Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

आयसिसचा अबू अल बगदादी जिवंत, व्हिडिओ जारी

आयसिसचा अबू अल बगदादी जिवंत, व्हिडिओ जारी
, मंगळवार, 30 एप्रिल 2019 (12:00 IST)
कुख्यात दहशतवादी संघटना असलेल्या इसिसचा म्होरक्या अबू बक्र अल बगदादी जिवंत असल्याचे कळून आले आहे. तब्बल 5 वर्षांनंतर बगदादीचा नवा व्हिडीओ जारी केला गेला आहे. समोर आला आहे. या व्हिडीओत तो जिहादवर बोलताना दिसत आहे. 
 
त्याच्या समोर तीन माणसं बसली आहेत, त्यांचा चेहरा झाकलेला आहे. व्हिडिओत बगदादी काळ्या रंगाच्या पोशाखात दिसत असून त्याच्या मागे शस्त्र देखील दिसत आहे. बगदादीचा हा व्हिडिओ १८ मिनिटांचा असून तो अरबी भाषेत बोलत आहे. यात तो बागूजमधील युद्ध संपले आहे असे बोलताना दिसत आहे. व्हिडिओ नेमका कधीचा आहे हे स्पष्ट नाही तरी सीरियातील बागूज येथे आयसिस आणि सैन्यात सुरु असलेले युद्ध गेल्या महिन्यात संपले होते. 
 
या व्हिडिओनंतर बगदादीने ऑडियो क्लिपही जारी केली. यात त्याने श्रीलंकेतील बॉम्बस्फोटांवर भाष्य केले आहे.  “बागूजमधील रक्तरंजित संघर्षाचा बदला श्रीलंकेतील तुमच्या बांधवानी घेतला आहे”, असे त्याने यात म्हटले आहे. यापूर्वी बगदादी मोसूलमधील एका मशिदीत भाषण करतानाचा व्हिडिओ २०१४ मध्ये जारी करण्यात आला होता. 
 
गेल्या वर्षी आणि या पूर्वी 2015 मध्ये देखील बगदादीचा हवाई हल्ल्यात मृत्यू झाल्याचे वृत्त प्रकाशित झाले होते. पण आता या नव्या व्हिडिओमुळे तो जिवंत असल्याचा अनुमान लावला जात आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

जिवंत आहे बगदादी, 5 वर्षांमध्ये पहिल्यांदा दिसला व्हिडिओमध्ये