Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

अमेरिकन पत्रकाराचं अपहरण, मारतानाचा 3 मिनिटांचा व्हीडिओ आणि तुकडे केलेला मृतदेह

Webdunia
गुरूवार, 7 सप्टेंबर 2023 (18:57 IST)
रेहान फझल
Twitter
38 वर्षांचे अमेरिकन पत्रकार डॅनियल पर्ल हे प्रसिद्ध वृत्तपत्र वॉल स्ट्रीट जर्नलचे दक्षिण आशियाचे ब्युरो चीफ होते.
 
त्यांचं ऑफिस खरंतर मुंबईत होतं. मात्र,ते शू बॉम्बरच्या एका बातमीसाठी कराचीला गेले होते. त्यांच्यासोबत त्यांच्या पत्नी मारियान पर्ल यासुद्धा होत्या. त्यावेळी त्या गरोदर होत्या.
 
ते डॅनियल यांची मैत्रिण आणि वॉल स्ट्रीट जर्नलमधील त्यांची सहकारी असरा नोमानी यांच्या घरी राहिले होते. 23 जानेवारी 2002 हा त्यांचा पाकिस्तानमधला शेवटचा दिवस होता. दुसऱ्या दिवशी ते दुबईला जायला निघणार होते.
 
त्याकाळात भारत आणि पाकिस्तानदरम्यान तणाव होता आणि दोन्ही देशांदरम्यानची विमानसेवा बंद होती. त्यामुळेच ते दुबईमार्गे भारतात परत येणार होते.
 
त्यादिवशी डॅनियल यांना शू बॉम्बरवर रिपोर्ट करण्यासाठी पीर मुबारक अली शाह जिलानी यांना भेटायचं होते. असरा यांनी शेरेटन हॉटेलमध्ये फोन करून त्यांच्यासाठी टॅक्सी मागवली. मात्र, त्यादिवशी हॉटेलच्या जवळ कोणतीही टॅक्सी उपलब्ध नव्हती.
 
त्यामुळे असराने आपला नोकर शब्बीरला टॅक्सी आणण्यासाठी पाठवलं. थोड्यावेळात शब्बीर सायकलवरून आले, त्यांच्यामागे टॅक्सी येतच होती.
 
डॅनियल टॅक्सीत बसले आणि गाडी मारियान आणि असराच्या डोळ्यासमोरून हलली.
 
मारियान आपल्या ‘अ माइटी हार्ट’ या आत्मचरित्रामध्ये म्हणतात, “आमच्या दोघांपैकी कोणीही जर एकट्याने स्टोरी कव्हर करायला गेलं, तर आम्ही दुसऱ्याला दीड-दीड तासांनी फोन करायचो. सगळं काही ठीक आहे, हे समजून घेण्याची आमची ती पद्धत होती.”
 
“पण मी जेव्हा फोन केला, तेव्हा त्यांचा फोन ऑफ येत होता. फोन बंद असण्याची अनेक कारणं असू शकतात, पण सहसा त्यांचा फोन सुरू असायचा.”
 
त्या पुढे लिहितात, “थोड्यावेळाने मी त्यांना जवळपास दर पंधरा मिनिटांनी फोन करायला लागले, पण प्रत्येक वेळी मला फोन बंद असल्याचाच मेसेज ऐकू येत होता.
 
असं यापूर्वी कधीच झालं नव्हतं. डॅनी (डॅनियल) कोसोवोमध्ये असो, सौदी अरबमध्ये किंवा इराणमध्ये, ते नेहमीच मला फोन करण्याचा कोणता ना कोणता मार्ग शोधून काढायचे.”
 
डॅनियल पर्ल जिथे थांबले होते, त्या घराच्या गल्लीत रात्री एक वाजण्याच्या सुमारास एक कार घुसली. त्यांची पत्नी मरियान आणि असरा दोघीही डॅनियल परत आले असतील या अपेक्षेने दरवाजाकडे धावल्या. पण ती गाडी पुढे निघून गेली.
 
त्या दोघींनी ठरवलं की, जर दोन वाजेपर्यंत डॅनियलशी काहीच संपर्क झाला नाही, तर आपण पोलिसांना फोन करायचा.
 
