Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

कोरोनानंतर अमेरिकेतील टेक्सासमध्ये आता मंकीपॉक्सचा रुग्ण आढळला

Webdunia
शनिवार, 17 जुलै 2021 (18:31 IST)
कोरोनाचे संकट संपूर्ण जगावर असताना आता अमेरिकेतील टेक्सासमध्ये ‘मंकीपॉक्स’ व्हायरसचा रुग्ण आढळल्याने खळबळ उडाली आहे. अमेरिकेत यापूर्वी २००३ साली मंकीपॉक्सचे रुग्ण आढळून आले होते. अमेरिकेतील रोग नियंत्रक आणि प्रतिबंधक संस्थेने ही माहिती दिली आहे. डल्लासमधील रुग्णालयात मंकीपॉक्सबाधित व्यक्तीला दाखल करण्यात आले असून त्याला आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आले आहे. रुग्णांने नायजेरियातून अमेरिकेत प्रवास केला होता. या रुग्णांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींना मंकीपॉक्सचा संक्रमण होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
 
यूकेमध्ये मंकिपॉक्सच्या उद्रेकामुळे दहशत
पब्लिक हेल्थ वेल्सने एका निवेदनात म्हटले आहे की, "बाहेरून आलेल्या मंकिपॉक्सच्या दोन आजारांची पुष्टी झाली आहे आणि पब्लिक हेल्थ इंग्लंड आणि पब्लिक हेल्थ वेल्स नॉर्थ वेल्समध्ये उघडकीस आलेल्या दोन्ही केसेसचे परीक्षण सुरू आहे." यूकेमध्ये मंकिपॉक्सची केवळ थोड्या प्रमाणात प्रकरणे आढळली आहेत, एनएचएस वेबसाइटनुसार, बहुतेक प्रकरणे आफ्रिकेत आढळून आली आहेत आणि ब्रिटनच्या मंकिपॉक्सच्या संसर्गाचा धोका खूपच कमी आहे. हा सामान्यत: एक सौम्य आजार आहे जो उपचार न करताच आपोआप बरा होतो. काही लोकांना अधिक गंभीर लक्षणे दिसू शकतात.
 
दरम्यान मंकीपॉक्स हा साथीचा आजार असून मंकीपॉक्सच आजाराचे पहिले प्रकरण १९७० साली पहिल्यांदा समोर आले होते. याबाबतची माहिती जागतिक आरोग्य संघटनेने दिली आहे. या आजाराचे रुग्ण आफ्रिकेतील ११ देशात आढळून आले होते. त्यानंतर २००३ साली पहिल्यांदा आफ्रिकेबाहेर अमेरिकेत मंकीपॉक्सचा रुग्ण आढळला होता. त्यानंतर १८ वर्षांनी मंकीपॉक्सचा रुग्ण आढळून आला आहे. २००३ साली घानावरून मागवण्यात आलेल्या पाळीव कुत्र्यामुळे अमेरिकेत संसर्ग पसरला होता. आतापर्यंत आशिया खंडात मंकीपॉक्सचा एकही रुग्ण आढळलेला नाही.
 
मंकीपॉक्सची लक्षणे कोणती?
याचे संक्रमण मंकीपॉक्स झालेल्या प्राण्याच्या संपर्कात आल्यामुळे होते. पण याबाबत अजूनही वैज्ञानिकांना स्पष्ट माहिती नाही. ६ ते १३ दिवसात मंकीपॉक्सची लागण होते. काही लोकांना ५ ते २१ दिवसातही संसर्ग होण्याची शक्यता आहे. लागण झालेल्या व्यक्तीला ताप, डोकेदुखी, पाठ आणि मांसपेशींमध्ये दुखापत होते. त्याचबरोबर थकवा जाणवतो. त्याचबरोबर आजारी व्यक्तीच्या चेहरा आणि अंगावर मोठे फोड येतात. काही रुग्णांच्या डोळ्यावरही प्रभाव जाणवतो. मंकीपॉक्समुळे मृत्यूचे प्रमाण ११ टक्क्यांपर्यंत असू शकते. तर लहान मुलांना सर्वाधिक मृत्यूचा धोका आहे.
 
आतापर्यंत कोणतेही उपचार मंकीपॉक्सवर उपलब्ध नसल्याची माहिती जागतिक आरोग्य संघटनेने दिली आहे. लसीमुळे मंकीपॉक्स आटोक्यात येत असल्याचे दिसून आले आहे. यावर अजूनही संशोधन सुरु आहे. या आजारावर नियंत्रण मिळवण्यासाठी लोकांमध्ये जागरुकता असणे महत्त्वाचे आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Bhishma Panchak 2024 : आजपासून भीष्म पंचक व्रत, जाणून घ्या पूजा पद्धत आणि महत्त्व

Sun Transit 2024: सूर्याचे वृश्चिक राशीत संक्रमण, 3 राशीच्या लोकांना सतर्क राहावे लागेल

Guru Nanak Jayanti 2024: गुरु नानक जयंती कधी ? प्रकाश पर्व कसे साजरे करायचे जाणून घ्या

पतीच्या घोरण्यामुळे झोप मोड होतेय ? कारणे आणि घोरणे थांबवण्यासाठी 5 घरगुती उपाय

डोकेदुखीपासून मुक्त होण्यासाठी या सोप्या घरगुती उपायांचा अवलंब करा

सर्व पहा

नवीन

मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्रीचा आज महाराष्ट्र दौरा

सुरक्षा दलांवर हल्ला करण्याचा कट रचणाऱ्या 8 नक्षलवाद्यांना अटक

धक्कादायक : पती-पत्नीची हत्या करून घरातच जाळले मृतदेह

शरद पवार यांच्या पत्नीला टेक्सटाईल पार्कच्या आवारात जाण्यापासून रोखले, अर्धा तास तिथेच उभ्या होत्या

Water Taxis मुंबईत वॉटर टॅक्सी सुरू होणार, 17 मिनिटांत नवी मुंबई विमानतळावर पोहोचणार

पुढील लेख