Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

स्वातंत्र्याकडे पाहण्याची 'नवी दृष्टी'

Webdunia
ND
देशातील सात कोटीपेक्षा जास्त लोक असे आहेत, ज्यांनी पंधऱा ऑगस्ट १९४७ ला देश स्वातंत्र्य होताना पाहिला. महात्मा गांधी आणि पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या नेतृत्वाखालील देश मोठी प्रगती करेल अशी त्यांची अपेक्षा होती. राजा आणि प्रजा, गरीब आणि श्रीमंत, शहरी व ग्रामीण, ब्राह्मण व शूद्र असे भेद मिटतील. प्रत्येकाची स्थिती बदलून प्रगतीचा रस्ता त्याच्यासाठी खुला होईल. गरीबी, उपासमार, बेरोजगारी, महागाई, रोगराई, निरक्षरता, भ्रष्टाचार याचा विचारही कुणाच्या डोक्यात नसावा. कायदा, घटना यावरचा लोकांचा विश्वास उडेल अशा काही घटना घडतील असा विचारही कुणी केला नसेल. स्वातंत्र्याला साठ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल प्रतिक्रिया विचारली तर त्यांचे उत्तर काय असेल?

नक्कीच यांच्यापैकी कुणीच खूप दुःखी नसेल. फारसे निराशही कुणी नसेल. चांगल्या आणि मनाला दुःख देणार्‍या घटनाही या काळात घडल्या. स्वातंत्र्याच्या लाभ ज्यांना मिळाला ते आज अतिशय आनंदी जीवन जगत आहेत. पण अनेकांसाठी हे स्वातंत्र्य कुचकामी असल्याची भावनाही आहे.

देशातील अनेक वृद्धांनी, ज्यांनी ब्रिटिश काळ पाहिला आहे, त्यातील अनेक जण सध्याच्या स्वातंत्र्यानंतरच्या स्वैराचारवर तोंडसुख घेताना दिसतात. नैतिक अधःपतन, अतिपैशाने फिरलेली तरूण पिढीची मती, त्यांच्याकडून होणारा वारेमाप खर्च, भ्रष्टाचार, महागाई, गुन्हेगारी, भांडवलशाही आणि त्याला जोडून येणाऱ्या साऱ्या प्रश्नांवर ते भारताच्या सध्याच्या प्रश्नांचे खापर फोडतात. गेल्या काही वर्षातील प्रगतीची झेपही त्यांना सोसवत नाही. प्रगतीचा आवाकाही त्यांच्या मर्यादेत येत नाही. त्यामुळे बहुराष्ट्रीय कंपन्यांकडून भारतात होणाऱ्या गुंतवणूकीत त्यांना भारताला पुन्हा गुलामगिरीच्या शृंखलेत घालण्याचा डाव दिसतो आहे.

त्यांच्या मते इंग्रजांचा काळ किंवा राजे-महाराजांचा काळ चांगला होता. वस्तूंच्या किमती कमी होत्या. शिस्त, एकत्र कुटुंबपद्दती, जाती-धर्माचे महत्त्व, मर्यादीत असलेला भ्रष्टाचार, फॅशनचा अभाव, गुन्हेगारीचा कमी असलेला आकडा आदी उदाहरणे त्यांच्याकडून दिली जातात. त्यावेळच्या किराणाचे भाव तोंडावर फेकून महागाई किती कमी होती असे सांगतात.

पण हे सांगताना ते हे विसरतात की त्यावेळी व्यक्तीचे उत्पन्न किती होते. शेतात पीक किती येत होते. पाणी किती लांबून आणावे लागत होते. शौचालये कशी होती. शहरात जाण्यासाठी बैलगाडी होती. शिस्त होती, पण ब्रिटिशांच्या, राजाच्या शिपायांच्या काठ्या कशा खाव्या लागत

