Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

नेपाळ विमान दुर्घटनेत 14 जणांचा मृत्यू

Webdunia
बुधवार, 24 जुलै 2024 (13:15 IST)
नेपाळची राजधानी काठमांडूहून जाणारे विमान आज बुधवारी सकाळी (24 जुलै) त्रिभुवन विमानतळावर कोसळल्याचं सौर्य एअरलाइन्सने सांगितलं.सौर्य एअरलाइन्सच्या अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, विमानात क्रू मेंबर्ससह एअरलाइनचे सुमारे 17 कर्मचारी होते. या दुर्घटनेत 14 जणांचा मृत्यू झाला आहे.
बीबीसीला दिलेल्या माहितीनुसार फ्लाइटमध्ये केवळ कर्मचारीच होते. विमानाची ‘सी-चेक’ म्हणजेच चाचणी सुरू होती.
अपघातानंतर रुग्णवाहिका आणि अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. नेपाळी लष्करानेही बचावकार्यासाठी आपली टीम विमानतळावर तैनात केली आहे.
 
पायलटचा अभूतपूर्व बचाव
काठमांडू येथील पोलीस अधिकारी दिनेशराज मैनाली यांनी सांगितले की, त्यांना सकाळी 11.15 वाजता विमान अपघाताची माहिती मिळाली.
पेट घेतलेल्या विमानातून पायलटची सुटका करण्यात आली आहे. त्याला उपचारासाठी जवळच्या काठमांडू वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात नेण्यात आले आहे. आतापर्यंत दोन मृतदेह सापडल्याचं विमानतळावरील बचाव कार्य टीमने सांगितलं आहे.
 
अपघातानंतर काही क्षणांतच धावपट्टीजवळ धुराचे लोट उडाले. विमानतळावरील एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, कोसळण्याआधी विमानातून "काही कर्कश आवाज ऐकू आले".
 
नेपाळमधील विमान दुर्घटना
जानेवारी 2023: 4 क्रू मेंबर्स आणि 68 प्रवाशांसह काठमांडूहून उड्डाण करणारे यति एअरलाइन्सचे ATR 72 विमान पोखरा आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळ कोसळले, त्यात विमानातील सर्वांचा मृत्यू झाला.
मे 2022: पोखरा ते जोमसोमला जाणारे हवाई प्रवासी TwinOtter 9NAET विमान क्रॅश होऊन 22 जणांचा मृत्यू झाला.
एप्रिल 2019: लुक्ला विमानतळावर धावपट्टीजवळ समिट एअरचे विमान दोन हेलिकॉप्टरला धडकल्याने किमान तीन जण ठार झाले.
फेब्रुवारी 2019: ताप्लेजुंगमधील पाथीभराजवळ एअर डायनेस्टीचे हेलिकॉप्टर क्रॅश होऊन नेपाळ सरकारमधील तत्कालीन मंत्री रवींद्र अधिकारी यांच्यासह सात जणांचा मृत्यू झाला.
सप्टेंबर 2018: गोरखा ते काठमांडूला जाणारे अल्टिट्यूड एअर हेलिकॉप्टर जंगलात कोसळले. त्यात एक जपानी पर्यटक आणि इतर पाच जण ठार झाले.
मार्च 2018: बांगलादेशहून नेपाळला जाणारे यूएस-बांगला एअरलाइन्सचे विमान त्रिभुवन आंतरराष्ट्रीय विमानतळावर कोसळले, 51 जणांचा मृत्यू झाला.
फेब्रुवारी 2016: पोखराहून जोमसोमला जाणारे तारा एअरचे विमान कोसळले, त्यात 23 जणांचा मृत्यू झाला
मे 2015: भूकंपानंतरच्या मदत आणि बचाव कार्यात गुंतलेले अमेरिकन लष्कराचे हेलिकॉप्टर चरीकोटजवळ क्रॅश झाले; यात सहा अमेरिकन सैनिक, दोन नेपाळी लष्करी अधिकारी आणि पाच नागरिक ठार झाले
जून 2015: सिंधुपालचौक येथे भूकंप मदत आणि बचावासाठी डॉक्टर्स विदाऊट बॉर्डर्सने चार्टर्ड केलेले हेलिकॉप्टर कोसळून चार जणांचा मृत्यू झाला.
मार्च 2015: तुर्की एअरचे विमान धावपट्टीवरून घसरल्याने त्रिभुवन आंतरराष्ट्रीय विमानतळ चार दिवसांसाठी बंद झाले.
फेब्रुवारी 2014: नेपाळ एअरलाइन्स कॉर्पोरेशनचे विमान अर्घाखांची येथे कोसळून 18 जणांचा मृत्यू झाला.
सप्टेंबर 2012: सीता एअरचे विमान त्रिभुवन आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळ कोसळले, त्यात विमानातील सर्व 19 लोक ठार झाले.
मे 2012: भारतीय यात्रेकरूंना घेऊन जाणारे अग्नी एअरचे विमान जोमसोम विमानतळाजवळ कोसळले, त्यात 19 जणांचा मृत्यू झाला.
सप्टेंबर 2011: काठमांडूजवळील कोटदंडा येथे बुद्ध एअरचे विमान डोंगराळ उड्डाणावर कोसळले; नेपाळी, भारतीय आणि इतर नागरिकांसह 14 लोकांचा मृत्यू झाला
ऑगस्ट 2010: काठमांडूहून लुक्लाला जाणारे विमान कोसळून 14 जणांचा मृत्यू झाला.
ऑक्टोबर 2008: लुक्ला विमानतळावर लँडिंग अपघातात 18 ठार.
सप्टेंबर 2006: श्री एअरचे हेलिकॉप्टर संखुवासभेच्या घुंसा येथे कोसळून 24 जणांचा मृत्यू झाला.
Published By- Priya Dixit 
 
 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Margashirsha Purnima 2024: मार्गशीर्ष पौर्णिमेला लक्ष्मी देवीची कृपा मिळविण्यासाठी कोणते उपाय करावेत?

Annapurna Jayanti 2024: अन्नपूर्णा जयंतीच्या दिवशी स्वयंपाकघरात किती दिवे लावावेत?

वृश्चिक राशीत बुधाचा उदय या राशींसाठी खूप शुभ राहील

बाळासाठी भगवान दत्तात्रेयाच्या नावावरुन सुंदर नावे

दत्त जयंती विशेष रेसिपी : सुंठवडा

सर्व पहा

नवीन

जॉर्जियामधील रेस्टॉरंटमध्ये 12 भारतीय मृत आढळले

LIVE: फडणवीस मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने मुनगंटीवारही संतप्त

परभणी हिंसाचार आणि सरपंच हत्या प्रकरणावर चर्चा करण्यास फडणवीस सहमत

ठाण्यात कलयुगी बापाने आपल्या मुलीवर बलात्कार केला

अदानीविरोधात याचिका दाखल करणाऱ्या व्यक्तीला मुंबई उच्च न्यायालयाकडून दंड

पुढील लेख
Show comments