Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

पुन्हा ‘डोकलाम’ सारखी परिस्‍थिती नको

पुन्हा ‘डोकलाम’ सारखी परिस्‍थिती नको
Webdunia
मंगळवार, 5 सप्टेंबर 2017 (16:31 IST)

गेल्‍या दोन महिन्यांपासून सुरु असलेल्‍या ‘डोकलाम’ वादानंतर प्रथमच दोन्ही देश  ‘ब्रिक्स’ परिषदेच्या निमित्ताने  एकत्र आले आहेत. यावेळी नरेंद्र मोदी आणि चीनचे राष्‍ट्राध्य क्षी जिनपिंग यांच्यामध्ये झालेल्‍या द्विपक्षीय बैठकीत ‘डोकलाम’ सारखी परिस्‍थिती पुन्‍हा उद्‌भवणार नाही, यावर दोन्ही देशांमध्ये एकमत झाल्‍याची माहिती परराष्‍ट्र मंत्रालयाने दिली आहे.  

नरेंद्र मोदी आणि जिनपिंग यांच्यामध्ये एका तासापेक्षा अधिक वेळ चर्चा सुरु होती. यामध्ये अनेक विषयांवर चर्चा झाली. परराष्‍ट्र मंत्रालयाने दिलेल्‍या माहितीनुसार, येथून पुढे दोन्ही देशांमध्ये ‘डोकलाम’सारखा वाद होणार नाही यावर दोन्ही देशांमध्ये एकम झाले आहे, अशा वादांवर चर्चेतून तोडगा काढण्यात येईल, सीमेवर शांतता राखण्यासाठी दोन्ही देशांकडून प्रयत्‍न करण्यात येतील’’

डोकलाम मुद्याबाबत बोलताना परराष्‍ट्र सचिव एस. जयशंकर यांनी सांगितले की, ‘‘आमच्याकडे विकासात्‍मक दृष्‍टीकोन आहे. दोन्ही देशांचे अतीतमध्ये काय झाले होते, याची कल्‍पना आहे. त्‍यामुळे मागच्या गोष्‍टींवर बोलण्यासाठी या बैठकीचे आयोनज केले  नव्हते.’’

यावेळी जयशंकर म्‍हणाले, ‘‘दोन्ही देशांमध्ये ब्रिक्‍सच्या मुद्यांवर चर्चा झाली. चीनने नरेंद्र मोदी यांच्या ब्रिक्‍स परिषदेविषयी असलेल्‍या दृष्‍टीकोणाचे कौतुक केले. चीनचे राष्‍ट्राध्यक्ष शी जिनपिंग नरेंद्र मोदींना म्‍हणाले की, ‘‘चीन आणि भारत जगात झपाट्याने प्रगती करणारे देश आहेत. या दोन्ही देशांमध्ये शांतता आणि सुव्यवस्‍था अबाधित राखण्याची गरज आहे. तसेच चीन भारतासोबत राहून पंचशील तत्‍वानुसार काम करण्यास तयार आहे.’’

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

लखपती दीदी योजना बद्दल संपूर्ण माहिती

पसायदान – संत ज्ञानेश्वर महाराज

वांग्ड्निश्चय आणि सीमांत पूजन विधी

देव देवक पूजा विधी काय आहे? माहिती जाणून घ्या

मेंदी काढणे व चूड़ा भरणे सोहळा

सर्व पहा

नवीन

LIVE: डोंबिवलीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखेवर दगडफेक

रुग्णवाहिका ट्रॅकवर अडकली, मालगाडीने रुग्णवाहिकेला धडक देत १०० मीटरपर्यंत ओढत नेले

थाटात साखरपुड झाल्यावर लग्न करण्यास दिला नकार, मुंबईत डॉक्टरविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल

रायगड : रस्त्याच्या कडेला सुटकेसमध्ये महिलेचा मृतदेह आढळला

डोंबिवलीतील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बालप्रशिक्षण शिबिरावर दगडफेक

पुढील लेख
Show comments