Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

इथं सतत कोणीतरी रडतंय, तर कोणी गातंय; गिनीज वर्ल्ड रेकॉर्डच्या हव्यासानं या देशाला कसं पछाडलंय? वाचा

Webdunia
मंगळवार, 18 जुलै 2023 (07:33 IST)
social media
जोपर्यंत हा लेख तुम्ही वाचून पूर्ण कराल, तोपर्यंत आणखी एक नायजेरियन नागरिकानं गिनीज वर्ल्ड रेकॉर्डच्या हव्यासानं जागतिक विक्रम प्रस्थापित करण्याचा आणखी एक प्रयत्न केला असल्यास नवलं वाटून घेऊ नका.
 
आफ्रिका खंडातील सर्वाधिक लोकसंख्येच्या या देशातील नागरिकांना वर्ल्ड रेकॉर्ड प्रस्थापित करण्याचं वेड लागलंय, असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही.
 
वेगवेगळे विक्रम प्रस्थापित करण्यासाठी नायजेरियामध्ये स्पर्धा सुरु आहे. एका नायजेरियन माणसानं 200 तास गाणं गायलं,एक माणूस रेकॉर्ड प्रस्थापित करण्यासाठी न थांबता रडत आहे. एका महिलेनं दावा केलाय की ती सर्वाधिक वेळ घरात राहिली होती. तर एका महिलेनं सार्वधिक स्नेल्स (गोगलगाय) तळण्याचा प्रयत्न केलाय.
 
अशा भन्नाट पाककृती घेऊन ही गिनीज रेकॉर्डनं आपली दखल घ्यावी, अशी 'क्रेझ' नायजेरियन नागरिकांमध्ये निर्माण झालीय.
 
200 दशलक्ष लोकसंख्येच्या देशानं प्रत्येक वर्ल्ड रेकॉर्ड मोडण्याचा जणू क्रेझ निर्माण झालंय. लेगॉसमध्ये एका छोट्या समूहानं मिळून मे महिन्यात चार दिवस पाऊस आणि अंधाराचं 'संकट झेललं' होतं. तर हिल्डा बसी या महिला शेफनं 100 तास 'कुकिंग'चा विक्रम प्रस्थापित केलाय.
 
गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये 93 तास 11 मिनिटं 'कूकिंग' केल्याचा वर्ल्ड रेकॉर्ड होता. हा रेकॉर्ड मोडीत काढत शेफ हिल्डानं गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नवा विक्रम प्रस्थपित केलाय.
 
असा एकही दिवस नाही कि वर्ल्ड रेकॉर्ड करण्यासाठी नायजेरियनं प्रयत्न करत नसतील. शेफ हिल्डा बसी यांच्या पाऊलावर पाऊल ठेवतं गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नवीन रेकॉर्ड प्रस्थापित करण्यासाठी नायजेरियात प्रयत्न सुरु असतो.
 
व्यक्तिगत प्रसिद्धीसाठी झपाटलेल्या नायजेरियच्या 'रेकॉर्ड ए थोन्स' ,'पफ्फ 'पफ्फ ए थोन'च्या क्रेझवर आता गिनीज वर्ल्ड रेकॉर्डनं विनोदी ट्विट करत नेटीझनना उत्तर दिलंय.
 
ट्विट करत 'आता रेकॉर्ड ए थॉन्स' बस्स करा',अशा शब्दात सुनावलं. नायजेरियातील वर्ल्ड रेकॉर्डसाठी 'नॉनस्टॉप मसाज' करण्याचा विक्रम करण्याच्या प्रयत्नात एक मालिश करताना कोसळली. त्यामुळं रेकॉर्ड प्रस्थपित करण्यासाठी प्रथम अर्ज करणे आवश्यक असल्याचं गिनीज वर्ल्ड रेकॉर्डनं (GWR) ट्विट करत म्हटलंय. तर गिनीजला अर्ज केला नसला तरी रेकॉर्डसाठी 50 तास पुरेसा असल्याचं ती महिला सांगते.
 
लोक GWR साठी अर्ज न करताच आपलं धाडस जगापुढं आणत आहेत, आणि आपल्या प्रयत्नांची घोषणा करताहेत. कुकिंग करताना दोन शेफनी स्टोव्ह बंद केला आणि झोपायला गेले, त्यामुळं गिनीजसाठी अपात्र ठरवलं.
 
