Dharma Sangrah

पाकमध्ये आत्मघाती हल्ला; 60 ठार

Webdunia
क्वेट्टा- पाकिस्तानमधील बलुचिस्तान प्रांतातील क्वेट्टा शहरातील पोलीस प्रशिक्षण केंद्रावर दोन दहशतवाद्यांनी केलेल्या आत्मघाती हल्ल्यात 60 जण ठार झाले आहेत. 
 
सरकारी अधिकार्‍यांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन बंदूकधारी दहशतवाद्यांनी शहराजवळच असलेल्या पोलीस प्रशिक्षण केंद्रावर हल्ला केला. सुरूवातीला दहशतवाद्यांनी जोरदार गोळीबार केला. त्यानंतर स्वत:ला उडवून दिले. यावेळी प्रशिक्षण केंद्रात सुमारे 250 जण उपस्थित होते. हल्ल्यानंतर अनेकजण आपला जीव वाचविण्याचा प्रयत्न करत होते. छतावरून उडी मारल्याने अनेकजण जखमी झाले आहेत.
 
क्वेट्टा शहरापासून 20 कि.मी. अंतरावर हे पोलीस प्रशिक्षण केंद्र आहे. सोमवारी रात्री साडेअकराच्या सुमारास हा हल्ला झाला. हल्लेखोरांनी सुरवातीला वॉच टॉवरवरील सुरक्षा अधिकार्‍यांनी ठार मारले आणि त्यानंतर हल्ला केला. या हल्ल्यात आतापर्यंत 60 जणांचा मृत्यू झाला असून 100 हून अधिकजण जखमी आहेत.
सर्व पहा

नक्की वाचा

Chhatrapati Sambhaji Maharaj Jayanti 2026 Speech in Marathi धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयंती भाषण

शरीराला उर्जावान ठेवण्यासाठी, दररोज या योगांचा सराव करा

पंचतंत्र : मूर्खांचा समूह

घरात भाजी नसेल तर पटकन बनवा साधी सोपी व झटपट होणारी कुरडईची भाजी : मराठमोळी चव!

Vastu Tips झोपण्याची योग्य दिशा तुमचे नशीब बदलू शकते

सर्व पहा

नवीन

मान्सूनचे अंदमान-निकोबारमध्ये आगमन

मध्य प्रदेशातील श्योपूरमध्ये कलिंगड खाल्ल्याने एका व्यक्तीचा मृत्यू

मोदी सरकारचा चांदीबाबत मोठा निर्णय, आयातीचे नियम कडक केले, जाणून घ्या हे पाऊल का उचलण्यात आले?

LIVE: महाराष्ट्रात २०३१ पर्यंत नवीन बी-फार्मसी आणि डी-फार्मसी महाविद्यालयांवर बंदी

काँगोमध्ये प्राणघातक इबोला विषाणू पसरल्याने ८० हून अधिक लोकांचा मृत्यू

पुढील लेख
Show comments