रात्र सरत गेली तशी भीती वाढायला लागली...
दोन वाजेपर्यंतही डॅनियल घरी नाही आले, तेव्हा मारियान आणि असराने पोलिसांना फोन करण्याच्या आधी अमेरिकन वाणिज्य दूतावासाला फोन लावला.
 
फोन उचलून कॉरपोरल बॅली यांनी झोपाळलेल्या आवाजात विचारलं, “मी तुमची काय मदत करू शकतो?”
 
मारियान आणि असराने त्यांना डॅनियलबद्दल सांगितलं तेव्हा बॅली यांनी म्हटलं की, डॅनियल सकाळी लवकर दारूच्या नशेत परत येतील.
 
पाकिस्तान इस्लामिक देश आहे. इथे सरसकट दारू नाही मिळत. बॅली यांच्याकडे वाणिज्य दूतावासात असे फोन अनेकदा यायचे.
 
बॅली यांनी त्या दोघींना सांगितलं की, जर डॅनियल परत आले नाहीत, तर सकाळी सहा वाजता फोन करा. सुरक्षा अधिकारी रँडल बेनेट यांच्याशी बोलायचं असल्याचं त्यांना सांगा.
 
मारियान यांना हे नावं ऐकल्यासारखं वाटलं.
 
एक दिवस आधीच डॅनियल पर्ल यांची बेनेट यांच्यासोबत भेट झाली होती. त्यामुळे मारियान यांना वाटलं की, बेनेटला किमान डॅनियल कोण आहे, हे तरी सांगावं लागणार नाही.
 
अपहणकर्त्यांनी डॅनियलच्या घरी केला फोन
मारियान रात्रभर डॅनियलला फोन करत होत्या, मात्र फोन लागलाच नाही.
 
सकाळी त्यांनी 'द वॉल स्ट्रीट जर्नल'च्या परराष्ट्र विभागांचे संपादक आणि डॅनियल यांचे बॉस जॉन बसी यांना ही गोष्ट सांगितली.
 
बसीने त्यांना विचारलं की, आता आपण काय करायला हवं?
 
या सगळ्यात 24 तास गेले.
 
दरम्यान, मारियानचा फोन वाजला. डॅनियलचाच फोन होता.
 
मारियान लिहितात, “असराने पटकन फोन उचलून हॅलो म्हटलं. पलिकडून उर्दूमध्ये म्हटलं की, आम्हाला डॅनियल पर्ल यांच्या पत्नीशी बोलायचं आहे. असराला लक्षात आलं की, हे प्रकरण गंभीर आहे. तिने म्हटलं की, मी तुमचं बोलणं करवून देते, पण ती उर्दू बोलू शकत नाही.”
 
त्यावर पलिकडच्या व्यक्तीने दुसऱ्या एका व्यक्तीला सांगितलं की, तिला उर्दू समजत नाही.
 
त्यानंतर पलिकडच्या व्यक्तीने फोन ठेवला. उर्दू बोलणारा माणूस संपर्क साधण्यासाठी फोन करत नव्हता, हे स्वाभाविक होतं. त्याला डॅनियलला सोडण्याबद्दलच्या अटी सांगायच्या होत्या.
 
पाकिस्तानी कट्टरपंथियांच्या सुटकेची मागणी
नंतर डॅनियल पर्ल यांच्या अपहरणकर्त्यांनी अमेरिकन सरकारला ई-मेल केला आणि त्यांच्या सुटकेच्या बदल्यात ग्वान्टानामो बे मध्ये असलेल्या पाकिस्तानी कट्टरपथींयांच्या सुटकेची मागणी केली.
 
अमेरिकेने पाकिस्तानला देण्यात येणाऱ्या एफ-16 या लढाऊ विमानांवर जे निर्बंध लावले होते, ते उठवण्यात यावेत अशीही त्यांची एक मागणी होती.
 
जर या मागण्या पूर्ण झाल्या नाहीत तर डॅनियलची हत्या केली जाईल आणि पाकिस्तानमध्ये कोणत्याही अमेरिकन पत्रकाराला येऊ दिलं जाणार नाही.
 
या मेलसोबत पर्ल यांचे हातात बेड्या घातलेले आणि त्यादिवशीचं ‘डॉन’ हे वृत्तपत्रं हातात घेतलेले फोटोही होते.
 