सारासार विचार केल्यास भारताची स्थिती आज एवढीही खराब नाही. त्यांचे मते पूर्ण विहिरीतच भांग पडलीये. पण तसे भारताची स्थिती सारासार विचार केल्यास भारताची स्थिती आज एवढीही खराब नाही. त्यांचे मते पूर्ण विहिरीतच भांग पडलीये. पण तसे नाही. विहिरीत चांगले पाणीही आहे. स्वातंत्र्यापूर्वीचा भारत आणि आताचा भारत यांची तुलना केल्यास अनेक चांगले मुद्देही आढळतात. नाही. विहिरीत चांगले पाणीही आहे. स्वातंत्र्यापूर्वीचा भारत आणि आताचा भारत यांची तुलना केल्यास अनेक चांगले मुद्देही आढळतात. स्वातंत्र्याच्या साठ वर्षांनंतरही देशात लोकशाही अस्तित्वात आहे, ही मोठी कमाई आहे. अनेक राजकीय पक्षांची मोट बांधलेल्या आघाड्या चांगला कारभार करीत आहेत. हुकुमशाही देशात येण्याची शक्यताही नाही. पाकिस्तानबरोबर झालेल्या युद्धात आपण त्यांचे नाक ठेचले आहे. संयुक्त राष्ट्र संघटनेत भारताची भूमिका महत्त्वाची राहिली आहे.

देशाची लोकसंख्या 29 कोटींहून 103 कोटींवर पोहोचली आहे, पण प्रती व्यक्ती उत्पन्न, खर्च, बचत आणि गुंतवणूक यातही वाढ झाली आहे. जगण्याचा स्तर वाढला आहे. पंचवार्षिक योजनांच्या माध्यमातून विकासकामांना गती देण्यात आली आहे. परकीय गंगाजळीने तीनशे अब्ज डॉलरचा आकडा गाठला आहे. रशिया आणि समाजवादी देशच नाही, तर अमेरिका, ब्रिटन, जपान, फ्रान्स, मॉरीशस, चीन, संयुक्त अरब अमिरात, सौदी अरेबिाया, इंडोनेशिया, थायलंड, कोरीया हे सर्व देश भारताबरोबर चांगले संबंध ठेवण्यासाठी प्रयत्नशील आहेत. अमेरिकेने भारताबरोबर केलेला अणू करार हे तर त्याचे ताजे उदाहरण आहे.

देशात झालेले हे बदल आवडो न आवडो तुम्हाला ते स्वीकारावे लागतील. खरे तर या बदलाच्या प्रवाहात आपणही शिरणे हेच जास्त चांगले. केवळ साक्षीदार म्हणून रहाणे याला काही अर्थ नाही. आपण मागच्या पिढीचे मग आपल्याला भवितव्य नाही असे मानणे चुकीचे ठरेल. नव्या सोयीसुविधांचा लाभ घेऊन स्वतःला आजमावून पाहिले पाहिजे. स्वातंत्र्यासाठी जे कष्ट आपण घेतले त्याचा लाभ घेण्याची ही वेळ आहे. तो उठवलाच पाहिजे. महागाई वाढली असेल, पण आपल्या हातात ती परवडण्याइतका पैसाही येतो आहे. त्यामुळे त्याची चिंता करायचे काम नाही. नव्या पिढीच्या नव्या प्रवाहात सामील होणे हाच योग्य आणि चांगला पर्याय आहे.
सर्व पहा

नक्की वाचा

Birthday Wishes For Mother In Law In Marathi सासूला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठीत

HMPV Virus: तो कसा पसरतो, लक्षणे आणि खबरदारी, ह्यूमन मेटापन्यूमोव्हायरस बद्दल तपशीलवार माहिती वाचा

HMPV व्हायरस काय आहे? ज्यामुळे लोक त्याला बळी पडत आहेत, जाणून घ्या

Makar Sankranti 2025: मकर संक्रांतीच्या दिवशी चुकूनही या वस्तूंचे दान करू नये?

१ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०२५ पर्यंतचे मराठी सणवार

सर्व पहा

नवीन

लहान गोष्टी विसरणे हे ब्रेन फॉगची लक्षण आहे का

हिवाळ्यात टाळूला हायड्रेट ठेवण्यासाठी नारळाच्या दुधापासून बनवलेले हे 5 हेअर मास्क वापरा

हिवाळ्यातील हे छोटे फळ आरोग्याचा खजिना आहे

मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी या गोष्टी लक्षात ठेवा

प्रजासत्ताक दिन वर मराठी निबंध Essay On Republic Day In Marathi

Show comments