Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

अफगाणिस्तान भूकंप : ‘सकाळपासून 500 जखमी लोक दवाखान्यात आले, त्यातले 200 मरण पावलेत’

Webdunia
शुक्रवार, 24 जून 2022 (18:04 IST)
मंगळवार आणि बुधवारच्या मध्यरात्री अफगाणिस्तानमध्ये जो भूकंप झाला त्यातील मृतांची संख्या 1000 च्या वर गेली आहे.
 
मागील बऱ्याच दशकांपासून युद्ध आणि संघर्षाचा सामना करत असलेल्या अफगाणिस्तानसाठी हा भूकंप आणखीन भयावह ठरताना दिसत आहेत.
 
ही भयावहता दवाखान्यांसमोर लागलेल्या रांगांमधून दिसून येत आहे.
 
पूर्व अफगाणिस्तानच्या पक्तिका प्रांतातील एका क्लिनिकचे कर्मचारी मुहम्मद गुल बीबीसीशी बोलताना सांगतात की, "सकाळपासून 500 जखमी लोक इथं आले, त्यापैकी 200 तर मरण पावलेत."
 
फक्त हेच एक क्लिनिक नाही तर इतर अनेक क्लिनिक्सना आव्हानांचा सामना करावा लागतोय. काही ठिकाणी फक्त पाच बेडचं रुग्णालय आहे. मात्र त्याठिकाणी शेकडो गंभीर जखमी रुग्ण दाखल होत आहेत.
 
भूकंपानंतरची दयनीय परिस्थिती
6.1 तीव्रतेच्या रिश्टर स्केलच्या या भूकंपामुळे तात्पुरत्या स्वरूपात उभारलेल्या रुग्णालयांचही मोठं नुकसान झालं आहे.
 
मुहम्मद गुल सांगतात की, "क्लिनिकच्या सर्व खोल्या पूर्णपणे उद्ध्वस्त झाल्या आहेत."
 
ते पुढे सांगतात की, काही रुग्णांना उपचारासाठी हेलिकॉप्टरने शहरांमध्ये नेण्यात आलंय.
 
जखमींची काळजी घेण्यासाठी या रुग्णालयात दोनच डॉक्टर आहेत. हे एवढंच नाही, तर या रुग्णालयात वीजपुरवठा ही सुरळीत नाहीये.
 
इथं जनरेटरला लागणार इंधन संपलंय. इतर ठिकाणांहून मदत येणं बाकी आहे.
 
गुल म्हणतात, "इथल्या अनेकांना तात्काळ वैद्यकीय मदतीची गरज आहे. उद्या सकाळपर्यंत ते तग धरू शकतील असं मला काही वाटत नाही."
 
या भूकंपामुळे पहाडी भागात बांधलेली शेकडो घरे उद्ध्वस्त झाली असून भूस्खलनाच्या घटनाही समोर येत आहेत.
 
आंतरराष्ट्रीय संस्थांनी सुरू केलं होतं हॉस्पिटल
आंतरराष्ट्रीय मानवतावादी संघटनांनी रुग्णांची प्राथमिक तपासणी करण्याच्या हेतूने हे हॉस्पिटल सुरू केलं होतं.
 
या हॉस्पिटलमध्ये इमर्जन्सी ट्रॉमा सेंटरसारख्या सुविधा नाहीत. गेल्यावर्षी तालिबानने सत्ता हाती घेतली. तेव्हापासून बहुतांश आंतरराष्ट्रीय संघटना अफगाणिस्तानातून निघून गेल्या.
 
त्या क्षणापासून स्थानिक वैद्यकीय यंत्रणेला औषधांसह इतर जीवनावश्यक वस्तू आणि कर्मचाऱ्यांची कमतरता भासत आहे.
 
याच भागात काम करणाऱ्या एका स्वयंसेवकाने सांगितलं की, तालिबानचे कार्यकारी जिल्हा गव्हर्नर या बाधित भागाला भेट देण्यासाठी आले होते, मात्र इथल्या लोकांनी त्यांना हाकलून लावलं.
या व्यक्तीने नाव न सांगण्याच्या अटीवर माहिती दिली की, "तालिबानी व्यवस्था या आपत्तीचा सामना करण्यासाठी सक्षम नाहीये. इथं कोणत्याही प्रकारची व्यवस्था उपलब्ध नाही. आम्ही आंतरराष्ट्रीय मदतीची अपेक्षाही करू शकत नाही. जगाला अफगाणिस्तानचा विसर पडलाय."
 