पर्ल यांची सुटका करण्याची मारियान आणि इतर लोकांची मागणी त्यांनी पूर्णपणे फेटाळून लावली.
 
दरम्यान, मारियानचा फोन वाजला. डॅनियलचाच फोन होता.
 
मारियान लिहितात, “असराने पटकन फोन उचलून हॅलो म्हटलं. पलिकडून उर्दूमध्ये म्हटलं की, आम्हाला डॅनियल पर्ल यांच्या पत्नीशी बोलायचं आहे. असराला लक्षात आलं की, हे प्रकरण गंभीर आहे. तिने म्हटलं की, मी तुमचं बोलणं करवून देते, पण ती उर्दू बोलू शकत नाही.”
 
त्यावर पलिकडच्या व्यक्तीने दुसऱ्या एका व्यक्तीला सांगितलं की, तिला उर्दू समजत नाही.
 
त्यानंतर पलिकडच्या व्यक्तीने फोन ठेवला. उर्दू बोलणारा माणूस संपर्क साधण्यासाठी फोन करत नव्हता, हे स्वाभाविक होतं. त्याला डॅनियलला सोडण्याबद्दलच्या अटी सांगायच्या होत्या.
 
पाकिस्तानी कट्टरपंथियांच्या सुटकेची मागणी
नंतर डॅनियल पर्ल यांच्या अपहरणकर्त्यांनी अमेरिकन सरकारला ई-मेल केला आणि त्यांच्या सुटकेच्या बदल्यात ग्वान्टानामो बे मध्ये असलेल्या पाकिस्तानी कट्टरपथींयांच्या सुटकेची मागणी केली.
 
अमेरिकेने पाकिस्तानला देण्यात येणाऱ्या एफ-16 या लढाऊ विमानांवर जे निर्बंध लावले होते, ते उठवण्यात यावेत अशीही त्यांची एक मागणी होती.
 
जर या मागण्या पूर्ण झाल्या नाहीत तर डॅनियलची हत्या केली जाईल आणि पाकिस्तानमध्ये कोणत्याही अमेरिकन पत्रकाराला येऊ दिलं जाणार नाही.
 
या मेलसोबत पर्ल यांचे हातात बेड्या घातलेले आणि त्यादिवशीचं ‘डॉन’ हे वृत्तपत्रं हातात घेतलेले फोटोही होते.
 
पर्ल यांची सुटका करण्याची मारियान आणि इतर लोकांची मागणी त्यांनी पूर्णपणे फेटाळून लावली.
 
डॅनियल पर्ल यांना कराचीच्या उत्तर भागातील एका निर्जन ठिकाणी ठेवण्यात आलं होतं.
 
मारियान पर्ल लिहितात, “केवळ शौचालयात जाण्यासाठीच त्यांच्या बेड्या काढण्यात यायच्या. त्याचवेळी एकदा त्यांनी टॉयलेटच्या खिडकीतून पळून जाण्याचा प्रयत्न केला होता. पकडल्यावर त्यांना कारच्या इंजिनला बांधण्यात आलं.
 
“एकदा अपहण केलेल्यांपैकी एकजण जेव्हा त्यांना अंगणात घेऊन आला होता, तेव्हाही त्यांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. एकदा एक भाजीवाला बाजूने जात असताना त्यांनी जोरजोरात ओरडून त्याचं लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न केला. पण त्यांच्या अपहरणकर्त्यांनी त्यांचं तोंड दाबून धरलं.”
 
नईम बुखारी नावाचा एक माणूस त्यांचं जेवण घेऊन यायचा. तो लष्कर-ए-झांगवीच्या स्थानिक विभागाचा प्रमुख होता.
 
डॅनियल यांच्या अपहरणाच्या आधीपासूनच पोलिसांना अनेक शिया मुस्लिमांच्या हत्येप्रकरणी तो हवा होता.
 
23 जानेवारीला जेव्हा डॅनियल जेव्हा कारमध्ये बसले होते, तेव्हा मोटर सायकलवरून आलेल्या नईमनेच त्यांचं अपहरण केलं होतं.
 
‘बुटांची लेस बांधण्याची गरज नाही’
अगदी शेवटच्या क्षणापर्यंत डॅनियल यांना आपल्याला मारलं जाईल असं वाटलं नव्हतं.
 
