Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

दक्षिण कोरिया: सोलमध्ये हॅलोविनदरम्यान 151 जणांचा गुदमरून मृत्यू

Webdunia
रविवार, 30 ऑक्टोबर 2022 (09:18 IST)
दक्षिण कोरियाची राजधानी सोल येथे शनिवारी (29 ऑक्टोबर) हॅलोविनचा सण साजरा करत असताना जमलेल्या गर्दीमुळे गुदमरून मृत्यू अनेकांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये 151 जणांचा मृत्यू झाला आहे.
 
या मृतांमध्ये 19 परदेशी नागरिकांचा समावेश आहे.
 
काही जणांचा चेंगराचेंगरीमुळे, तर काही जणांचा गुदमरून मृत्यू झाला आहे. गर्दीमुळे काही जणांना कार्डिअॅक अरेस्टही झाल्याचे काल म्हटले गेले होते.
 
राष्ट्राध्यक्ष यून सूक योल यांनी आपात्कालीन विभागाच्या चमूला घटनास्थळी पाचारण केलं आहे. इतावून या भागात ही घटना घडली.
 
कोरोना संकटानंतर पहिल्यांदाच नो मास्क हॅलोवीन साजरा करण्यासाठी या परिसरात लाखभर लोक जमले होते.
 
सोल शहरातले रस्ते हॅलोवीन साजरा करणाऱ्या नागरिकांनी फुलले होते.
 
ही घटना कशी घडली?
सोलमध्ये इतावून नावाचा परिसर आहे. या ठिकाणी हॅलोविनसाठी गर्दी जमा झाली होती. या परिसरात लाखाहून अधिक लोक आले होते. या ठिकाणच्या गल्ल्या अरुंद आहेत. त्यात चेंगराचेंगरी झाली आणि लोक गुदमरून गेले.
 
गर्दी इतकी वाढली होती की लोक अक्षरशः लोकांना तुडवत आपला रस्ता शोधू लागले होते असे पॅरामेडिक कर्मचाऱ्यांनी सांगितले.
 
सोशल मीडियावर दिसणाऱ्या फोटोत रस्त्यावर मृतदेह असल्याचं दिसत आहे.
 
आपात्कालीन विभागाचे कर्मचारी आणि अन्य नागरिक रस्त्यावर बेशुद्धावस्थेत पडलेल्या नागरिकांवर उपचार करत असल्याचं दिसत आहेत.
 
योंगसान जिल्ह्यातील प्रत्येकाला मोबाईलमध्ये इमर्जन्सी असा संदेश पाठवण्यात आला आहे. लवकरात लवकर घरी परता असा संदेश देण्यात आला आहे.
 
जगभरातील नेत्यांकडून शोक संदेश
या घटनेनंतर जगभरातील नेत्यांनी दक्षिण कोरियाला सांत्वनपर संदेश पाठवले आहेत.
 
कॅनडाचे पंतप्रधान जस्टीन ट्रुडो यांनी म्हटले आहे की, "दक्षिण कोरियाच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. कॅनडियन जनता तुमच्यासोबत आहे. दक्षिण कोरियात झालेली चेंगराचेंगरी दुर्दैवी आहे. जखमींच्या तब्येतीत लवकरात लवकर सुधारणा व्हावी अशी प्रार्थना मी करतो."
 
युनायटेड किंगडमचे पंतप्रधान ऋषी सुनक यांनी मृतांना श्रद्धांजली वाहिली आहे. आम्ही दक्षिण कोरियातील जनतेच्या दुःखात सहभागी आहोत, असं ऋषी सुनक यांनी म्हटले आहे.
 
सोलची घटना जगातील सर्वाधिक दुर्दैवी घटनांपैकी एक
गेल्या दशकभरात जगभरात घडलेल्या चेंगराचेंगरीच्या सर्वांत दुर्दैवी घटनांपैकी एक असल्याचे म्हटले जात आहे.
 
2015 साली सौदी अरेबियातील मक्का येथे हज यात्रेसाठी आलेल्या भाविकांची गर्दी जमली होती. यावेळी किमान 2000 जणांचा मृत्यू झाला असल्याचे वृत्त होते.
गेल्या महिन्यातच इंडोनेशियातील पूर्व जावातील मलंग फुटबॉल मैदानावर झालेल्या चेंगराचेंगरीत 130 जणांचा मृत्यू झाला होता.
2013 साली मध्य प्रदेशात दातिया या ठिकाणी नवरात्रीच्या उत्सवादरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीत 115 जणांचा मृत्यू झाला होता.
2005 साली सातारा जिल्ह्यातील मांढरदेवी यात्रेदरम्यान चेंगराचेंगरी झाली होती. त्यावेळी 300 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला होता.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Chaitra Navratri 2025 भारतातील दहा प्रमुख श्रीराम मंदिर

Gudi Padwa 2025 Rangoli Designs गुढीपुढे काढण्यासाठी रांगोळी डिझाईन

हिंदू नववर्षापूर्वी घरातून बाहेर काढून टाका या ७ वस्तू, जीवनात सुख-समृद्धी येईल

फाटलेले ओठ गुलाबी करण्यासाठी नारळाच्या तेलात हे मिसळून लावा

नारळ पाणी कोणी पिऊ नये पिण्यापूर्वी त्याचे तोटे जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

मध्य प्रदेशातील उज्जैनसह १९ धार्मिक स्थळांवर आज मध्यरात्रीपासून दारूबंदी

रतन टाटा यांचे मृत्युपत्र : Ratan Tata यांनी संपत्तीचा मोठा भाग दान केला, कोणाला काय मिळाले ते पहा

LIVE: महाराष्ट्रात काही भागात पावसाचा येलो आणि ऑरेंज अलर्ट जारी

ठाणे: दोन अल्पवयीन मुलांकडून तरुणावर चाकूहल्ला, मृतदेह नदीत फेकून दिला

MI vs KKR : मुंबईने २४ व्यांदा केकेआरला हरवले

पुढील लेख
Show comments