थायलंडचे राजा महिला कमांडरशी लग्न करणार

शुक्रवार, 3 मे 2019 (09:46 IST)
थायलंडचे राजा महा वजीरालोंगकोर्न यांनी आपल्या सुरक्षापथकाचे कमांडर सुथिदा तिजाई यांच्याशी लग्न करत सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. लग्नानंतर त्यांनी सुथिदा यांना राणीचा दर्जा दिला आहे. येत्या काही दिवसांतच थायलंडच्या राजाचा अधिकृतरित्या राज्याभिषेक होणार आहे. वजीरालोंगकोर्न यांचं हे चौथं लग्न आहे. ते ६६ वर्षांचे आहेत. त्यांना तीन राण्यांपासून पाच मुलं आणि दोन मुली आहेत. ‘रॉयल गॅझेट’ या वृत्तपत्रातून या शाही लग्नाची घोषणा करण्यात आली. 
 
वजीरालोंगकोर्न यांना राजा राम दहावे म्हणूनही ओळखलं जातं. त्यांचे वडील राजा भूमिबोल अदुल्यादेज यांचं १३ ऑक्टोबर २०१६ रोजी निधन झालं. राजा अदुल्यादेज यांच्या निधनावर एक वर्षाचा शोक घोषित करण्यात आला होता. त्यामुळे राजा वजीरालोंगकोर्न यांचा राज्याभिषेक करता आला नव्हता.

वेबदुनिया वर वाचा

पुढील लेख तर हिमशिखरे नष्ट होतील