Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

अफगाणिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष अशरफ घनी यांना UAEने दिला राजाश्रय

Webdunia
बुधवार, 18 ऑगस्ट 2021 (22:32 IST)
संयुक्त अरब अमिरातीने म्हणजेच UAEने अफगाणिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष अशरफ घनी यांना राजाश्रय दिला आहे.
 
संयुक्त अरब अमिरातीने एक निवेदन जारी केलं आहे. मानवतेच्या दृष्टिकोनातून आधार म्हणून राष्ट्राध्यक्ष घनी आणि त्यांच्या परिवाराचं स्वागत आहे, असं त्यात लिहिलं आहे.
 
तालिबानने अफगाणिस्तानवर ताबा मिळवताच घनी देश सोडून गेले होते. अमेरिकेने घनी यांच्यावर सडकून टीका केली होती. अफगाणिस्तानने योग्य पावलं उचलली असती तर ही वेळ आली नसती असं अमेरिकेचं म्हणणं होतं.
 
घनी जेव्हा देश सोडून गेले तेव्हा ते 16.9 कोटी डॉलर्स घेऊन गेल्याचा दावा ताजिकिस्तानमधील अफगाण राजदुत मोहम्मद जहीर अगबर यांनी केला आहे.
 
आधी आलेल्या बातम्यानुसार अशरफ घनी तजाकिस्तानला गेले असं सांगण्यात येत होतं. तर अल झझिरा या वृत्तवाहिनीने सांगितलं की ते, त्यांची पत्नी आणि लष्करप्रमुख ताशकंदला गेले आहेत.
 
घनी फेसबुक पोस्टमध्ये काय म्हणाले होते?
अशरफ घनी देश सोडून गेल्यावर त्यांनी फेसबुकवर एक पोस्ट लिहिली होती. त्या पोस्टमध्ये त्यांनी देश सोडून जाण्याबद्दल स्पष्टीकरण दिलं होतं.
 
"राजधानी काबुल सोडण्याचा निर्णय कठीण होता. मात्र, रक्तपात रोखण्यासाठी हा निर्णय घ्यावा लागला," असं अशरफ घनी यांनी फेसबुक पोस्टमध्ये म्हटलंय.
 
त्यांनी पुढे लिहिलंय की, "मी काबुलमध्ये थांबलो असतो तर झटापट झाली असती आणि त्यामुळे लाखो लोकांच्या जीवाला धोका निर्माण झाला असता."
 
"आज मला एक कठीण निर्णय घ्यायचा होता की, एकतर राष्ट्रपती भवनात प्रवेश करू इच्छिणाऱ्या सशस्त्र तालिबान्यांच्या समोर उभं राहावं किंवा ज्या देशाच्या सुरक्षेसाठी गेली 20 वर्षं आयुष्य घालवलं त्यांना सोडावं. जर यावेळी असंख्य लोक मारले गेले असते आणि काबुल शहराला उद्ध्वस्त होताना पाहावं लागलं असतं, तर 60 लाख लोकसंख्येच्या काबुल शहरात मोठं मानवी संकट उभं राहिलं असतं."
 
"तालिबाननं तलवार आणि बंदुकीच्या जोरावर विजय मिळवला आहे. आता देशातील लोकांचा जीवाची जबाबदारी तालिबानवर आहे," असं पुढे घनी म्हणतात.
 
"मात्र, ते लोकांची मनं जिंकू शकत नाहीत. इतिहासात कुणालाही ताकदीच्या जोरावर हा हक्का मिळाला नाही आणि मिळणारही नाही. आता त्यांना एका ऐतिहासिक परीक्षेला तोंड द्यावं लागेल. एकतर ते अफगाणिस्तानचं नाव आणि स्वाभिमान वाचवतील किंवा इतर क्षेत्र आणि नेटवर्क," असंही घनी म्हणाले होते.
 
अशरफ घनी कोण आहेत?
अशरफ घनी यांची 2014 आणि 2019 मध्ये अफगाणिस्तानच्या राष्ट्राध्यक्षपदी नियुक्ती झाली होती. ते एक कुशल तंत्रज्ञ म्हणून ओळखले जातात. ते शिक्षणतज्ज्ञ म्हणून ओळखले जातात. त्यांनी आपली बहुतांश करिअर अफगाणिस्तानमध्येच पूर्ण केलं होतं. देशात झालेल्या युद्धानंतर ते अफगाणिस्तानाच्या पुननिर्माणासाठी परतले होते.
 
जेव्हा त्यांना राष्ट्राध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारला तेव्हा ते अत्यंत प्रामाणिक व्यक्ती म्हणून ओळखले जात असत. मात्र ते प्रचंड रागीट असल्याचंही सांगण्यात येतं.
 
जेव्हा 2014 मध्ये कार्यभार सांभाळला तेव्हा बहुतांश सैनिक देश सोडून गेले होते. त्यांनी तालिबानबरोबर कायम शांततेसाठी प्रयत्न केले. घनी कायम अमेरिकेच्या हातचं बाहुलं होते अशी टीका तालिबान त्यांच्यावर करायचे.

संबंधित माहिती

सात्विक-चिराग जोडी विजेती ठरली, लिऊ आणि चेन यांना पराभूत केले

SRH vs PBKS : हैदराबादने पंजाबचा चार गडी राखून पराभव केला

इराणचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रायसी यांचे हेलिकॉप्टर कोसळले

पंढरपूरच्या विठुमाऊलीचे पदस्पर्श दर्शन येत्या 2 जूनपासून सुरु

Lok Sabha Elections 2024: पंतप्रधान मोदींनी पुरुलियामध्ये इंडिया आघाडीवर टीका केली, म्हणाले

आग्रा येथील तीन बूट व्यावसायिकांवर आयकर विभागाचा छापा,नोटा मोजताना मशीन थकली

आम आदमी पार्टीला चिरडण्याचा प्रयत्न करत आहे म्हणत केजरीवालांचा भाजपवर हल्लाबोल

गुरु -शिष्याच्या नात्याला तडा, कुस्तीकोच ने केला अल्पवयीन विद्यार्थिनीचा विनयभंग

Thane : एक केळी जास्त घेतल्याने फळ विक्रेताची ग्राहकाला लोखंडी रॉडने मारहाण

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी; मान्सून वेळेपूर्वी अंदमानात दाखल होणार!

पुढील लेख
Show comments