जगभरात मागील 6-7 महिन्यांत कोरोना व्हायरसने अनेक स्तरांवर नुकसान केले आहे. सध्या कोविड 19 सोबत जगायला शिकणार्याग जगाला पुन्हा मोकळा श्वास घेता यावा याकरिता संशोधक, वैज्ञानिक लस, औषधं उपलबध करून देण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करत आहेत. मात्र ही लस बाजारात उपलब्ध करण्यापूर्वी ती सुरक्षित असावी यासाठी प्रयत्न सुरू आहेत. अमेरिकेतील Johnson & Johnson कंपनीच्या कोरोना व्हायरस वरील संभाव्य लसीचे सुरूवातीच्या चाचणींचे परिणाम सकारात्मक मिळाले असले तरीही आता काही स्वयंसेवकांना त्रास होत असल्याने लसीच्या चाचण्या थांबावण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. या लसीचे प्रतिकूल परिणाम रूग्णांवर आढळले असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.