Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

मी काही महात्मा गांधी किंवा मंडेला नाही : सौदी अरेबियाचे राजपुत्र

Webdunia
मंगळवार, 20 मार्च 2018 (09:23 IST)

‘मी श्रीमंत असून मी काही महात्मा गांधी किंवा मंडेला नाही’, असे विधान सौदी अरेबियाचे राजपुत्र महंमद बिन सलमान  त्यांनी केले आहे. सध्या यांच्या श्रीमंतीची चर्चा जगभरात होत आहे. सलमान हे सध्या अमेरिका दौऱ्यावर असून त्यांनी अमेरिकेतील एका वृत्तवाहिनीला मुलाखत दिली आहे. यात त्यांनी राहणीमानावरील खर्चावर भाष्य केले आहे. 

ते म्हणाले, माझी संपत्ती हा माझा खासगी मुद्दा आहे. माझ्या वैयक्तिक खर्चावर बोलायचे झाल्यास मी एक श्रीमंत माणूस आहे. मी गरीब नाही. मी गांधी किंवा मंडेला नाही, असे त्यांनी सांगितले. मी माझ्या उत्पन्नातील ठराविक हिस्सा सामाजिक कामांसाठी दान करतो. माझ्या उत्पन्नातील ५१ टक्के रक्कम जनतेवर तर ४९ टक्के रक्कम स्वतःसाठी खर्च करतो, असेही त्यांनी सांगितले. सौदी अरेबियात महंमद सलमान यांनी गेल्या काही महिन्यांमध्ये घराण्यातील काही मंडळींना भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली तुरुंगात धाडले. या कारवाईचेही त्यांनी समर्थन केले आहे. आम्ही सौदी अरेबियात जे केले, ते अत्यंत महत्त्वाचे होते, असेही त्यांनी सांगितले.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

कथा बायजाबाईंची

Death Line on Hand: हाताच्या रेषांवरून मृत्यू कधी आणि कसा होईल हे जाणून घ्या, हस्तरेषाशास्त्र काय म्हणते ते जाणून घ्या

ऊँ म्हणा आणि ही वस्तू तुमच्या पर्समध्ये ठेवा, तुमचे घर पैशांनी भरून जाईल

लॉन्ग डिस्टेंस रिलेशनशिपला मजेदार बनवण्यासाठी हे 5 टिप्स अवलंबवा

सकाळी रिकाम्या पोटी कडुलिंबाची पाने खाल्ल्याने होतात हे 5 आश्चर्यकारक आरोग्य फायदे

सर्व पहा

नवीन

काँग्रेसने केंद्र सरकारवर निशाणा साधला, म्हणाले- संसदीय समित्या केवळ दिखावा बनल्या आहे

LIVE: महाराष्ट्रात एटीएस पथके बेकायदेशीर बांगलादेशींविरुद्ध छापे टाकत आहे

गुलियन-बॅरे सिंड्रोम देशभर पसरला आहे! महाराष्ट्रानंतर आता या राज्यात एका 17 वर्षीय मुलाचा मृत्यू

ठाण्यात एटीएसची कारवाई, 4 बेकायदेशीर बांगलादेशी महिलांना अटक

अमेरिकेत भीषण अपघात : हेलिकॉप्टरमध्ये असलेल्या सैनिकांसह 67 जणांचा मृत्यू

पुढील लेख
Show comments