एका पाळणात घरीतील 3 वर्षांच्या मुलाने इतर दोन मुलांवर गोळ्या झाडून त्यांना जखमी केल्याची घटना घडल्याची माहिती पोलीसांनी दिली आहे. या प्रकरणी मुलाच्या पालकांवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
समांथा युबॅंक्स हिच्या डीयरबॉर्न मिशिगनमधील पाळणाघरात सहा लहान लहान मुले सांभाळण्यासाठी येतात. सकाळी समांथाला वरच्या मजल्यावरून मोठा आवाज आणि गडबड ऐकू आली. ती धावतच वर गेली आणि पाहिले, तर तिच्या तीन वर्षांच्या मुलाच्या हातात तिच्या पतीची हॅंडगन होती, आणि त्याने दोन मुलांवर गोळ्या झाडल्या होत्या. ही दोन्ही मुले तीन वर्षांचीच होती. एकाच्या डोक्यात गोळी घुसली होती, तर दुसऱ्याचा खांद्यात गोळी घुसली होती. गंभीर अवस्थेत दोन्ही मुलांना हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले.
दोन्ही मुलांची प्रकृती आता धोक्याच्या पलीकडे असून त्यांच्यात सुधारणा होत आहे. मात्र डोक्यात गोळी घुसलेल्या मुलाचा एक डोळा निकामी झाला असून त्याच्यावर अनेक शस्त्रक्रिया करण्यात आल्याची माहिती स्थानिक वृत्तवाहिनीने दिली आहे.
गुरुवारी समांथा आणि टिमोथी या युबॅंक्स पतिपत्नीवर पोलीसांनी आरोपपत्र दाखल केले आहे. युबॅंक्स आपल्या घरात विनापरवाना पाळणाघर चालवत होते. दुसऱ्या मजल्यावरील आपल्या पतीच्या बेडरूममध्ये त्याची शस्त्र असुरक्षिपने ठेवलेली असतात हे समांथाला माहीत होते. आरोप सिद्ध झाल्यास समांथा आणि टिमोथी दहा वर्षांचा तुरुंगवासाची शिक्षा होई शकेल. या जोडप्याला सहा मुले असून गोळ्या झाडणारा तीन वर्षांच्या मुलगा त्याच्या जुळ्या मुलांपैकी एक आहे.