Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

डोनाल्ड ट्रंप यांना कॅपिटल हिल दंगलप्रकरणी सुप्रीम कोर्टाचा दिलासा, न्यायालयाने काय म्हटलं? वाचा

डोनाल्ड ट्रंप यांना कॅपिटल हिल दंगलप्रकरणी सुप्रीम कोर्टाचा दिलासा  न्यायालयाने काय म्हटलं? वाचा
Webdunia
बुधवार, 3 जुलै 2024 (00:15 IST)
अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांच्यावरील खटल्यात अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वाचा निर्णय सुनावला आहे.कॅपिटल हिल दंगल प्रकरणाच्या सुनावणीत अमेरिकन सर्वोच्च न्यायालयाने माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांना काही प्रमाणात ‘सवलत’ असल्याचं म्हटलं आहे.

न्यायाधीशांनी 6-3 अशा मताने निर्णय देताना म्हटलं की, ट्रंप त्यांच्या अधिकारात येणाऱ्या कृत्यांसाठी काही शिक्षेतून सवलत आहे आणि त्यांच्या अधिकारात न येणाऱ्या कृत्यांसाठी कोणतीही सवलत नाहीये.
कोणती गोष्ट त्यांच्या अधिकारात आहे आणि कोणती नाही हे निश्चित करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने हे प्रकरण कनिष्ठ न्यायालयात पाठवलं आहे. मात्र, या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने काही मार्गदर्शक तत्त्वं निश्चित केली आहेत.
न्यायाधीशांनी म्हटलं की, ट्रंप यांची खाजगी कागदपत्रं पुरावे म्हणून सादर केले जाऊ शकत नाहीत.
 
असहमती व्यक्त करणाऱ्या तीन उदारमतवादी न्यायाधीशांपैकी एक असलेल्या सोनिया सोटोमेयर यांनी म्हटलं की, या निर्णयाने आता राष्ट्राध्यक्ष कायद्यापेक्षाही श्रेष्ठ असे राजा झाले आहेत.राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीपूर्वीच्या या निर्णयाकडे, ट्रंप यांचा महत्त्वाचा विजय म्हणून पाहिलं जात आहे.
 
आता कॅपिटल हिल दंगल प्रकरण आणि 2020 च्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकांचे निर्णय पालटण्याच्या कथित प्रयत्नाच्या प्रकरणी ट्रंप यांच्याविरोधात आता कनिष्ठ न्यायालयात सुनावणी होईल.
रिपब्लिकन पक्षाने सुप्रीम कोर्टाच्या निर्णयावर आनंद व्यक्त केला आहे.
 
अॅरिझोनामधील रिपब्लिकन पक्षाच्या सिनेटर मार्शा ब्लॅकबर्न यांनी लिहिलं की, “महत्त्वाची बातमी, कायद्याने एक बेकायदेशीर राजकीय जाच थांबवला आहे.डेमोक्रॅटिक पक्षाने या निर्णयावर कठोर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
व्हर्जिनियामधील डेमोक्रॅटिक प्रतिनिधी गॅरी कॉनोली यांनी म्हटलं, “हा एक लाजिरवाणा निर्णय आहे आणि येणाऱ्या वर्षांमध्ये त्याचा आम्हाला त्रासच होईल.”

कॅपिटल हिल हल्ला
सहा जानेवारी 2021 ला अमेरिकन कॉँग्रेसमध्ये जो बायडेन यांच्या विजयावर शिक्कामोर्तब करण्यासाठी सत्र सरू होतं. तीन नोव्हेंबर 2020 ला जो बायडेन अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजयी झाले होते.
 
सत्र सुरू असतानाच रिपब्लिकन सदस्यांनी निवडणूक निकालांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. जो बायडन यांना सर्टिफिकेट देण्यात येऊ नये असा दबाव त्यांनी उपराष्ट्रपती माइक पेंस यांच्या टाकण्यास सुरूवात केली.
 
