Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

इलॉन मस्क : ट्विटरच्या अनेक कर्मचाऱ्यांचे राजीनामे, सोमवारपर्यंत कार्यालयही बंद

इलॉन मस्क : ट्विटरच्या अनेक कर्मचाऱ्यांचे राजीनामे  सोमवारपर्यंत कार्यालयही बंद
Webdunia
शुक्रवार, 18 नोव्हेंबर 2022 (11:24 IST)
उद्योगपती इलॉन मस्क यांनी ट्विटर कंपनी विकत घेतल्यापासून याठिकाणी अनेक घडामोडी घडत असल्याचं दिसून येत आहे.मस्क यांनी ट्विटर विकत घेताच वरीष्ठ पदाधिकाऱ्यांना नोकरीवरून काढलं होतं. यानंतर ब्लू टिक आणि कंपनी व्यवस्थापनासंदर्भात इतर घडामोडी सुरू असतानाच ट्विटर कंपनीची सर्व कार्यालये इमारती तात्पुरत्या स्वरुपात बंद करण्यात येत आहेत, असं कंपनीने कर्मचाऱ्यांना कळवलं आहे.
 
हा निर्णय तत्काळ लागू करण्यात येत असून येत्या सोमवारी म्हणजेच 21 नोव्हेंबर रोजी कार्यालये पुन्हा सुरू होतील, असं त्यांनी कर्मचाऱ्यांना पाठवलेल्या पत्रात म्हटलं आहे.
 
मात्र, ऑफिस बंद करण्याचं नेमकं कारण मात्र कंपनीने स्पष्ट केलं नाही.
 
इलॉन मस्क यांच्या नव्या अटी व शर्थी मान्य नसल्यामुळे ट्विटरच्या कर्मचाऱ्यांनी मोठ्या संख्येने राजीनामा दिला, त्याच कारणामुळे ही कार्यालये बंद करण्यात आली असल्याचं सांगण्यात येत आहे.
 
ब्लू टिक 29 नोव्हेंबरपासून नव्याने लाँच होणार
ट्विटरचे नवे मालक इलॉन मस्क यांनी ब्लू टिकसंदर्भात नुकतीच एक महत्त्वाची घोषणा केली होती. ट्विटर ब्लू टिक सबस्क्रिप्शन योजना 29 नोव्हेंबरपासून पुन्हा एकदा नव्याने लाँच करण्यात येईल, असं मस्क यांनी जाहीर केलं आहे.
 
केलेल्याएका ट्वीटमध्ये मस्क म्हणाले,
 
"29 नोव्हेंबर रोजी ट्विटरचं ब्लू-व्हेरिफाईड पुन्हा एकदा लाँच करण्यात येईल. हे पूर्वीपेक्षाही अधिक मजबूत असेल, याची दक्षता आम्ही घेणार आहोत."
 
ट्विटरचं ब्लू टिक हवं असेल तर त्यासाठी 7.99 डॉलर (सुमारे 650 रुपये) सबस्क्रिप्शन फी स्वरुपात द्यावे लागतील, अशी घोषणा मस्क यांनी ट्विटर कंपनी विकत घेताच केली होती.
 
पण त्यानंतर काही दिवसांनीच ट्विटरला आपली ही योजना तत्काळ बंद करावी लागली होती. कारण, या योजनेचा फायदा घेऊन अनेक फेक आणि पॅरोडी अकाऊंट्सनी आपल्यासाठी ब्लू व्हेरिफिकेशन टॅग विकत घेतलं होतं.
 
त्यामुळे, यामधील गोंधळ समोर आल्यानंतर ट्विटरला ही प्रक्रिया थांबवावी लागली होती.
 
'नोकरीवरून काढून चूक केली'
वरील ट्वीटशिवाय इलॉन मस्क यांनी आणखी एक ट्विट करून खळबळ माजवून दिली.
 
त्यांनी कामावरून कमी केलेल्या ट्विटरच्या दोन माजी कर्मचाऱ्यांना पुन्हा कामावर रूजू करून घेत असल्याचं सांगितलं.
 
इलॉन मस्क यांनी ट्विटर कंपनी विकत घेताच अनेक कर्मचाऱ्यांना घरचा रस्ता दाखवला होता. मात्र, त्यापैकी लिगमा आणि जॉनसन या कर्मचाऱ्यांना त्यांनी पुन्हा कामास बोलावलं.
 
या दोन्ही कर्मचाऱ्यांना कामावरून काढून आपण चूक केली होती, हे मान्य करतो. ही माझी खरंच घोडचूक होती. असं म्हणत लिगमा आणि जॉनसन यांना पुन्हा ट्विटरच्या सेवेत घेतल्याचं त्यांनी कळवलं आहे.
 
