Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

ट्विटरला सावरण्यासाठी इलॉन मस्क यांचा ‘श्रीरामा'चा धावा

Webdunia
मंगळवार, 1 नोव्हेंबर 2022 (21:34 IST)
इलॉन मस्क यांनी ट्विटर खरेदी करताच कंपनीत अनेक बदल सुरू केले आहेत. सीईओ पदावरून त्यांनी भारतीय वंशाच्या पराग अगरवाल यांना हटवलं पण आता कंपनी सावण्यासाठी त्यांना आणखी एका भारतीय वंशाच्या माणसाची मदत घ्यावी लागत आहे. या भारतीय वंशाच्या व्यक्तीचं नाव आहे श्रीराम कृष्णन.
 
ट्विटरमध्ये अपेक्षित सुधारणा करण्यासाठी इलॉन यांनी एक कोअर टीम स्थापन केली आहे. त्यात त्यांनी श्रीराम कृष्णन यांचा समावेश केला आहे. श्रीराम कृष्णन यांनी स्वतः ट्विटरवर याबाबत माहिती देत ते इलॉन मस्क यांना मदत करत असल्याचं सांगितलं आहे.
 
श्रीराम कृष्णन यांनी काय सांगितलं?
पेशानं इंजिनिअर असलेले श्रीराम ट्विटरमधील सुधारणांसाठी इलॉन मस्क यांना तात्पुरती मदत करत आहेत.
 
ते ट्विटरवर लिहितात, "आता चर्चा सुरूच झाली आहे तर काही चांगल्या लोकांबरोबर मी इलॉन मस्क यांना ट्विटरसाठी मदत करत आहे. ही एक महत्त्वाची कंपनी आहे, असं मी मानतो. जिचा लोकांवर चांगला प्रभाव पडू शकतो आणि इलॉन मस्क ते प्रत्यक्षात आणू शकतात."
दरम्यान, त्यांनी हे स्पष्ट केलंय की त्यांचं मुख्य काम a16z बरोबरच सुरु आहे. a16z एक इन्व्हेस्टमेंट कंपनी आहे.
 
ही कंपनी मुख्यत्वे स्टार्टअप्स, मोठ्या आणि प्रसिद्ध कंपन्या तसंच क्रिप्टोमध्ये गुंतवणूक करण्याचं काम करते.
 
टाईम्स ऑफ इंडियाच्या बातमीनुसार, इंजिनिअर असलेल्या श्रीराम यांना चांगल्या स्टार्टअप्समध्ये गुंतवणूक करणारे म्हणून ओळखलं जातं. आतापर्यंत त्यांनी वेगवेगळ्या 23 ठिकाणी गुंतवणूक केली आहे.
4 ऑक्टोबरलाच त्यांनी सीड राउंड-लॅसो लॅब्समध्ये गुंतवणूक केली आहे.
 
श्रीराम यांनी त्यांच्या करिअरची सुरुवात मायक्रोसॉफ्टमधून केली आहे.
 
महत्त्वाचं म्हणजे त्यांनी याआधी ट्विटरमध्येसुद्धा काम केलं आहे. त्यासोबतच त्यांनी बित्स्की, हॉपिन आणि पॉलीवर्क सारख्या कंपन्यांचे बोर्ड ऑफ डायरेक्टर म्हणून काम केलं आहे.
सध्या ते ऐंद्रीसेन होरोवित्ज नावाच्या व्हेंचर कॅपिटल फर्ममध्ये पार्टनर आहेत. या कंपनीला a16z नावानं ओळखलं जातं.
 
चेन्नईच्या अण्णा विद्यापीठाच्या एसआरएम कॉलेजमधून त्यांनी 2001 ते 2005 दरम्यान श्रीराम यांनी इंजिनिअरिंगचं शिक्षण पूर्ण केलं आहे. तर 2017 ते 2019 दरम्यान त्यांनी ट्विटरमध्ये काम केलं आहे.
 
या दरम्यान त्यांनी कोअर कंज्युमर प्रोडक्ट टीममध्ये काम केलं होतं. तेव्हा ट्विटरनं 20 टक्क्यांची वाढ नोंदवली होती.
 
होम टाईमलाइन, यूजर एक्सपिरिन्स, सर्च, डिस्कवरी आणि ऑडियन्स ग्रोथसारख्या विषयांवरसुद्धा श्रीराम यांनी ट्विटरमध्ये काम केलं आहे.
 