दरम्यान, अमेरिकेत कॅपिटल बिल्डिंगवर ट्रंप समर्थकांनी हल्ला केला. अमेरिकन काँग्रेसचं सत्र सुरू असताना ट्रंप समर्थकांनी बॅरिकेड तोडून आत घुसखोरी केली.
 
पोलिसांबरोबर त्यांची झटापट झाली. या हल्ला प्रकरणी 13 लोकांना अटक करण्यात आली. वॉशिंग्टन डीसी मेट्रोपोलिटन पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 5 बंदुकाही जप्त करण्यात आल्या. यामध्ये हँडगन आणि लाँग गनचा समावेश आहे.
 
ट्रम्प यांच्यावरील खटला
2020च्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीतील पराभव उलथवून टाकण्यासाठी ट्रम्प यांनी बेकायदेशीरपणे योजना आखल्याप्रकरणी ट्रंप यांच्यावर खटला दाखल करण्यात आला.
 
निकाल फिरवण्यासाठी ट्रंप यांनी अधिकाऱ्यांवर दबाव आणला, खोटी माहिती पसरवली आणि बायडन यांच्या विजयाची घोषणा पुढे जाऊन अजून काही काळ सत्तेत राहता यावं यासाठी 6 जानेवारी 2021 ला कॅपिटॉलमध्ये झालेल्या दंगलीचा फायदा घेण्याचा प्रयत्न केला, असे आरोप त्यांच्यावर होते.
 
याबद्दलचे 4 फौजदारी गुन्हे त्यांच्यावर दाखल आहेत. यामध्ये अमेरिकेची फसवणूक करण्यासाठीचं कारस्थान रचणं आणि नागरिकांच्या हक्कांच्या विरोधात कारस्थान रचण्याचाही गुन्हा आहे.
अमेरिकेच्या इतर कोणत्या सामान्य नागरिकासारखा माजी राष्ट्राध्यक्षावर खटला चालवता येऊ शकत नाही, असं म्हणत डोनाल्ड ट्रंप यांनी अपील केलं होतं.
 
या खटल्याशी संबंधित आरोपांमध्ये 5 ते 20 वर्षं अशा कालावधीच्या तुरुंगवासाची शिक्षा आहे.
मात्र, आता याप्रकरणी सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निर्णयामुळे ट्रंप यांना दिलासा मिळाला आहे.
 
नोव्हेंबरमध्ये राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुका होईपर्यंत कॅपिटॉल दंगलीबाबतच्या या प्रकरणावर सुनावणी होईल का, याबाबत शंका आहे. जर ट्रम्प निवडून आले, तर ते स्वतःवरचा हा खटला रद्द करू शकतात.
 
Published By- Priya Dixit 
 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Chaitra Navratri 2025 भारतातील दहा प्रमुख श्रीराम मंदिर

Gudi Padwa 2025 Rangoli Designs गुढीपुढे काढण्यासाठी रांगोळी डिझाईन

हिंदू नववर्षापूर्वी घरातून बाहेर काढून टाका या ७ वस्तू, जीवनात सुख-समृद्धी येईल

फाटलेले ओठ गुलाबी करण्यासाठी नारळाच्या तेलात हे मिसळून लावा

नारळ पाणी कोणी पिऊ नये पिण्यापूर्वी त्याचे तोटे जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

हिंदू नववर्षानिमित्त फडणवीस सरकारने दिली मोठी भेट, १ एप्रिलपासून मिळणार स्वस्त वीज

LIVE: हिंदू नववर्षानिमित्त फडणवीस सरकारने दिली मोठी भेट

मुंबईत शास्त्रीय गायकाला १८ दिवस डिजिटल अटकेत ठेवत लुटले

कोकणात यलो अलर्ट, मुसळधार पावसासह चक्रीवादळाचा इशारा

मुंबईत भीषण अपघात, टॅक्सी चालक आणि महिलेचा मृत्यू

पुढील लेख
Show comments