Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

कॅनडात चोरी आणि मंदिरांवर हल्ला केल्याप्रकरणी ३ जणांना अटक, हिंदू समाजात संतापाची लाट

Webdunia
शनिवार, 5 मार्च 2022 (21:31 IST)
मंदिरांवर झालेल्या चोरी आणि हल्ल्याप्रकरणी कॅनडात तिघांना अटक करण्यात आली आहे, तर एकाचा शोध सुरू आहे. या दिवसांमध्ये कॅनडात धार्मिक स्थळांमध्ये लुटमार आणि हिंसाचाराच्या घटना वाढल्या होत्या. हल्ले प्रामुख्याने मंदिरांवर होत होते. अशा स्थितीत हिंदू समाज संतप्त झाला होता. कॅनडाच्या पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. 

नोव्हेंबर 2021 ते मार्च 2022 दरम्यान अनेक मंदिरे लुटली गेली आहेत. मंदिरांमधील दानपेट्यांमधून पैसे चोरीच्या घटना अनेकदा घडल्या आहेत. अनेक ठिकाणी चोरट्यांनी संपूर्ण दानपेटी घेऊन पलायन केले. याप्रकरणी एका इंडो-कॅनडियन व्यक्तीला अटक करण्यात आली आहे.
 
अशा 13 घटना घडल्याचे पील पोलिसांनी सांगितले. त्यापैकी 9घटना हिंदू मंदिरांमध्ये घडल्या. याशिवाय जैन मंदिर आणि गुरुद्वारांमध्येही काही घटना घडल्या आहेत. "चौथ्या आरोपीचीही ओळख पटली आहे, परंतु अटक करणे बाकी आहे," असे पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. त्यालाही लवकरच अटक करण्यात येईल. हे गुन्हे द्वेषातून झाले आहेत. सर्व बाजू लक्षात घेऊन तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. 
 
पोलिस अधिकाऱ्यांनी 16 फेब्रुवारी रोजी धार्मिक नेत्यांचीही भेट घेतली होती. याशिवाय ब्रॅम्प्टनचे महापौरही या बैठकीला उपस्थित होते. अशा सुमारे १८ घटना घडल्याचे तेथे उपस्थित लोकांनी सांगितले. त्याचबरोबर मंदिरांची सुरक्षा वाढवण्यावर भर दिला जाणार असल्याचे पोलिस प्रवक्त्याने सांगितले.

संबंधित माहिती

हैदराबाद विरुद्ध लखनौ सामना हा आयपीएल प्लेऑफ क्वालिफायरसारखा असेल

धाराशिवमध्ये मतदान केंद्राजवळ चाकूने हल्ला करून एकाची हत्या

रुपाली चाकणकर यांच्या विरोधात पुण्यात गुन्हा दाखल

कोल्हापूर मतदान केंद्रावर वृद्धाचा हृदय विकाराच्या धक्क्याने मृत्यू

भारतीय महिलां आणि पुरुष संघ 4x400 मीटर रिले संघ पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र ठरला

Israel Hamas War : हमास ने शांतता करार प्रस्तावाला स्वीकार केलं, इस्त्रायलने अशी दिली प्रतिक्रिया

लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात राज्यात 5 वाजे पर्यंत सरासरी 53.40 टक्के मतदान झालं

अरविंद केजरीवाल यांच्या न्यायालयीन कोठडीत 20 मे पर्यंत वाढ, सर्वोच्च न्यायालयाकडून कोणताही दिलासा नाही

विजय वडेट्टीवार यांच्या विवादास्पद वक्तव्याची चौकशी होणार! फडणवीसांचा इशारा

सुप्रिया सुळे अजित पवारांच्या घरी गेल्यावर फडणवीस यांची प्रतिक्रिया

पुढील लेख
Show comments