वर्ल्ड रेकॉर्ड आपल्या नावावर करण्यासाठी तुम्हाला गिनीजची मार्गदर्शक तत्व समजून घेतली पाहिजेत,असं GWRच्या प्रतिनिधींनी बीबीसीला सांगितलं.
 
विश्व विक्रमासाठी नायजेरियन लोकांचं अर्जाचं प्रमाण प्रमाण वाढतंय. मात्र एकाच देशातील लोकांच्या प्रयत्नांची संख्या हा रेकॉर्ड असू शकत नाही गिनीज वर्ल्ड रेकॉर्डचं म्हणणं आहे.
 
"नायजेरियन लोेक हे गंमतीशीर आहेत, समाजात एखादी क्रेझ असेल तर आम्ही त्याच लाटेवर स्वार होतो. ही आमची प्रवृत्तीच आहे. तीन महिन्यांपेक्षा कमी कालावधीत गिनीजचा क्रेझ कमी होईलं,"असं गिनीज रेकॉर्डसाठी दोनवेळा प्रयत्न करणारा फारोमेनि केमी बीबीसीला सांगतो.
 
पफ तळणारी नायजेरियन महिला दोन वेळा रेकॉर्ड साठी प्रयत्न करत होती. सप्टेंबर महिन्यात एका माध्यमिक शाळेतील शिक्षक जॉन ओबोट हा मोठ्यानं वाचत होता.त्याचा प्रयत्नांना ही दाद द्यावी लागेल. त्यानं गिनीज वर्ल्ड रेकॉर्डकडून प्रयत्नांसाठी मान्यता मिळवलीय.
 
किरगिजस्तानच्या रिसबाय इस्कोव्हनं तुर्कीमध्ये 124 तासांचा केलेला विक्रम मोडीत काढण्यासाठी जॉन ओबोट सराव करत आहेत.
 
दक्षिण नाजेरियातील उयो या शांत किनारपट्टीवरील शहरात 140 तास 'नॉन स्टॉप' मोठ्यानं वाचन करण्याचं ओबोट यांचं उद्दिष्ट्य आहे.
 
नायजेरियातील वाचन संस्कृतीला चालना देण्याचा आपला उद्देश असल्याचं ओबोट सांगतात. त्यातूनच मला प्रेरणा मिळाली असं ते सांगतात. माझ्या क्षमतेबाबद्दल कुणी शंका घेऊ नये. माझा उद्देश सार्थ करण्यासाठी हा विक्रम प्रस्थापित करण्याचा ध्यास मी घेतलाय."
 
त्याच सोबत दातांचा वापर करून नारळ खवण्याचा प्रयत्न ही करणार असल्याचं तो सांगतो.
 
'नॉनस्टॉप चुंबन' घेण्याच्या रेकॉर्डसाठी नाजेरियात प्रयत्न झाले, मात्र नायजेरियातील एकिटी राज्यात 'नॉनस्टॉप' चुंबन घेण्यावर बंदी घालण्यात आली होती.
 
नॉनस्टॉप चुंबन घेण्याच्या प्रयत्न झाल्यास त्याविरोधात कारवाईचा इशारा राज्यातील अधिकाऱ्यांनी दिला होता. त्यामुळेच नायजेरियासाठी नॉनस्टॉप चुंबन गिनीजने आपल्या श्रेणीतून काढून टाकलं.
 
'किस ए थॉन' हा कार्यक्रम अनैतिक,निरर्थक,आरोग्यास हानीकारक आणि 'एकिटी' राज्याची प्रतिमेला धक्का लावणार असल्याचं तिथल्या संस्कृती मंत्रालयान निवेदनात म्हटलंय.
 
एकिटी राज्याचं प्रशासन अलीकडच्या रेकॉर्डसच्या क्रेझ कडं लक्ष ठेऊन आहे.
 
शेफ हिल्डा बसीच्या किचनमधील वाफ वाढत होती, तरिही तिच्या सहकाऱ्यांनी विक्रम प्रस्थापित करण्यासाठी स्टोव्ह चालूच ठेवला होता. गिनीजनं तीच्या विक्रमाला अजून मान्यता देणं बाकी आहे.
 
सात दिवस न थांबता रडणारा टेम्बू एबेरो बीबीसीला सांगतो, त्याला गंभीर आरोग्य समस्यांना सामोरं जावं लागलं. त्याला डोकेदुखी आहे. चेहरा आणि डोळे सुजले होते. 45 मिनिटं त्याला नीट दिसत नव्हतं."
 
