Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

चीन मधील अण्वस्त्र कार्यक्रम

नितीन फलटणकर

Webdunia
चीन आज महासत्ता बनण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. चीनच्या महत्त्वाकांक्षेमुळे चीनकडे अत्यंत घातक अण्वस्त्र आली आहेत. अशाच महत्त्वाकांक्षेपोटी दुसरे महायुद्ध झाले होते. चीनकडे आज घडीला अनेक संहारक अण्वस्त्र आहेत. हायड्रोजन बॉम्ब चीनने केव्हाच तयार केला आहे. भारत आणि अमेरिकेची अनेक शहरं चीनच्या क्षेपणास्त्रांच्या टप्प्यात आहेत.

चीनमध्ये राज्यक्रांती संपल्यावर आणि सांस्कृतिक क्रांती सुरू होण्याच्या मार्गावर असतानाच खऱ्या अर्थाने चीनच्या विकासास सुरुवात झाली होती. सांस्कृतिक क्रांतीच्या माध्यमातून अपेक्षित चीनचा माओचा प्रयत्न फसल्यानंतर चीनने स्वतः:च्या संरक्षणावर लक्ष केंद्रित करण्याचा निर्णय घेतल ा, आणि आपली संरक्षण क्षमता वाढवण्यास सुरुवात केली. चीनमधील अण्वस्त्र कार्यक्रमांच्या जन्माची हीच खरी सुरुवात होती.

1953 पर्यंत चीनने अण्वस्त्रांचा वापर शांततेसाठी करायचा असे ठरवले होत े, आणि याच दृष्टिकोनातून अण्वस्त्र ऊर्जा संदर्भात संशोधनासही सुरुवात केली होती. परंतु 1956 नंतर चीन आणि सोव्हिएत संघात विज्ञान आणि तंत्रज्ञानाचे आदान-प्रदान करण्यासंबंधीचा एक करार करण्यात आला. हा चीनमधील अण्वस्त्र कार्यक्रमाचा पहिला टप्पा मानला जातो.

चीनच्या सीसीपीच्या (कम्युनिस्ट पक्षाच्या) आठव्या अधिवेशनात 12 वर्षांसाठीच्या अण्वस्त्र विकास कार्यक्रमाचे एक प्रारूप मंजूर करण्यात आले होते. या अंतर्गत सर्वप्रथम बॅलेस्टिक मिसाईलचा विकास करण्याचा निर्णय घेण्यात आला. यापूर्वी 1951 मध्येच चीन आणि मॉस्कोत (सोव्हिएत संघ) एक गुप्त करारही झाला होता.

या करारानुसार सोव्हिएत संघाला चीन युरेनियम साठा करणार हे मान्य करण्यात आले होते. या मोबदल्यात अण्वस्त्रांचे तंत्रज्ञान चीनला पुरवण्यासाठी संघाचे वैज्ञानिक चीनला मदत करणार होते.

1956 मध्ये सोव्हिएत संघ आणि चीनमध्ये एक करार करण्यात आला. यात चीनला जमिनीवरून हवेत आणि जमिनीवरून जमिनीवर मारा करण्यासाठी बेलॅस्टिक क्षेपणास्त्र पुरवण्याबाबत एकमत झाले. सोव्हिएत संघ चीनला अण्वस्त्र तयार करण्यासाठी आणि एटॉमबॉंब तयार करण्यासाठी आवश्यकती मदत करण्याचे या करारात नमूद करण्यात आले होते.

परंतु चीन आणि सोव्हिएत संघाचे हे प्रेम फारकाळ टिकले नाही. चीनला मदत करण्यास सोव्हिएत संघाने नकार दिला आणि रशिया आणि अमेरिकेची एकाधीकारशाही मोडीत काढण्यासाठी चीनने आपले संशोधन सुरूच ठेवत याला गती देण्याचा निर्णय घेतला.

सोव्हिएत रशियाने अंग काढून घेतल्यानंतर चीन मधील वैज्ञानिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. नेमका कोणता मार्ग निवडायचा हे वैज्ञानिकांना उमजत नव्हते.

परंतु या साऱ्या गोंधळात चीन मधील वैज्ञानिकांनी जिद्दीने आपले काम सुरूच ठेवले आणि अवघ्या 32 महिन्यांमध्ये चीनने 16 ऑक्टोबर 1964 रोजी पहिला ऑटोबॉंब तयार केला आणि त्याची यशस्वी चाचणी घेतली. 25 ऑक्टोबर 1967 रोजी चीनने पहिला अणुबॉम्ब तयार केला तर 14 जून 1967 रोजी चीनेने हायड्रोजन बॉम्ब तयार केला. चीनने 25 किलो वजनाच्या आपल्या क्षेपणास्त्राची चाचणी 16 ऑक्टोबर 1964 साली घेतली. यात 235 युरेनियमचा वापर इंधन स्वरूपात करण्यात आला होता.

1969 पर्यंत चीनने अशा प्रकारच्या दहा चाचण्या केल्या. या नंतरच्या चाचण्यांमध्ये थर्मोन्यूक्लीयरचा विकास करण्यावर भर दिला गेला. यानंतर चीनच्या या अण्वस्त्र कार्यक्रमात चीनमधील सांस्कृतिक क्रांती आणि मंदीने आडकाठी केल्याने चीनला अण्वस्त्र विकासाचा प्रकल्प काही काळ थांबवावा लागला.

परंतु तोपर्यंत अण्वस्त्रांच्या शर्यतीत चीनने अखेरचा टप्पा गाठला होता. चीनने अण्वस्त्रं 1968,थर्मोन्यूक्लीयर 1974 पर्यंत उत्पादनास सुरुवात केली होती.

