Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

गांधीजींना पूजणारे गाव

Webdunia
PR
ओरिसातील संबलपूर जिल्ह्यात भतरा गावाला राष्ट्रपिता महात्मा गांधींविषयी अतिशय प्रेम आहे. कारण या गावात महात्मा गांधींचे मंदिर आहे. विश े ष, म्हणजे येते गांधीजींची कांस्य मूर्ती सिद्धासन अवस्थेत आहे. या मूर्तीची रोज पूजाअर्चना केली जाते. सकाळ-संध्याकाळ आरती होते. प्रसाद वाहिला जातो. येथील स्थानिक लोक गांधीजींचे दर्शन केल्यानंतरच आपल्या रोजच्या कामाची सुरुवात करतात.

PR
या मंदिराची कल्पना माजी आमदार अभिमन्यू कुमार यांना सुचली. ते रेढाखोल विधानसभा मतदारसंघातून निवडून आले होते. त्यांनी सन 1971 मध्ये या मंदिराची निर्मिती केली. 11 मीटर लांब व साडेसहा मीटरहून रूंद आणि 12 मीटर उंच या मंदिराला पूर्ण करण्यासाठी 3 वर्षे लागली.यात एक मीटरपेक्षा जास्त उंचीची गांधीजींची मूर्ती येथील स्थानिक कला महाविद्यालयाच्या कलाकाराने तयार केली आहे.

PR
26 जानेवारी, 15 ऑगस्ट आणि 2 ऑक्टोबरला येथे विशेष पूजेचा कार्यक्रम होतो. आजूबाजूच्या गावातील लोक पूजेसाठी येतात. दुसर्‍या मंदिराच्या परिसरात जेथे गरूड किंवा एखादा स्तंभ असतो. तसाच या मंदिराच्या परिसरात अशोक स्तंभ आहे. मंदिरात भारतमातेची प्रतिमा आहे तिच्या हातात अशोक स्तंभ आहे. किमान दीड हजार लोकसंख्या असलेले हे गाव देशभरात या मंदिरामुळे प्रसिद्ध आहे.

छायाचित्र : सौजन्य गांधी मंदिर
सर्व पहा

नक्की वाचा

Birthday Wishes For Mother In Law In Marathi सासूला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठीत

HMPV Virus: तो कसा पसरतो, लक्षणे आणि खबरदारी, ह्यूमन मेटापन्यूमोव्हायरस बद्दल तपशीलवार माहिती वाचा

HMPV व्हायरस काय आहे? ज्यामुळे लोक त्याला बळी पडत आहेत, जाणून घ्या

Makar Sankranti 2025: मकर संक्रांतीच्या दिवशी चुकूनही या वस्तूंचे दान करू नये?

१ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०२५ पर्यंतचे मराठी सणवार

सर्व पहा

नवीन

लहान गोष्टी विसरणे हे ब्रेन फॉगची लक्षण आहे का

हिवाळ्यात टाळूला हायड्रेट ठेवण्यासाठी नारळाच्या दुधापासून बनवलेले हे 5 हेअर मास्क वापरा

हिवाळ्यातील हे छोटे फळ आरोग्याचा खजिना आहे

मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी या गोष्टी लक्षात ठेवा

प्रजासत्ताक दिन वर मराठी निबंध Essay On Republic Day In Marathi

Show comments