हेन्री लिवी लिहितात, “पर्ल यांचा केअर टेकर करीमने त्यांना एकेदिवशी झोपेतून उठवलं. डोळ्यांवर झापड असली तरी पर्ल यांना जाणवलं की करीमचा आजचा नूर वेगळाच आहे.”
 
“त्याचा चेहरा दगडासारखा कठोर झाला होता. पर्ल यांना त्यांच्या बुटांच्या लेस बांधताना त्रास होत होता, तेव्हा करीम त्यांच्याकडे पाहण्याचीही तसदी न घेता विचित्र स्वरात जे बोललो; ते ऐकून डॅनियल यांचा थरकाप उडाला.”
 
“त्याने म्हटलं की, लेस बांधण्यासाठी फार त्रास करून घेऊ नकोस. जिथे तुला जायचंय, तिथे तुला याची गरज नाही लागणार.”
 
त्यानंतर स्टीव लेवाइन यांनी 'वॉल स्ट्रीट जर्नल'मध्ये डॅनियल पर्ल यांच्या शेवटच्या क्षणांबद्दल लिहिलं आहे की, त्या जागेचा मालक सौद मेमन आपल्यासोबत अरेबिक बोलणाऱ्या तीन जणांना तिथे घेऊन आला. बुखारीने अरबी बोलणाऱ्या एका गार्डला सोडून बाकी सर्वांना तिथून बाहेर जायला सांगितलं.”
 
“त्यांच्यापैकी एका व्यक्तीने व्हीडिओ कॅमेरा सुरू केला आणि दुसऱ्या व्यक्तीने पर्ल यांना त्यांच्या धार्मिक पार्श्वभूमीबद्दल प्रश्न विचारायला सुरूवात केली.”
 
“दरम्यान त्याच्या डोक्यावर रिव्हॉल्वर लावली होती. पर्ल यांनी सांगायला सुरुवात केली- माझं नाव डॅनियल पर्ल आहे. मी एक ज्यू अमेरिकन आहे. मी कॅलिफोर्नियाचा रहिवासी आहे.”
 
“त्याच व्यक्तीने पर्ल यांना सूचना केली की त्यांनी टेपवर सांगावं, “त्यांचे वडील ज्यू आहेत, आई ज्यू आहे आणि मी स्वतःही ज्यू आहे.”
 
पर्ल यांनी हे बोलल्यावर तिथे असलेल्या एका व्यक्तीने म्हटलं की, ते खूप हळूहळू बोलत आहे आणि त्यांनी अजून चांगल्या पद्धतीने बोलावं.
 
त्याने अजून दोन वाक्यं जोडायला लावली- मी इस्रायलला जातो. इस्रायलमधल्या बेनाई ब्राक शहरात एक रस्ता आहे ज्याचं नाव चायम पर्ल आहे. हे नाव माझ्या पणजोबांच्या नावाने ठेवण्यात आलंय.
 
त्यानंतर पर्लच्या डोळ्यांवर पट्टी बांधून त्यांची हत्या करण्यात आली.
 
हत्येनंतर तीन आठवड्यांनी त्या लोकांनी बाहेरच्या जगासाठी 3 मिनिटं 36 सेकंदांचा एक व्हीडिओ प्रसिद्ध केला. त्याला नाव दिलं होतं- ‘स्लॉटर ऑफ द स्पाय जर्नलिस्ट, द ज्यू डॅनियल पर्ल.’
 
तीन महिन्यांनी सापडला मृतदेह
या घटनेनंतर जवळपास तीन महिन्यांनी कराचीपासून 48 किलोमीटर लांब निर्जन जागेत एका कबरीत त्यांचा मृतदेह सापडला. त्यांच्या मृतदेहाचे दहा तुकडे करण्यात आले होते.
 
पाकिस्तानमधील समाजसेवक अब्दुल सत्तार ईदी यांनी त्यांच्या मृतदेहाचे अवशेष एकत्र करून ते अमेरिकेला पाठविण्याची व्यवस्था केली. तिथे लॉस एंजलिसमधल्या एका दफनभूमीत त्यांचं दफन करण्यात आलं.
 
