Dharma Sangrah

मॅक्सिकोत भूकंप, 119 ठार, मृतांचा आकडा वाढण्याची भीती

Webdunia
बुधवार, 20 सप्टेंबर 2017 (09:03 IST)
मॅक्सिको देशाची राजधानी मॅक्सिको सिटी बुधवारी शक्तिशाली भूकंप झाला आहे. या भूकंपात आतापर्यंत 119 जण ठार झाले आहेत. तर मृतांचा आकडा वाढण्याची भीतीही व्यक्त करण्यात येत आहे. मॅक्सिकोमध्ये 1985 सालानंतर आलेला सर्वात विध्वंसकारी भूकंप आहे.
 
अमेरिकेच्या जिओलॉजिकल सर्व्हेनुसार, भूकंपाची तीव्रता 7.1 रिश्टर स्केल एवढी मोजण्यात आली आहे. तसेच भूकंपाचा केंद्रबिंदू पूएब्ला प्रांतामध्ये होता. मॅक्सिकोचे राष्ट्रपती पेना निएटो यांनीही भूकंपाच्या दुर्घटनेत मोठं नुकसान झाल्याचं सांगितलं आहे. तसेच या भूकंपात जवळपास 27 इमारती कोसळल्याही माहितीही त्यांनी दिली आहे.  ढिगा-याखाली अनेक लोक दबल्याची भीतीही मॅक्सिकोच्या महापौरांनी व्यक्त केली आहे. भूकंपानंतर मॅक्सिको सिटी विमानतळावरून विमानांचं उड्डाण रोखण्यात आलं आहे.
 
विशेष म्हणजे मॅक्सिकोमध्ये 1985मध्ये झालेल्या भूकंपाच्या 32 वर्षांनंतर त्याच दिवशी मॅक्सिको सिटी पुन्हा एकदा विध्वंसक भूकंपानं हादरली आहे. 1985 साली मॅक्सिकोमध्ये झालेल्या शक्तिशाली भूकंपात 5 हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला होता.  

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Morning Mantras सकाळी उठल्यावर या 4 मंत्रांचा उच्चार करा, सर्व अडचणी दूर होतील

उत्तम करिअर घडवण्यासाठी या गोष्टी लक्षात ठेवा

तुळशीचे झाड काळे पडत आहे का? हे कारण असू शकते का? प्रतिबंधात्मक टिप्स जाणून घ्या

साप्ताहिक राशिफल 04 ते 10 जानेवारी 2026

मकरसंक्रांती रेसिपी : सोपी तीळ-गुळाची बर्फी

सर्व पहा

नवीन

LIVE: 12च्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी, या तारखेपासून हॉल तिकीट मिळणार

अबू आझमी यांचे नितेश राणेंवरील वादग्रस्त विधान, म्हणाले- मशिदीत प्रवेश करून दाखवा

शिंदे-फडणवीसां कडून बीएमसी निवडणुकीसाठीचा जाहीरनामा प्रसिद्ध, मुंबई आणि धारावीसाठी मोठी आश्वासने दिली

अमरावतीच्या धामणगाव रेल्वे परिसरात भूकंपाचे धक्के नसल्याचे स्पष्ट झाले

15 जानेवारीला सार्वजनिक सुट्टी जाहीर, राज्य सरकारचा निर्णय

पुढील लेख
Show comments