पाडण्यासाठी हा बदल करण्यात आल्याची चर्चा आहे. परंतु, या निर्णयाची सोशल मीडियावर प्रचंड टीका झाली. अनेकांनी या बदलाचा निषेधही नोंदवला.