त्यानं GWR अधिकृत अर्ज केला नव्हता, त्यामुळं गिनीज वर्ल्ड रेकॉर्डनं त्याची दखल घेतलेली नाही. पण नायजेरियातील लोक त्याच्या प्रयत्नांची प्रशंसा करतात."
 
असं नाही की नायजेरियात रेकॉर्ड प्रस्थापित करणाऱ्यांची संख्या कमी आहे.
 
1) टोबी मुसान- महिलांची १०० मीटर अडथळा शर्यत विजयी
 
2) गबेंगा एझेकील - एका मिनिटांत एका पायावर सर्वाधिक दोरी उड्या मारणे
 
आणि काही वैयक्तिक विक्रम करणाऱ्यांमध्ये चिनोन्स इचे यानं एका मिनिटात डोक्याने सर्वाधिक वेळा फुटबॉलला स्पर्श करण्याचा विक्रम केलाय.
 
यात डोक्याला स्पर्श होताना फुटबॉल स्थिर ठेऊन स्पर्श होणं गरजेचं आहे. त्यानं आतापर्यंत 1000 वेळा सर्वाधिक जलद फुटबॉलला स्पर्श केलाय.
 
परंतु त्याच्यापैकी कोणीही हिल्डा बसी इतकी प्रसिद्धी मिळवली नाही. तिच्यामागे मोठी प्रसिद्धी यंत्रणा होती.
 
12 ब्रॅण्डिंग हाताळणाऱ्या पब्लिक रिलेशन कंपनीचे प्रमुख नेने बेजिद सांगतात,"आम्ही यासाठी खूप काम केलं आहे. तिनं रेकॉर्ड बनवल्याच्या दिवशीच तिला उपराष्ट्रपतींचा कॉल आला. लेगॉस राज्याच्या राज्यपालांनी तिची भेट घेतली . सेलिब्रिटी आणि हितचिंतकांकडून शुभेच्छांचा वर्षाव झाला होता. आम्ही केलेल्या ब्रॅण्डिंगमुळे हे शक्य झालं."
 
एका प्रयत्नात या शेफ महिलेला 'स्ट्रारडम' आणि प्रसिद्धी मिळाली. सोशल मीडियावर तिच्या फॉलोवर्सची संख्या झटपट वाढली. प्रसिद्धीसाठी डिजिटल माध्यम महत्वाची भूमिका पार पाडत. हिल्डा बसी यांना नायजेरियन एअरलाईन्सनं वर्षभरासाठी मोफत विमान प्रवास दिला. रोख रक्कम तसेच भेटवस्तू दिल्या.
 
"मला स्वतःला सिद्ध करण्याबरोबरच नायजेरियाच्या ही जगाच्या नकाशावर ओळख द्यायची होती, माझ्या विक्रमानं दोन्ही उद्देश साध्य झाले आहेत," असं शेफ हिल्डा बसी बीबीसीला सांगते.
 
Published By- Priya Dixit 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

अरविंद केजरीवाल यांच्या याचिकेवर उच्च न्यायालयात सुनावणी,17 जुलै रोजी सुनावणी

केरळमध्ये 'मेंदू खाणाऱ्या' अमिबा संसर्गामुळे मुलाचा मृत्यू

Brain Eating Amoeba ने घेतला 14 वर्षाच्या मुलाचा जीव, जाणून घ्या किती धोकादायक आहे

1 रुपयात पीक विमा योजनेसाठी अर्ज करताय? मग आधी या 5 गोष्टी लक्षात ठेवा

मुलींना लहान वयातच पाळी येणं धोकादायक का आहे? त्याची कारणं काय आहेत?

सर्व पहा

नवीन

महाराष्ट्राची अर्थव्यवस्था स्थिर, अर्थसंकल्पात दिलेल्या सवलती निवडणूक नौटंकी नाही; अजित पवारांचे स्पष्टीकरण

कांद्याच्या दरावर सरकार पकड घट्ट करणार, अनेक शहरांमध्ये कांद्याने 50 रुपयांचा टप्पा ओलांडला

Porsche car Accident Case : पोर्शे कार अपघात प्रकरणात मोठी अपडेट,अल्पवयीन आरोपीने रस्ता सुरक्षेवर 300 शब्दांचा निबंध लिहिला

बजाजची जगातील पहिली CNG बाईक लाँच, किंमत जाणून घ्या

NEET PG : NEET-PG परीक्षेची तारीख जाहीर,ऑगस्ट मध्ये या दिवशी होणार परीक्षा

पुढील लेख
Show comments