हिमालयातील खुमबू नावाची हिमशिखरे आहेत. प्रचंड उष्म्यामुळे होत असलेले उत्सर्जन असेच कायम राहिले तर जगातील 46 वारस्यांपैकी 21 वारसे नष्ट होणार असल्याची भीती संशोधकांनी व्यक्त केली आहे. प्रचंड उष्म्यामुळे होणारे उत्सर्जन कमी झाले तरीही किमान 8 जागतिक वारसे तर नक्कीच नष्ट होतील. या 8 वारस्यांवर बर्फ नावालाही उरणार नाही, असेही संशोधकांच्या या टीमने अहवालात म्हटले आहे.
अर्जेटिनामधील ‘लॉस ग्रेशियर्स नॅशनल पार्क’मधील बर्फ आताच 60 टक्के वितळला आहे. 2100 पर्यंत हे हिमशिखर नाहीसे होणार आहे. अशीच गत उत्तर अमेरिका, कॅनडा येथील हिमशिखरांचीही होणार आहे, असे अहवालात नमूद करण्यात आले आहे. ‘इंटरनॅशनल युनियन फॉर कन्झर्वेशन ऑफ नेचर’ या संस्थेच्या संशोधकांनी जगातल्या हिमशिखरांचा अभ्यास प्रथमच केला आहे. त्यांनी जमवलेल्या आकडेवारीतून या हिमशिखरे 2100 पर्यंत वितळून जाण्याची शक्यता नाकारता येत नाही, असा निष्कर्ष त्यांनी काढला आहे. संशोधकांनी सादर केलेला हा अहवाल ‘अर्थ फ्युचर’ या जर्नलमध्ये छापून आला आहे.