Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

सलूनमध्ये हेअर कट करणे महागात पडले, हेअर ड्रायरचा स्फोट, दोघे जखमी

Webdunia
रविवार, 11 सप्टेंबर 2022 (16:51 IST)
अनेकदा असे काही व्हिडिओ सोशल मीडियावर येतात जे आश्चर्यचकित करणारे असतात.असाच एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.हा व्हिडिओ एका सलूनचा आहे.यामध्ये एक व्यक्ती खुर्चीवर बसलेली आहे.यानंतर न्हावी हेअर ड्रेसर घेऊन येतो आणि तो केसांवर वापरू लागतो.अचानक मोठ्या आवाजाने हेअर ड्रायरला स्फोट होऊन आग लागते.हे पाहून न्हावी  हेअर ड्रायर सोडून पळून गेला आणि बघता बघता संपूर्ण दुकानात आग आणि धुराचे लोट पसरले. 
 
ही घटना बांगलादेशमध्ये घडली होती.मात्र त्याचा व्हिडिओ गेल्या दोन दिवसांपासून सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.वोसा टीव्हीच्या ट्विटर हँडलवर उपलब्ध माहितीनुसार, ही घटना कच्छापूरच्या नारायणगंज भागातील आहे.यानुसार या अपघातात ग्राहक आणि न्हावी दोघेही गंभीर जखमी झाले आहेत. 
 
 
ही घटना जरी जुनी असली तरी हेअर ड्रायर वापरणाऱ्यांसाठी हा धडा ठरू शकतो.हेअर ड्रायरला आग कशी लागली हे स्पष्ट झालेले नाही.एसी गॅस लिक झाल्यामुळे आग लागल्याचे काही लोकांचे म्हणणे आहे .तर ,काही लोकांचे म्हणणे आहे की, न्हाव्याने ग्राहकाच्या डोक्यावर लावलेल्या सोल्युशनमुळे हेअर ड्रायरला आग लागली.

संबंधित माहिती

हैदराबाद विरुद्ध लखनौ सामना हा आयपीएल प्लेऑफ क्वालिफायरसारखा असेल

धाराशिवमध्ये मतदान केंद्राजवळ चाकूने हल्ला करून एकाची हत्या

रुपाली चाकणकर यांच्या विरोधात पुण्यात गुन्हा दाखल

कोल्हापूर मतदान केंद्रावर वृद्धाचा हृदय विकाराच्या धक्क्याने मृत्यू

भारतीय महिलां आणि पुरुष संघ 4x400 मीटर रिले संघ पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र ठरला

Israel Hamas War : हमास ने शांतता करार प्रस्तावाला स्वीकार केलं, इस्त्रायलने अशी दिली प्रतिक्रिया

लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात राज्यात 5 वाजे पर्यंत सरासरी 53.40 टक्के मतदान झालं

अरविंद केजरीवाल यांच्या न्यायालयीन कोठडीत 20 मे पर्यंत वाढ, सर्वोच्च न्यायालयाकडून कोणताही दिलासा नाही

विजय वडेट्टीवार यांच्या विवादास्पद वक्तव्याची चौकशी होणार! फडणवीसांचा इशारा

सुप्रिया सुळे अजित पवारांच्या घरी गेल्यावर फडणवीस यांची प्रतिक्रिया

पुढील लेख
Show comments