तालिबान सत्तेवर येण्यापूर्वी सुद्धा नैसर्गिक आपत्तींना तोंड देण्यासाठी अफगाण शहरे आणि शहरांमधील आपत्कालीन सेवांकडे मर्यादित क्षमताच होती. तेव्हाही विमाने आणि हेलिकॉप्टर यांची कमतरता होती.
 
पक्तीकाच्या आरोग्य विभागाच्या म्हणण्यानुसार, यावेळी वेदनाशामक आणि अँटीबायोटिक औषधांचा तुटवडा आहे.
 
औषधांचा तीव्र तुटवडा
या हॉस्पिटलमध्ये काम करणाऱ्या एका डॉक्टरने तिथपर्यंत पोहोचलेल्या तरुण वडिलांची मनस्थिती काय होती त्याच वर्णन केलं.
 
तो म्हणाला, 'या माणसाचं चेस्ट फ्रॅक्चर होतं, पण हा माणूस फक्त त्याच्या कुटुंबाबद्दल विचारून विचारून रडत होता. जर त्याच्या कुटुंबातील कोणीही जिवंत नसेल तर माझ्या ही जगण्यात अर्थ नाही असं तो म्हणत होता'.
 
डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे या क्लिनिकमध्ये पोहोचलेले बहुतेक तर पुरुष होते. कारण स्त्रिया आणि मुलांनी स्वतःहून ढिगाऱ्यातून बाहेर येण्याची शक्यता कमी असते.
 
काही मुलंही आई-वडिलांशिवाय रुग्णालयात पोहोचली होती. त्यात एका आठ वर्षांच्या गंभीर जखमी मुलाचा समावेश होता.
 
डॉक्टर सांगत होते की, "तो आठ वर्षांचा मुलगा इथल्या लोकांना विनवण्या करत होता की, कोणीतरी त्याच्या घरी जाऊन ढिगाऱ्यात अडकलेल्या त्याच्या आई-वडील आणि भावंडांना मदत करा. त्याच्या कुटुंबियांचा मृत्यू झाल्याचं मी कोणालातरी सांगताना त्याने ऐकले. यानंतर तो आरडाओरडा करून बेशुद्ध पडला."
 
बीबीसीच्या प्रतिनिधींना औषधोपचारांची वाट पाहत असलेल्या गंभीर जखमी लोकांचे फोटो दाखवण्यात आले आहेत.
 
तसेच भूकंपात मृत्युमुखी पडलेल्यांचे मृतदेह ढिगाऱ्याखाली पडून आहेत. मदतकार्य सुरू करण्यासाठी इथं कोणतीही अधिकृत व्यवस्था नाही.
 
आसपासच्या शहरांतले सामान्य लोक इथं येऊन मदतकार्यात हातभार लावत आहेत. एका रेस्क्यू कर्मचाऱ्याने ढिगाऱ्याखालून सुमारे 40 मृतदेह बाहेर काढले, त्यापैकी बहुतेक तरी मुले होती.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

मार्गशीर्ष गुरुवारी महाविष्णूच्या पूजेचे महत्त्व आणि उपासनेची सोपी पद्धत जाणून घ्या

हे 3 गुण असलेल्या महिला भाग्यवान असतात, नवरा आणि सासरचे लोक नेहमी आनंदी राहतात !

घरात या 5 पक्ष्यांचे फोटो लावा, ज्ञान- समृद्धी वाढते, तिजोरी धनाने भरलेली राहते

आपले नाते कसे मजबूत करावे, 5 गोष्टी लक्षात ठेवा

त्वचेच्या कर्करोगाच्या संरक्षणासाठी हे उपाय खूप प्रभावी आहेत

सर्व पहा

नवीन

भिवंडीतील भंगार गोदामाला भीषण आग,कोणतीही जीवितहानी नाही

LIVE:निवडणूक निकालानंतर व्हीबीए कोणाला पाठिंबा देईल, प्रकाश आंबेडकर यांचा खुलासा

निवडणूक निकालानंतर व्हीबीए कोणाला पाठिंबा देईल, प्रकाश आंबेडकर यांचा खुलासा

Baba Siddique Murder: बाबा सिद्दीक हत्याकांड प्रकरणात अकोल्यातून 26 वी अटक

आईने आपल्या दोन निष्पाप मुलांची पाण्याच्या टाकीत बुडवून हत्या केली

पुढील लेख
Show comments