Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

अफगाणिस्तानात विनाशकारी भूकंप, 1000 जणांचा मृत्यू; 1500 हून अधिक जखमी

Webdunia
बुधवार, 22 जून 2022 (19:50 IST)
सोशल मीडियावर आलेल्या फोटोंमध्ये लोक स्ट्रेचरवर आणि ढिगाऱ्याखाली असल्याचं दिसत आहे. भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 6.1 इतकी नोंदली गेल्याचं अमेरिकेच्या जिऑलॉजिकल सर्व्हेने म्हटलं आहे.
 
 
जीवितहानीची संख्या वाढू शकतं असं स्थानिक प्रशासनाने बीबीसीशी बोलताना सांगितलं. खोस्ट नावाच्या शहरापासून साधारण 44 किलोमीटरच्या अंतरावर भूकंपाचा केंद्रबिंदू होता.
 
भूकंपाचे धक्के अफगाणिस्तानच्या बहुतांश भागांसह पाकिस्तान आणि भारतातही जाणवले असं युरोपियन मेडिटेरिअन सेसमोलॉजिकल सेंटरने म्हटलं आहे.
 
अफगाणिस्तानची राजधानी काबूल तसंच पाकिस्तानचे राजधानी इस्लामाबादमध्येही भूकंपाचे धक्के जाणवले आहेत.
 
या भूकंपात असंख्य घरं उद्धस्त झाली आहेत असं अफगाणिस्तान सरकारचे प्रवक्ते बिलाल करिमी यांनी ट्वीट करून म्हटलं आहे. दुर्घटनाग्रस्त भागाला त्वरित मदत पुरवण्याचं आवाहन संबंधित यंत्रणांना दिले आहेत.
 
पहाटेच्या वेळेस भूकंप झाल्याने अनेकजण झोपेत होते.
 
 
सर्वाधिक बळी गयान आणि बारमल जिल्ह्यात गेले आहेत, असं एका स्थानिक डॉक्टरने बीबीसीला सांगितलं. स्थानिक माध्यमांनुसार गयानमधलं एक संपूर्ण गाव गाडलं गेलंय.
 
या भूकंपाचे धक्के पाकिस्तान आणि भारतातही जाणवले, पण तिथे जीवितहानी झाल्याचं वृत्त नाहीये.
 
अफगाणिस्तानात नेहमीच भूकंप होत असतो, कारण टेक्टोनिक प्लेट्स सक्रिय असणाऱ्या भूमीवर हा देश वसला आहे. अनेक फॉल्ट लाईन्स (भूकंप होती अशा जागा) इथून जातात. यातल्या काही फॉल्ट लाईन्सची नावं आहेत चामान फॉल्ट, हरी रूद फॉल्ट, सेंट्रल बदक्षां फॉल्ट आणि दरवेज फॉल्ट.
 
गेल्या 10 वर्षांत अफगाणिस्तानात झालेल्या भूकंपांमुळे सुमारे 7000 लोकांचे जीव गेलेले आहेत, असं संयुक्त राष्ट्रांच्या एका विभागाचा अहवाल सांगतो.
 
इथे दरवर्षी सरासरी 560 लोकांचे जीव भूकंपामुळे जातात. तालिबानी अधिकाऱ्यांनी सरकारी यंत्रणांनी मदतीसाठी तत्परतेने धावून जावं असं म्हटलं आहे.
 
कित्येक दशकं सततच्या संघर्षामुळे भूकंपविरोधी यंत्रणा तयार करण्यात या देशाला अपयश आलेलं आहे.
 
तालिबानने अफगाणिस्तान ताब्यात घेण्याआधीही अफगाणिस्तानच्या आपत्ती निवारण सेवेला नैसर्गिक आपत्ती दरम्यान मदतकार्य पोहचवण्यात अडचण यायची. या विभागाकडे फारच कमी विमानं आणि हेलिकॉप्टर्स आहेत, त्यामुळे लोकांचा बचाव करण्यात अडथळे येतात.
 
 

संबंधित माहिती

मुंबईत इमारतीच्या 40 फूट खोल सेप्टिक टँकमध्ये पडून दोन कामगारांचा मृत्यू

वंदे भारत गाड्यांमध्ये अर्धा लिटर पाण्याच्या बाटल्या मिळणार

उद्धव ठाकरेंच्या 'अभद्र' वक्तव्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलं सडेतोड उत्तर

कोटक महिंद्रा बँकेवर RBI ची कारवाई, क्रेडिट कार्ड जारी करण्यास बंदी

75 फूट उंचीवरून महिला थेट ज्वालामुखीत पडली, मृत्यू

ब्रिटिश संसदेने रवांडा निर्वासन विधेयक मंजूर केले

मलेशियामध्ये दोन नौदलाचे हेलिकॉप्टरची जोरदार धडक सर्व 10 क्रू मेंबर्स ठार

IPL 2024: 56 चेंडूत शतक झळकावून रुतुराज गायकवाडने इतिहास रचला

LSG vs CSK : मार्कस स्टॉइनिसने IPL मधील 13 वर्षे जुना विक्रम मोडला

टेनिस स्टार नोव्हाक जोकोविचची वर्षातील सर्वोत्तम खेळाडू म्हणून 5 व्यांदा निवड

पुढील लेख
Show comments