महिन्याला 7.99 डॉलरची आकारणी
आता ट्वीटर युजर्स स्वतःचा व्हेरिफाईड स्टेटस म्हणजेच ब्लु टिक खरेदी करू शकतात. ट्वीटरने यासंबंधी माहिती दिलीय.
 
ट्वीटरने ऍपल डिव्हाइसेसच्या अपडेटमध्ये म्हटलंय की, हे ब्लू टिक फिचर सध्या काही देशांमध्येच सुरू राहिल. ट्वीटरच्या ब्लू टिक सर्व्हिससाठी महिन्याला 7.99 डॉलर आकारले जातील.
 
पण ट्वीटरची ही पॉलिसी वादात अडकलीय, कारण ही सुविधा वापरण्यासाठी अनेक बनावट अकाऊंटस तयार करण्यात येतील अशी भीती व्यक्त केली जातेय.
 
ट्वीटर टेकओव्हर केलेल्या एलॉन मस्कने शुक्रवारी कंपनीतील अर्ध्या कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकलंय.
 
याआधी ब्लू टिक फक्त हाय प्रोफाइल आणि प्रभावशाली व्यक्ती, संस्थांसाठी उपलब्ध होतं. आणि ही टिक मिळवण्यासाठी त्यांना त्यांची आयडेंटिटी म्हणजेच ओळख सिद्ध करावी लागायची.
 
ब्लू टिक ही अस्सलतेची ओळख होती. म्हणजे युजर्सना प्लॅटफॉर्मवर विश्वसनीय माहिती ओळखण्यासाठी या ब्लू टिकमुळे मदत व्हायची.
 
पण एलॉन मस्कने ट्वीटर टेकओव्हर केल्यापासून ट्वीटरच्या पॉलिसीत बदल झाले आहेत. कोणताही युजर पैसे भरून ब्लू टिक मिळवू शकतो. पण या पॉलिसीमुळे सरकारी व्यक्ती, सेलिब्रिटी, पत्रकार आणि ब्रँडची तोतयागिरी वाढू शकते अशी चिंता व्यक्त होत आहे.
 
मि. एलॉन मस्क हे जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत. त्यांनी मागच्या महिन्यात 44 बिलियन यूएस डॉलर देऊन ट्वीटर खरेदी केलं. त्यांची वादात अडकलेली ही ब्लू टिक पॉलिसी ट्वीटरच्या उत्पन्नात विविधता आणण्याचा प्रयत्न करत असल्याचं दिसतंय.
 
शुक्रवारी त्यांनी कंपनीच्या 7500 कर्मचाऱ्यांपैकी निम्म्या लोकांना कामावरून कमी केलं. मस्क म्हणतात त्याप्रमाणे, ट्वीटरला दरदिवशी 4 मिलियन यूएस डॉलरचा तोटा सहन करावा लागतोय. त्यामुळे कर्मचाऱ्यांना कमी करणं हा एकमेव पर्याय त्यांच्याकडे असल्याचं मस्क यांनी म्हटलंय.
 
पण मस्क म्हणतायत त्याप्रमाणे, ट्वीटरवर जो हार्मफुल कंटेंट असेल त्याबद्दल आमची भूमिका आधीसारखीच राहील. त्यात काही बदल होणार नाही.
 
यावर संयुक्त राष्ट्राचे मानवाधिकार आयुक्त वोल्कर टर्क शनिवारी मस्क यांना उद्देशून म्हणाले की, "ट्वीटरच्या व्यवस्थापनात मानवी हक्क केंद्रस्थानी असतील याची खात्री करावी."
 
ट्वीटरने जी कर्मचारी कपात केलीय त्यावर संयुक्त राष्ट्रांच्या मानवाधिकार समितीचं वक्तव्य आल्यानंतर संपूर्ण जगाचं या घटनेकडे लक्ष वेधलंय. त्यांनी पुढं असंही म्हटलंय की, मस्क यांनी ट्वीटर टेकओव्हर केल्यानंतर झालेली ही सुरुवात निराशाजनक आहे.
 
ट्वीटरने मात्र यावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.
 
व्हेरीफिकेशन पॉलिसीमध्ये जे बदल होणार आहेत त्यातले काही बदल प्रसिद्ध करण्यात आलेत.
 
ट्वीटरच्या अपडेटमध्ये म्हटलंय की, सुरुवातीच्या टप्प्यात ब्रिटन, अमेरिका, कॅनडा, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड आदी देशांमध्ये ही पॉलिसी लागू होईल.
 