6 फेब्रुवारी 2002 रोजी या हत्येचा तपास त्या आयपी अड्रेसपर्यंत पोहोचला, ज्यावरून पर्ल यांच्या सुटकेच्या बदल्यात खंडणी मागणारा मेल करण्यात आला होता.
 
त्यानंतर या प्रकरणी फहद नसीम, सुलेमान साकिब आणि मोहम्मद आदिल यांना अटक करण्यात आली.
 
हा मेल त्यांनी ओमर सईद शेख नावाच्या एका व्यक्तीलाही फॉरवर्ड केला होता.
 
या अपहरणाची योजना बनविणाऱ्या ओमर सईद शेख याने आयएसआयचे माजी अधिकारी ब्रिगेडियर एजाज शाह यांच्यासमोर आत्मसर्पण केलं.
 
एक आठवड्यापर्यंत शेख याच्या आत्मसमर्पणाची बातमी कराची पोलिसांनी गुप्त ठेवली.
 
पाकिस्तानचे माजी राष्ट्रपती जनरल परवेज मुशर्रफ यांनी आपल्या ‘इन द लाइन ऑफ फ़ायर’ या आत्मकथेत लिहिलं आहे, “जेव्हा पीर मुबारक अली शाहला अटक करून त्याची चौकशी केली, तेव्हा त्याने सांगितलं की, ओमर शेख डॅनियल पर्लला भेटण्यासाठी खूप उत्सुक होता.”
 
“सुरुवातीला आम्हाला ओमर शेखचा ठावठिकाणा कळला नाही. पण मग पोलिसांनी त्याचे काही मित्र आणि नातेवाईंकाना ताब्यात घेतलं.
 
आदिल शेख याच्या अटकेनंतर ओमर शेख याचा फोन नंबर मिळाला. आदिल शेखनेच सांगितलं की, तो आणि ओमर शेख डॅनियल पर्लच्या अपहरणाच्या योजनेत सहभागी होते.”
 
अटकेनंतर ओमर शेख यांनी हे मान्य केलं की, डॅनियल पर्ल यांच्या अपहरणाच्या योजनेत त्यांचा सहभाग होता, मात्र आपण पर्लच्या हत्येचा आदेश दिल्याचं त्यांनी कबूल केलं नाही.
 
भारतातील तुरुंगातून सुटला होता ओमर सईद
ओमर सईद शेख ब्रिटनचा नागरिक होता. त्याने 'लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स'मधून शिक्षण घेतलं होतं. पाश्चिमात्य देशांमध्ये त्याने अपहरणाचे गुन्हे केले होते.
 
ओमर सईद तोच होता, ज्याला तीन ब्रिटीश नागरिकांच्या अपहणाप्रकरणी 1994 साली भारतात अटक करण्यात आली होती.
 
1999 मध्ये भारतीय विमानाचं अपहरण करून कंदाहारला नेल्यानंतर मौलाना अजहर मसूदसोबत ज्या तीन लोकांना भारत सरकारने सोडलं होतं, त्यामध्ये ओमर सईद शेखही होता.
 
मारियाना पर्ल लिहितात, “भारतातल्या तुरुंगातून सुटल्यानंतर ओमर लाहोरमध्ये स्थायिक झाला. नंतर त्याने हरकत-ए-जिहादी इस्लामी अफगाणिस्तानच्या सदस्यांना प्रशिक्षण देण्यासाठी चार वेळा अफगाणिस्तानचा दौरा केला.”
 
परवेज मुशर्रफ लिहितात, “ओमर शेखचा दावा होता की, अफगाणिस्तान दौऱ्यामध्ये त्याची भेट ओसामा बिन लादेन आणि मुल्ला ओमरसोबत झाली होती. अर्थात, तो अल-कायदाचा सदस्य नव्हता. मात्र, त्याने अपहरणातून जी खंडणी मिळालेली, त्या रकमेतून अल कायदाला मदत केली होती.”
 
केएसएमने घेतलेली पर्ल यांच्या हत्येची जबाबदारी
15 जुलै 2002 ला पाकिस्तानमधील एका न्यायालयाने ओमर शेख आणि इतर तीन व्यक्तींना डॅनियल पर्ल यांच्या हत्येप्रकरणी मृत्यूदंड सुनावला.
 
