मेक्सिकोमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, मध्य मेक्सिकोमध्ये 6.3 रिश्टर स्केलचा भूकंप झाला. मात्र, जीवित किंवा वित्तहानी झाल्याचे वृत्त नाही.
नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीनुसार, मध्य मेक्सिकोच्या किनारपट्टीवर आज पहाटे 2:00 वाजता भूकंपाचे धक्के जाणवले. भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 6.3 इतकी मोजण्यात आली आहे.
गेल्या महिन्यातही मेक्सिकोमध्ये भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले होते. 25 मे रोजी पनामा-कोलंबिया सीमेजवळ कॅरिबियन समुद्रात भूकंपाचे धक्के जाणवले. रिश्टर स्केलवर त्याची तीव्रता 6.6 इतकी होती. मात्र, भूकंपामुळे कोणतीही हानी झालेली नाही.
18 मे रोजी मेक्सिकोमध्येही भूकंप झाला होता. त्यावेळी भूकंपाची तीव्रता 6.4 एवढी होती. भूकंपाचा केंद्रबिंदू ग्वाटेमालाच्या कॅनिला नगरपालिकेच्या आग्नेयेस 2 किमी अंतरावर होता.