श्रीराम यांच्या लिंक्डिन बायोनुसार त्यांनी मेटा आणि स्नॅपसाठीसुद्धा काम केलं आहे.
 
टेक आणि गुंतवणुकीच्या विषयावर ते त्यांची पत्नी आरती राममूर्ती यांच्या सोबतीनं एक पॉडकास्ट शोसुद्धा चालवतात.
श्रीराम यांनी 2013 ते 2016 दरम्यान मेटा म्हणजेच फेसबुकसाठीसुद्धा काम केलं आहे. या दरम्यान त्यांनी प्रोडक्ट आणि बिझनेस स्ट्रॅटेजीसह अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्यांवर काम केलं आहे.
 
2006 ते 2011 या काळात त्यांनी मायक्रोसॉफ्टसाठी काम केलं आहे. आतापर्यंत सर्वांत जास्त काळ त्यांनी मायक्रोसॉफ्टसाठीच काम केलं आहे.
 
टेक आणि क्रिप्टोमध्ये त्यांना गती आहे. तसेच त्यांना कथाकथनाचीसुद्धा आवड आहे.
 
त्यांचा चेन्नईतल्या मध्यमवर्गीय कुटुंबात जन्म झाला आहे.
 
त्यांचे वडील विमा एजंट होते. आई गृहिणी होती. श्रीराम त्यांची पत्नी आरती यांना याहू मेसेंजरवर भेटले होते. त्यानंतर गेली 20 वर्षं ते दोघे एकत्र आहेत.
 
वयाच्या 21 व्या वर्षी मायक्रोसॉफ्टमध्ये काम करण्यासाठी श्रीराम अमेरिकेतल्या सिएटलमध्ये गेले होते.
 
इलॉन मस्क स्वतः सीईओ
तिकडे इलॉन मस्क यांनी स्वतःला ट्विटरचा सीईओ आणि डायरेक्टर म्हणून घोषित केलं आहे.
 
कंपनीनं सरकारी नियंत्रकांना त्याची माहिती दिली आहे. सध्या कंपनीमध्ये ते एकटेच डायरेक्टर आहेत.
इलॉन मस्क सध्या ट्विटरमध्ये बदलाव आणण्यासाठी प्रयत्नशील आहेत.
 
सध्या ट्विटरने न्यूयॉर्क स्टॉक एक्सचेंजमधून त्यांच्या डिलिस्टिंगची प्रक्रिया सुरू केली आहे.
 
ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर ट्विटरचं रुपांतर एका प्रायव्हेट लिमिटेड कंपनीत होईल. तसंच कंपनीचं स्टॉक एक्सचेंजमधलं अस्तित्व संपुष्टात येईल.
 
परिणामी ट्विटरच्या आर्थिक धोरणांची आणि परिस्थितीची माहिती दर तीन महिन्यांनी प्रकाशित करण्याचं बंधन इलॉन मस्क यांच्यावर राहणार नाही.
 
Published By- Priya Dixit 
 
 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

रात्रंदिवसा देवा तुमची मूर्ती ध्यानात

ही एक पिशवी घराच्या मुख्य दारावर लावा, पैशाशी संबंधित समस्या दूर होतील

पेल्विक हेल्थचा मुलाच्या आरोग्यावर काय परिणाम होतो,निरोगी कसे ठेवायचे ते जाणून घ्या

Relationship : परस्पर समंजसपणाने नाते जपा

अकबर-बिरबलची कहाणी : लाटा मोजणे

सर्व पहा

नवीन

पुण्यात मालकाला गुंगीचे औषध देऊन चोरी करणाऱ्या नोकरासह तिघांना अटक

राजगुरुनगर मध्ये ड्रममध्ये सापडले 8 आणि 9 वर्षांच्या बहिणींचे मृतदेह, कुकची क्रूरता उघडकीस

जपान एअरलाइन्सवर मोठा सायबर हल्ला

भाजप आमदाराचे मामा अपहरण आणि हत्या प्रकरण : पत्नीनेच सतीश वाघ यांच्या हत्येची दिली होती सुपारी

LIVE: मोहन भागवत म्हणाले ब्रिटिशांनी भारताचा इतिहास विकृत केला

पुढील लेख
Show comments