यानंतर 1970 अखेरपर्यंत चीनकडे 200 अण्वस्त्र होती. 1980 उजाडेपर्यंत चीनने आपल्या भात्यात 875 अण्वस्त्रं जमवली होती. चीनची ताकद वाढतच होती. दरवर्षाला चीन 75 अण्वस्त्र नव्याने तयार करत होते. 1990 उजाडेपर्यंत चीनने 2 हजारांवर अण्वस्त्र तयार केली होती. यात जमिनीवरून हवे त, हवेतून जमिनीवर आणि समुद्रातून मारा करणाऱ्या विविध प्रकारच्या क्षेपणास्त्रांचा समावेश करण्यात आला होता.

अमेरिकी आणि जपानी गुप्तहेरांनी चीनच्या या कार्यक्रमावर सुरुवातीपासूनच लक्ष केंद्रित केले. अमेरिकन सेटेलाईट तर कायम चीनच्या हालचालींवर नजर ठेवून असतात.

चीनने 29 जुलै 1996 नंतर आतापर्यंत कोणतीही अण्वस्त्र चाचणी केलेली नाही. अगदीच वैज्ञानिकांच्या भाषेत सांगायचे झाले तर चीनने केलेल्या शेवटच्या चाचणीत रिश्टर स्केलवर 4.3 इतका भूकंप घडवून आणण्याची तीव्रता होती. ही चीनने केलेली 45 वी यशस्वी चाचणी होती.

चीनने आता आपल्या अण्वस्त्रं विकास कार्यक्रमाला कासवगती दिली आहे. परंतु अत्यंत घातक समजल्या जाणाऱ्या हायड्रोजन आणि विकिरण अर्थात न्यूट्रॉन बॉम्ब विकसीत करण्यात चीनला यश आले आहे. चीनने 29 सप्टेंबर 1988 साली पहिल्यांदा न्यूट्रॉन बॉंबची यशस्वी चाचणी घेतली होती.

सीआयएचे माजी संचालक जॉर्ज टेनेट यांनी दिलेल्या गुप्त अहवाला नुसार चीनने अमेरिकी अण्वस्त्र कार्यक्रमाची हेरगिरी कर त, अमेरिकी अण्वस्त्र े, न्यूट्रॉन बॉंबचे तंत्रज्ञान चोरले आहे. याचाच वापर करत चीनने आपली अण्वस्त्र ताकद वाढवल्याचे जॉर्ज यांनी या अहवालात म्हटले आहे.

1981 साली प्रथम अमेरिकेला आपल्याच एका शास्त्रज्ञाचा संशय आला. लिवरमोर येथील नॅशनल लॅब्रोटरीजमध्ये काम करणारा अभियंता गाओ बाओ मीन याच्यावर अमेरिकेला संशय होता.चीनला अमेरिकी अण्वस्त्र कार्यक्रमाची माहिती मिननेच पुरवल्याचे स्पष्ट झाले. या संशयामुळे मिनला आपल्या पदाचा राजीनामाही द्यावा लागला होता.मिनने अमेरिकेच्या डब्ल्यू-70 बॉम्ब पासून ते न्यूट्रॉन बॉंबपर्यंत सर्व माहिती चीनला दिली असल्याची खात्री अमेरिकी गुप्तहेरांना होती.

यात आणखी काही वैज्ञानिकांचा सहभाग असल्याचा संशय आल्याने अमेरिकी गुप्तहेर संस्था एफबीआयने ‘टायगर ट्रॅ प ’या नावाने गुप्त अभियान सुरू करत आपल्याच वैज्ञानिकांचे फोन टॅप करण े, त्यांचा पाठलाग करण े, त्यांचे मेल चेक करणे असे उद्योग सुरू केले. यात काही वैज्ञानिक सापडले ही.

2005-06 मध्ये चीनच्या संरक्षण खात्याने आपल्याकडील बेलास्टीक क्षेपणास्त्रांचा खुलासा केला आहे. यानुसार चीनकडे 250-295 लॉंचर् स, 793-916 सात विविध प्रकारातील क्षेपणास्त्रं तयार केली असून यात 105 अत्यंत घातक अण्वस्त्रांचाही समावेश आहे.
सर्व पहा

नक्की वाचा

Bhishma Panchak 2024 : आजपासून भीष्म पंचक व्रत, जाणून घ्या पूजा पद्धत आणि महत्त्व

Sun Transit 2024: सूर्याचे वृश्चिक राशीत संक्रमण, 3 राशीच्या लोकांना सतर्क राहावे लागेल

Guru Nanak Jayanti 2024: गुरु नानक जयंती कधी ? प्रकाश पर्व कसे साजरे करायचे जाणून घ्या

पतीच्या घोरण्यामुळे झोप मोड होतेय ? कारणे आणि घोरणे थांबवण्यासाठी 5 घरगुती उपाय

डोकेदुखीपासून मुक्त होण्यासाठी या सोप्या घरगुती उपायांचा अवलंब करा

सर्व पहा

नवीन

LIVE: धारावी प्रकल्पाच्या टिप्पणी वरून फडणवीस यांची राहुल यांच्यावर टीका

भाजपने जतमधून गोपीचंद पडळकर यांना रिंगणात उतरवले

धारावी प्रकल्पाच्या टिप्पणी वरून फडणवीस यांची राहुल यांच्यावर टीका

महाराष्ट्रात शरद पवार राहुल गांधी,यांच्या हेलिकॉप्टरची तपासणी

शरद पवारांच्या पॉवर पॉलिटिक्सचा महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत किती प्रभाव?

Show comments