Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

अमेरिकेत शिक्षण घेणार्‍या विदेशी विार्थ्यांना फायदा

Webdunia
सोमवार, 3 डिसेंबर 2018 (11:41 IST)
'एच-1 बी' प्रक्रियेत बदलाचा प्रस्ताव
 
अमेरिकेमध्ये ट्रम्प प्रशासनाने 'एच-1 बी' व्हिसासाठी अर्ज करण्याच्या प्रक्रियेत मोठा बदल करण्याचा प्रस्ताव समोर ठेवला आहे. त्यानुसार कंपन्यांना त्यांच्या अर्जांची आगाऊ इलेक्ट्रॉनिक पद्धतीने नोंदणी करावी लागणार आहे. विशेष कौशल्य आणि उच्च वेतन घेणार्‍या विदेशी कर्मचार्‍यांना या प्रक्रियेनुसार प्राधान्य देण्यात येणार आहे. यामुळे अमेरिकेत शिक्षण घेणार्‍या विदेशी विद्यार्थ्यांना मिळणार्‍या एच-1 बी व्हिसाच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता आहे.
 
भारतातील आययटी कंपन्या आणि व्यावसायिक 'एच-1 बी' व्हिसासाठी सर्वाधिक अर्ज करतात. हा अस्थलांतर व्हिसा असून याद्वारे विशेष व्यवसायासाठी विदेशी कर्मचार्‍यांना अमेरिकेत नोकरी मिळते. भारत आणि चीनमधून हजारो तरुणांना नोकरी देण्यासाठी कंपन्यांना या व्हिसावर अवलंबून राहावे लागते. नव्या प्रस्तावित गुणवत्ताधारित नियमांनुसार अमेरिकेने निर्धारित केलेल्या मर्यादेमध्ये ज्या कंपन्या विदेशी कर्मचार्‍यांना नोकरी देतात, त्यांना पहिल्यांदा अमेरिकेच्या सिटीझनशिप अँड इमिग्रेशन   सर्व्हिसेसमध्ये इलेक्ट्रॉनिक पद्धतीने दिलेल्या कालावधीमध्ये आगाऊ नोंदणी करावी लागणार आहे. 'एच-1 बी'साठी प्रत्येक वर्षासाठी 65 हजार मर्यादा आहे. त्यातील अमेरिकेमध्ये पदव्युत्तर पदवी घेतलेल्या विद्यार्थ्यांच्या पहिल्या 20 हजार व्हिसांना या मर्यादेचे बंधन नाही. नव्या नियमांनुसार मात्र एच-1 बी व्हिसाच्या निवडीसाठी सरसकट विशेष कौशल्य, उच्च वेतन आणि गुणवत्ताधारित कर्मचार्‍यांचा विचार करण्यात येणार अमेरिकेच्या गृहखात्याने दिलेल्या माहितीमध्ये सांगितले आहे, की यामुळे अमेरिकेमध्ये शिक्षण घेतलेल्या विदेशी कर्मचार्‍यांची संख्या वाढेल. तसेच, गुणवत्ताधारित कर्मचार्‍यांचीदेखील संख्या वाढेल. आगाऊ नोंदणीमुळे अर्जांची एकूण संख्या कमी होईल आणि किमतीतही मोठी बचत होईल. ट्रम्प प्रशासनाच्या बाय अमेरिकन, हायर अमेरिकन धोरणानुसार गृहखात्याने एच-1बी व्हिसासाठीच्या प्रक्रियेमध्ये बदल करावेत, अशा सूचना देण्यात आल्या होत्या.
 
प्रस्तावित नियमांमुळे काय होणार?
कंपन्यांना एच1बी व्हिसासाठीच्या अर्जांची आगाऊ इलेक्ट्रॉनिक पद्धतीने नोंदणी करावी लागणार.
 
विशेष कौशल्य आणि उच्च वेतन घेणार्‍या विदेशी कर्मचार्‍यांना प्राधान्य देण्यात येणार.
 
अमेरिकेमध्ये शिक्षण घेतलेल्या विदेशी कर्मचार्‍यांना फायदा होणार.
 
गुणवत्ताधारित कर्मचार्‍यांचीदेखील संख्या वाढणार.

संबंधित माहिती

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

कल्याणमधून श्रीकांत शिंदे आणि ठाण्यातून नरेश गणपत म्हस्के यांना तिकीट

'मी जिवंत असेपर्यंत मुस्लिमांना धर्माच्या आधारे आरक्षण देणार नाही', पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य

मुबंई लोकसभेच्या 6 जागांसाठी या नेत्यांमध्ये होईल सामना

Russia-Ukraine War : ओडेसामध्ये रशियाचा क्षेपणास्त्र हल्ला, पाच जण ठार

नेहरू-गांधी घराण्याच्या तीन पिढ्यांनी देशासाठी बलिदान दिले; शरद पवारांचे वक्तव्य

पुढील लेख
Show comments