ओमर याने अपील केल्यानंतर 2 एप्रिल 2020 ला पाकिस्तानमधील न्यायालयाने त्याची मृत्यूदंडाची शिक्षा कमी करून त्याला सात वर्षांचा तुरुंगवास सुनावला.
 
झालं असं होतं की, 10 मार्च 2007 ला अल कायदामधील तिसऱ्या क्रमांकावरील खालिद शेख मोहम्मदने (केएसएम) ने ग्वांटानामो बे मधे ‘कॉम्बॅटन्ट स्टेटस रिव्ह्यू ट्रिब्यूनल’ समोर दिलेल्या जबाबामध्ये डॅनियल पर्लच्या हत्येची जबाबदारी घेतली.
 
त्याने म्हटलं की, मी कराचीमध्ये माझ्या हातांनी डॅनियल पर्लचा मस्तक धडावेगळं केलं होतं.
 
त्यानंतर ओमर सईदच्या वकीलांनी खालिदच्या जबानीच्या आधारे ओमरच्या सुटकेची मागणी केली.
 
त्यांनी म्हटलं की, डॅनियल पर्लच्या अपहरणामध्ये ओमर शेख यांची भूमिका होती. मात्र त्याची हत्या खालिद शेख मोहम्मदने केली होती.
 
ओमर शेखची सुटका होण्याआधीच पाकिस्तानी सरकारने त्याच्या आणि त्याच्या तीन साथीदारांच्या अटकेचे आदेश दिले.
 
दीर्घकाळ चाललेल्या कायदेशीर लढाईनंतर पाकिस्तानी सुप्रीम कोर्टाने ओमर सईद आणि त्याच्या तीन साथीदारांच्या सुटकेचे आदेश दिले.
 
30 जानेवारी 2021 ला पाकिस्तान सरकारने सिंध हायकोर्टाच्या ओमर सईदची सुटका करण्याच्या निर्णयाविरोधात पुनर्विचार याचिका दाखल करण्यात आली होती.
 
2 फेब्रुवारी 2021 ला पाकिस्तानच्या सुप्रीम कोर्टाने आदेश दिला की, 18 वर्षांपासून फाशीच्या प्रतीक्षेत असलेल्या ओमर शेखला एका सरकारी सेफ हाऊसमध्ये ठेवण्यात यावं.
 
त्या सेफ हाऊसवर सुरक्षा रक्षकांचा पहारा ठेवण्यात आला होता. मात्र ओमर शेखची पत्नी आणि त्याच्या मुलांना त्याला भेटण्याची परवानगी होती.
 
आठ मार्च, 2021 ला कराची प्रशासनाने ओमर सईद शेखला लखपत जेलमधील एका गेस्ट हाऊसमध्ये पाठवलं. जोपर्यंत पाकिस्तान सुप्रीम कोर्ट त्याच्याविरोधातल्या सर्व याचिकांवर निर्णय देणार नाही, तोपर्यंत तो तिथेच राहील.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

मार्गशीर्ष गुरुवारी महाविष्णूच्या पूजेचे महत्त्व आणि उपासनेची सोपी पद्धत जाणून घ्या

हे 3 गुण असलेल्या महिला भाग्यवान असतात, नवरा आणि सासरचे लोक नेहमी आनंदी राहतात !

घरात या 5 पक्ष्यांचे फोटो लावा, ज्ञान- समृद्धी वाढते, तिजोरी धनाने भरलेली राहते

आपले नाते कसे मजबूत करावे, 5 गोष्टी लक्षात ठेवा

त्वचेच्या कर्करोगाच्या संरक्षणासाठी हे उपाय खूप प्रभावी आहेत

सर्व पहा

नवीन

महाराष्ट्रात विरोधी पक्षनेता नसणार चंद्रशेखर बावनकुळे यांचा काँग्रेस वर टोला

IPL 2025: श्रेयस अय्यर लिलावाच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू ठरला

IND vs AUS: 16 कसोटी डावांनंतर विराटचे शतक, सचिनचा विक्रम मोडला

LIVE: अजित पवार यांची विधीमंडळ पक्षनेतेपद साठी निवड, राष्ट्रवादीच्या बैठकीत निर्णय

अजित पवार यांची विधीमंडळ पक्षनेतेपद साठी निवड, राष्ट्रवादीच्या बैठकीत निर्णय

पुढील लेख
Show comments