या देशांमध्ये ही पॉलिसी कोणत्या पद्धतीने काम करते हे बघूनच मग जगभरातल्या इतर देशांमध्ये ती लागू करण्याचा निर्णय घेतला जाईल असं ट्वीटरच्या अपडेट मध्ये म्हटलंय.
 
ज्या युजर्सच्या प्रोफाइलवर आधीपासूनच ब्लू टिक होती त्यांचं पुढं काय करणार की त्यांना सुद्धा सबस्क्रिप्शन चार्ज करून ब्लू टिक ठेवणार याबाबत अद्याप कोणतीही माहिती मिळालेली नाही.
 
'सध्या ज्या प्रोफाइल्सना ब्लू टिक मिळलेले आहेत त्यांचं पुढं काय करणार' असा प्रश्न एका युजरने विचारल्यावर मस्क यांनी उत्तर देताना म्हटलंय की, "हे बदल करण्यासाठी दोन महिन्यांची टाईमलाईन आहे."
 
तसेच तोतया प्रोफाईल्सविषयी प्रश्न विचारल्यावर मस्क उत्तरात म्हणतात की, "आम्ही त्यांचं अकाऊंट सस्पेंड करू आणि सबस्क्रिप्शनसाठी मिळालेले पैसे पण ठेऊ."
 
सोबतच ट्वीटरमधील नव्या बदलाबाबत बोलताना मस्क म्हणाले की, "नोटपॅड स्क्रीनशॉट्सचा मूर्खपणा लवकरच बंद करून ट्विटरवरही जास्त शब्द लिहिता येतील."
 
कर्मचारी कपात केल्यानंतर ट्वीटरचे सह-संस्थापक आणि माजी सीईओ जॅक डोर्सी यांनी आपल्या बडतर्फ कर्मचाऱ्यांबाबत दिलगिरी व्यक्त केली.
 
जॅक डोर्सी यांनी नोव्हेंबरमध्ये सीईओ पदाचा राजीनामा दिला. नंतर मे महिन्यात ते संचालक मंडळातून बाहेर पडले. ते म्हणाले की, माझ्या अशा कृतीमुळे ट्वीटरचे कर्मचारी माझ्यावर रागावलेत, आणि याबद्दल मला माहिती आहे.
 
डोर्सी म्हणाले की, आज प्रत्येकावर जी परिस्थिती ओढावलीय त्याला मी जबाबदार आहे. मी कंपनी वाढीसाठी जो निर्णय घेतला त्यामुळे ही परिस्थिती ओढावली. त्याबद्दल मी सर्वांची माफी मागतो.
 
कर्मचारी कपात करण्याची गरज असल्याचंही डोर्सी यांनी म्हटलंय. यावर्षाच्या सुरुवातीला मस्क यांनी ट्वीटर टेकओव्हर करावं म्हणून त्यांनी मस्कला पाठिंबा दिला होता.
 
सध्या ट्वीटरमध्ये बरीच उलथापालथ सुरू आहे, त्यामुळे अनेक मोठ्या ब्रॅण्डने ट्वीटरला जाहिराती देणं थांबवलंय.
 
पण शनिवारी ट्वीटरचं जे अपडेट आलंय त्यात म्हटल्याप्रमाणे, "जाहिरातींमध्ये कपात" असं म्हटलंय. म्हणजे ट्वीटर जाहिरातींवरील त्यांचं अवलंबित्व कमी करण्याच्या विचारात आहे.
 
 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Ice for Weight Loss वजन कमी करण्यासाठी आइस हॅक, जाणून घ्या काय आहे हा प्रकार

Nyctophobia म्हणजे काय, तुम्हाला त्याची लक्षणे आहेत का?

29 मार्च रोजी 6 अशुभ योग, 5 राशींच्या लोकांना सावधगिरी बाळगावी लागेल, 5 उपाय करावे लागतील

नटराजाष्टकम् Nataraja Ashtakam

Saint Balumama Information सद्गुरू संत श्री बाळूमामा

सर्व पहा

नवीन

परभणी : कुलरमध्ये करंट उतरल्याने दोन महिलांचा वेदनादायक मृत्यू

LIVE: भाजप प्रवक्ते अजय पाठक यांना सीरियातून धमकीचा फोन आला

बँक सर्व्हर डाउन, UPI पेमेंटमध्ये विलंब होत असल्याने ग्राहक त्रस्त

भरधाव डंपरची कारला धडक, एका जोडप्यासह ३ जणांचा मृत्यू

कोण आहे अण्णा बनसोडे? जे महाराष्ट्र विधानसभेचे उपाध्यक्ष झाले

पुढील लेख
Show comments